प्रॉब्लेम्सना वगळून आयुष्य जगून दाखवा, खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटेल!!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
जीवन हे सारे ऊन सावली पुढे पुढे चालावे
हासत खेळत सुख दुःखाचे गाणे गात जगावे
आपलं पूर्ण आयुष्य हे ऊन सावलीच्या खेळात सारख आहे. अशा या आयुष्यात आपण सुख दुखाचं गाणं जगायचं असतं, पुढे जायचं असतं. झाडाकडून मिळणारी सावली असेल तर सूर्याकडून मिळणार प्रखर उन्हही आहेच. या दोन्ही गोष्टी गोष्टींना जगत, त्यांचा त्या त्या प्रकारे आनंद घेत सामोरे जात पुढे जाणे हेच आपलं काम आहे. हेच निसर्ग देखील सांगतो.
आपल आयुष्य पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगल असू शकत नाही आणि आपण जर तस म्हणत असू तर अापण वैचारिक चूक करतोय. जसा आनंद असतो जसे सुखाचे दिवस असतात त्याचप्रमाणे दुःख पण त्रास पण येणारच ना!
पण आपल्याला आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी, त्रास नको असतो. तोच अट्टाहास चाललेला असतो. पण हे शक्य आहे का? कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. अगदी आपण स्वतःच स्वतःला अनेकदा नियंत्रणात ठेवू शकत नाही. आयुष्याचं काय सांगायचं? पण इतक सर्व माहीत असूनही आयुष्य प्रॉब्लेम विरहित अगदी सरळ सोट हवं असत.
पण अश्या जगण्यात मजा तरी काय आहे? अगदी साधं उदाहरण पाहू. गेम खेळताना देखील त्यात जर नवीन आव्हाने आली, नव नवीन समस्या आल्या तर आपल्या खेळण्याची इच्छा अजून वाढते, आपण अधिक उर्मिने खेळतो, प्रयत्न करतो, सामना करतो. तोच गेम तर एकदम साधा सोपा असेल तर आपली खेळायची इच्छा निघून जाते. तो कंटाळवाणा, रटाळ वाटू लागतो.
आयुष्याचं ही असच आहे. जर आपण समस्याविरीहित आयुष्य पाहिजे अस म्हणत असू, त्या निर्माण होतील म्हणून पुढेच जात नसु तर ते कंटाळवाण होऊन जाईल. जर उंचीवर पोहोचायचं असेल तर खाचखळगे दगड धोंड्यातून प्रवास करावाच लागतो. तो टाळून चालत नाही. असं म्हणून चालत नाही ते हे माझ्या वाटेत नको आहेत. अस केलं तर वर पोचल्यावर जो आनंद मिळणार आहे तो निघून जाईल.
अशा वेळी वाट बघत बसलो तर आपल्याला पुढे जाताच येणार नाही. येथे रस्त्याला चुकून आपण स्वतःला फसवत राहतो. कारण अडचणी शिवाय आयुष्य नसतं. समाजाचा सामना करून त्यातून बाहेर पडण्यात खर सामर्थ्य आहे. विचार करून बघा कोणत्याही कष्टाशिवाय, त्रासाशिवाय मिळालेली गोष्ट आणि त्रासातून जाऊन तर समस्यांना तोंड देऊन मिळवलेली गोष्ट. खर समाधान कधी मिळत? गोष्ट छोटी असो वा मोठी ती मिळवायला आता आपण काय केल आहे त्यातून आपल्याला बळ मिळतं.
त्यामुळे जर आपण आपल्या आयुष्यात समस्याच नको म्हणून गोष्टी टाळत राहिलो, तसेच राहिलो तर आयुष्यात एक प्रकारची नीरसता येईल. एक पळवाट होऊन जाईल. आयुष्यात पोकळी निर्माण होईल आणि अशी कोणतीही समस्या नाही जी सोडवता येत नाही. त्याला मार्ग असतात.
आपल्याला धैर्य दाखवण्याची गरज असते. हा उन सावलीचा खेळ खेळण्याची गरज असते. जेवढ आपण प्रॉब्लेम मधून जातो तेवढा पण आतून स्ट्रॉंग होतो. तसंच आपला आयुष्यावर प्रेम वाढतं, त्याची किंमत कळते. कारण मोकळा श्वास घेताना जेवढ आयुष्य समजतं त्याहून जास्त तो दाबल्यानंतर ज्यातून आपण आपली सुटका करतो बाहेर पडतो तेव्हा समजतं.
तसच जेवढा आपण त्रास अनुभवतो तेवढ आपल्याला दुसऱ्याच दुःख समजायला मदत होते जी सुखात बऱ्याचदा होत नाही. त्यामुळे आयुष्य जर एकसुरी नको असेल तर आलेल्या समस्यांना तोंड द्या. त्याच्यापासून पळून, वास्तव धुडकवण्यात काही अर्थ नाही. त्याचा सामना करा. आयुष्यावर प्रेम वाढेल, स्वतःच मनोबल वाढेल आणि इतरांच्या अजून जवळ जाल. कारण,
दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव
जगताचे हे सुरेख अंगण, खेळ खेळूया सारे आपण
रंक आणखी राव, खेळू या रंक आणखी राव
याला जीवन ऐसे नाव.
माळ यशाची हासत घालू, हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव, झेलू या पराजयाचे घाव
याला जीवन ऐसे नाव.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Best