कधीतरी आयुष्यात लागलेली मोठी ठेच विसरून जाणं, हेच सर्वात मोठं दुर्दैव आहे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
विषाखाला तिच्या निर्णयाचा आता खूप पश्र्चाताप होत होता. एकदा नाही दुसऱ्यांदा तिच्याकडून ही चूक झाली होती. डोळ्यासमोर अचानक पाच वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला. घरातल्या सर्वांच्या विरोधात जाऊन, हट्टाने तिने राजीव सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सगळे सांगत होते त्याच्यासोबत जाऊ नको, तो तुला सुखी ठेवू शकत नाही. पण तिने कोणाचेही ऐकले नाही. प्रेमाची जादूच अशी असते. तेव्हा कुठे माणूस खरा खोटा आहे ते समजतो. ते जगच वेगळं असत. ते वय वेगळ असत. आभासी जग खर वाटू लागतं.
कसे पाठवून देतील आई बाबा, राजीव काही चांगली कमाई नव्हती का धड राहायचं ठिकाण होत. एका गैरेज मध्ये तो कामाला होता. कष्ट करून माणूस पुढे जाऊ शकतो त्यातून काहीतरी उभ करू शकतो हे जरी खर असल तरी राजीव त्यातला नव्हता. हातात आलं की उधळल असा त्याचा स्वभाव होता. विशाखाला या सगळ्याच गांभीर्य त्यावेळी समजत नव्हत कारण तो तिची खूप काळजी घ्यायचा, हट्ट पुरवायचा. हवं नको ते सर्व करायचा तिच्यासाठी. दिसायला पण खूप छान होता तो.
अगदी हिरोसारखा. त्यामुळे विशाखा खूप खुश असायची. तिला हेच तीच जग वाटू लागलं होत. आणि एक दिवस जेव्हा त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केल तेव्हा तिने लगेच होकार दिला. तिने घरातल्या कोणालाही अजूनही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितलं नव्हत. सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे याची देखील तिला पूर्ण कल्पना होती तरी तिने हा निर्णय घेतला होता.
काही मित्रांना सोबत घेऊन त्यांनी कोर्ट मैरेज केल. त्यांचा नवीन संसार अश्या प्रकारे सुरू झाला. घरी कधीही कसलही काम न केलेली ती आता सर्व आनंदने करू लागली. स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवू लागली. पण हे काही दिवसच टिकलं. शेवटी माणसाने कितीही वेळ पांघरूण घेतल तरी कधीतरी तो उघडा पडतोच. तेच झालं. राजीवचे खरे रंग हळू हळू तिला दिसू लागले. त्याच रात्री बेरात्री घरी येणं, तिच्यावर संशय घेण, त्याची व्यसन. नंतर नंतर त्याने कामावर जाण देखील बंद केलं.
मग काय विषाखाकडे जे काही थोड फार होत तेही त्याने घालवलं. या सगळ्या गोष्टींमधून रोज त्यांच्या मध्ये भांडण होऊ लागली. तिला हे सर्व असह्य झालं जेव्हा तिने त्याच्यापासून वेगळं राहण्याचा विचार केला. आई बाबांची खूप आठवण येत होती. त्यांच्याकडे जायचं तरी कस अस झालं होत. तरी ती हिम्मत करून गेली. त्यांनी पण तिला मोठ्या मनाने मग केल व घरी घेतल. शेवटी ती त्यांची मुलगी होती. ते तिची काळजी नाही करणार तर कोण करणार? त्यांना यातच समाधान होत की तिला तिची चूक समजली व ती त्याला सुधारायचा प्रयत्न करते आहे.
घरातल्या सर्वांना ती पुन्हा नॉर्मल झाल्यासारखी वाटत होती. पण आतल्या आत ती खूप दुखावली गेली होती. ज्या माणसाच्या विश्वासावर ती स्वतःच्या माणसांशी भांडली होती त्यानेच तिला एकट पाडलं होत. त्यानेच तिला अपमानित केल होत. पण आता आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जाणं भाग होत. किती दिवस ती अशीच कुढत बसणार होती? तिने स्वतःच्या पायावर उभ राहायच ठरवलं. आधीच तिने आई बाबांना त्रासवल होत.
