Skip to content

आयुष्य लहान नसतं,आपणच जगण्याची सुरुवात उशिरा करतो.

आयुष्य लहान नसतं,आपणच जगण्याची सुरुवात उशिरा करतो.


आकांक्षा किरणराव आळणे


मस्त हळूवार हवा, बीच वर संपूर्ण कुटुंब आजी-आजोबा आई-बाबा आणि नातवंडे असे तिनही जनरेशन निवांत आस्वाद घेत होते.
सूर्यास्त होती वाळू आणि पाण्याच्या लाटा मंद अशी हवा हळुवारपणे सर्व क्षीण दूर करत होते. निसर्गाचा soothing effect होता तो.
आयुष्यातील स्थैर्य;शांतता अशा प्रकारे एन्जॉय करणं किती जणांना येत..??

किती जण असे संपूर्ण कुटुंबासोबत निसर्गाचा आस्वाद वेळोवेळी घेतात..?? मुळात कुटुंबाला वेळ देणं किती आवश्यक आहे हे आयुष्याच्या उत्तरार्धात कळतं. पूर्वार्ध म्हणजे वयाची पंचविशी ते तिशी तर आपण सर्वजण “ध्येयवेडे” बनून जगतो.

प्रत्येकजण कशा ना कशाचा पाठलाग करतो. उत्तम शिक्षण घेण्याची धडपड,नंतर नोकरीसाठी धडपड एवढ्यावर आपण थांबत नाही. चांगली नोकरी मिळाली की प्रमोशन साठी आपली धडपड सुरूच असते. नोकरी हे टार्गेट आयुष्यभर सोबत असतं. नंतर लग्न मूलबाळ यांचे शिक्षण..!! कमी अपेक्षा तर आजकाल कोणी ठेवत नाही.

Over Ambitious झालेत सर्वजण. सर्वांना वाटतं आपण सर्वच बाबतीत टॉप ऑफ द वर्ल्ड असावे. ठीक आहे प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण मित्रांनो एवढे obsessed का राहायचे ते पण प्रत्येक बाबतीत..?? म्हणजे progressive mindset,growing mindset असावा पण एकदम obsession च्या लेवल ला..???

म्हणजे तुम्ही हॅपिली positive दृष्टिकोनातून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात तर हे उत्तम आहे पण त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप जास्त obsessed असाल म्हणजे ही गोष्ट मिळाली नाही तर माझे कसे होईल जर ही गोष्ट मिळाली नाही तर माझ्या जीवाचे बरे वाईट करेल असे जर विचार तुमच्या मनात भेडसावत असतील तर ‘दोस्तो आप गलत कहा पे हो…!!!’

एखाद्या गोष्टीसाठी इतके वेडे होणे तुमच्या मानसिक छळ केल्याशिवाय राहणार नाही मानसिक स्वास्थ्य ढासळू शकतो यातून पुढे OCD,डिप्रेशन,Eating Disorder या गोष्टी मानसिक छळरुपी आजार तुम्हाला गाठू शकतात. प्रयत्‍नशील दृष्टिकोन ठेवा आयुष्यात;पूर्ण efforts द्या BUT DONT CHASE IF IT AFFECTS YOUR MENTAL HEALTH. आपले प्रामाणिक प्रयत्न असू द्या.

टेन्शन न घेता आणि parents ला टेन्शन न देता करियर उभे करा. आपल्या बुद्धिमत्ता प्रमाणे करिअर निवडा,peer pressure मध्ये किंवा सध्या trend काय आहे या गोष्टींवरून आपल्या करिअरचा निर्णय नाही घ्यायचा. सर्वात महत्त्वाचे आणि उपयुक्त म्हणजे आपल्या कुटुंबाला नियमितपणे वेळ द्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात- म्हणजे रोज रात्रीचे जेवण सोबत करणे, महिना दोन महिन्यात किंवा आपापल्या वेळेनुसार फॅमिली ट्रिप काढणे, जर कामानिमित्त कुटुंबासोबत राहता येत नसेल तर निदान सण-वार तरी सोबत साजरे करणे ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे.

Priorities बदलत जातात आपल्या करिअर मुळे,आणि आपण मग फॅमिलीला कमी वेळ द्यायला लागतो. फॅमिली बाबतीत ‘टेकन फॉर ग्रांटेड’ असा आपला दृष्टिकोन असतो. कुटुंबच असतं जे आपल्या सुख दुःखात साथ देतं,आपली निस्वार्थपणे काळजी घेतं म्हणून त्यांना वेळ द्यावा. ही जाणीव आपल्याला उशिरा होते, आणि म्हणून आपण जगायला उशिरा सुरुवात करतो कारण आपल्याला अनेक वर्षे कळतच नाही कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यावी.म्हणून

कुटुंबाला वेळ द्या, मग तुम्ही आयुष्याच्या पूर्वार्धात असाल किंवा उत्तरार्धात.Usually कुटुंबाला वेळ देणे म्हणजे बऱ्याच जणांचा समज असतो की हे काम म्हणजे पंचेचाळीशी नंतरचे असते. तुम्ही आयुष्याच्या सध्या कुठल्याही स्टेजला असला तरी घरच्यांना वेळ हा द्यायलाच पाहिजे कारण हे समाज खूप उशिरा येते. पण हेच खरे जगणे आहे मित्रांनो.

आधीच खूप उशीर झालाय. यापेक्षा जास्त उशीर होऊ देऊ नका, चला तर मग करा प्लॅनिंग लवकर आपलं कुटुंबासोबत एक छोटीशी ट्रीप काढण्याची…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!