आता काहीतरी करून त्यांना मदत करायची अशी तिची इच्छा होती. प्रयत्न करून तिने नोकरीही मिळवली. सर्व काही जरा स्थिर होत होत. पण इथे राजीव मात्र अडकला होता. कारण नोकरी नव्हती, वागणं पाहता परत कोण देणार पण नव्हत. इतके दिवस विशाखा सर्व सांभाळत होती तीही गेली होती. त्यामुळे त्याच्या समोर प्रश्न उभा राहिला होता. कसाही करुन तिला परत घरी आणायचं होत. तो फक्त योग्य संधीची वाट पाहत होता. त्याप्रमाणे त्याने तिची माहिती काढली. ती कुठे नोकरीला जाते, काय करते सर्व पाहू लागला. एक दिवस अचानक तिला तो भेटला. माफी मागितली पुन्हा चल म्हणाला.
पण विषाखाने त्याचे काहीही ऐकले नाही. पण तो असा हार मानून घेणाऱ्यातला नव्हता. खूप दिवस तो तिची माफी मागत होता. मी पुन्हा सर्व नीट करेन काम करेन सर्व प्रकारे तिचे समजूत घालत होता. शेवटी एक क्षण असा आला की विशाखाला त्याला माफ कराव लागलं. काहीही झालं तरी तिने प्रेम केलं होत त्याच्यावर. तिला वाटलं की आपण एक संधी दिली पाहिजे. यावेळी पण आई बाबा समजावत होते. पण ती म्हणाली आपण एक संधी दिली पाहिजे. मला वाटत की तो सुधारला आहे. ते तरी किती समजावणार? पण यावेळी काही झालं तर ते घर मात्र तिला बंद असणार होत. कारण इतकं होऊन ती परत जात होती.
ती राजीवकडे परत राहायला आली. पुन्हा तेच चक्र सुरू झालं. काही दिवसाच प्रेम. आता तरी ती नोकरी करत होती. पैसे येत होते. त्याला जर कामाबद्दल विचारलं तर त्याच काही उत्तर येत नसे. हिचे पैसे पण तोच घेत असे. दिवसभर बाहेर काम करून ती थकून यायची तरी राजीव मात्र तसच असायचा. त्याच्यवर काहीही परिणाम झालेला नसायचा. आता तर त्याचा वागणं पहिल्याहून वेगळं झालं होत. दारूच्या नशेत जेव्हा त्याने तिला मारायचा प्रयत्न केला तेव्हाच तिला समजलं की आपण काय केलं आहे.
आता ती हे सर्व आठवत बसली होती. राजीव सोबत राहणं शक्यच नव्हत. घराचे दरवाजे तेव्हाच बंद झाले जेव्हा दुसऱ्यांदा तिने पुन्हा तीच चूक केली. एकदा ठेच लागूनही तिने त्यातून धडा घेतला नव्हता व त्याचे हे परिणाम होते. त्याच्या बोलण्यावर भाळून किती सहजपणे ती आधीचा त्रास विसरून गेली होती. ज्यातून नवीन त्रास तिने ओढवून घेतला होता. आता मागे वळण नव्हत. अनुभव तर तिने घेतले पण त्या अनुभवाचं शहाणपण, त्यातल शिक्षण ती घेऊ शकली नाही आणि हीच तिची चूक ठरली.
आपल्या आयुष्यात आपणही अश्या प्रकारच्या अनेक अडी अडचणीच्या प्रसंगातून जात असतो, आपल्याला ठेच लागते, वाईट अनुभव येतो. पण आपण त्यातून किती शिकतो यावर आपल पुढचं वागणं असत. एकदा वाटेत दगडाला पाय आपटला तर पुढच्या वेळी ती रस्ता नीट काळजीपूर्वक पाहून जायला पाहिजे हे आपलं शहाणपण असत. ते वापरलं तर फायदा होतो. कारण गोष्टी माहीत असणं, त्याचं ज्ञान असणं वेगळं आणि तेच ज्ञान योग्य ठिकाणी कसं वापरावं हे समजणं म्हणजे ते शहाणपण येणं हे वेगळं. ते योग्य वेळी आलं पाहिजे.
वाघ आणि त्या चार मित्रांची गोष्ट आपल्याला माहीतच असेल. ज्ञान असेल तर फक्त धोका समजू शकतो पण तो टाळायला, त्याचा सामना करायला शहाणपण पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला