कोणत्याही गोष्टीसाठी आपली आंतरिक शांतता भंग होऊ देऊ नका.
मेराज बागवान
आज प्रत्येकजण असे म्हणताना दिसतो की , ‘मला शांतता प्रिय आहे.मला शांतता हवी आहे’.पण असे म्हणण्यामागे असा दृष्टिकोन असतो की ,कोणत्यातरी गोष्टींमुळे, व्यक्तीमुळे,अडचणीमुळे माझी शांतता भंग होत आहे.आणि ही शांतता भंग होण्याचे कारण देखील तो गोष्ट किंवा ती व्यक्तीच आहे असा विचार असतो.पण आंतरिक शांतता ही कोणा दुसऱ्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर अवलंबून नसते तर ती स्वतःच्याच हातात असते.पण आपण अनेकदा इतरांवर शांतता भंग होण्याचे खापर फोडतो.पण त्याचे खरे कारण आपण स्वतः असतो.
जीवनात अनेक गोष्टी घडत असतात.चढ-उतार येत असतात.यश-अपयश येत असते. कधी वैयक्तिक जीवनात तर कधी सार्वजनिक जीवनात काही ना काही आव्हाने असतातच.पण ह्यात वेगळे असे काहीच नाही.हेच तर जीवन आहे.जिथे कुठलीच गोष्ट कायम नसते. म्हणूनच, कोणत्याही गोष्टीसाठी आपली आंतरिक शांतता भंग होऊ देऊ नका.कारण आंतरिक शांतता असणे नाही ती कायम जपणे हे यशस्वी जीवनाचे रहस्य असते.
जेव्हा तुम्ही स्वतःची शांतता भंग करतात तेव्हा त्याचे तुमच्याच आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ लागतात.जसे की ;
◆ शारीरीक दुखणी
◆ मानसिक आरोग्य बिघडणे
◆ चिडचिड
◆ संयम बाळगता न येणे
◆ वारंवार रडू कोसळणे
◆ निर्णयक्षमता कमी होणे
◆ सोशल मीडिया चा अतिवापर
◆ संवाद साधता न येणे
◆ विसारभोळेपणा
◆ वर्तमान विसरणे
◆ भावनिक कल्लोळ
◆ नैराश्य
ह्या सगळ्या समस्या जर कमी करायच्या असतील, आयुष्यातून ह्या नकारात्मकतेला घालवायचे असेल तर खूप शांत राहणे गरजेचे आहे.आणि ते इतर कोणाच्या हातात नसून, फक्त आणि फक्त तुमच्याच हातात असते. मग ही आंतरिक शांतता काशी जागृत ठेवायची ? काही अशा गोष्ट तर आपण स्वतःसाठी , आत्मिक शांती , सकारात्मकतेसाठी करूच शकतो.जसे की ;
★ वर्तमानात जगणे
★ परिस्थिती स्वीकारणे
★ सुसंवाद साधणे
★ मोकळे होणे, व्यक्त होणे
★ आत्मपरीक्षण
★ संयम बाळगणे
★ सर्वसमावेशक विचारसरणी
★ भावनिक समतोल साधणे
★ समस्येपेक्षा जास्त उपायांवर लक्ष केंद्रित करणे
★ दृष्टिकोन बदलणे
★ नाही म्हणायला शिकणे
★ स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे (सर्व चांगले होणार आहे, मी कणखर आहे, मी यातून स्वतःला बाहेर काढू शकतो,बाहेरील परिस्थिती माझ्यावर कुढघोरी करू शकत नाही, मी एक जबाबदार आणि बळकट व्यक्तिमत्त्व आहे)
जेव्हा व्यक्ती आतून शांत असते तेव्हा ती सर्व गोष्टी यशस्वीरीत्या पूर्ण करू शकते. पण शांतता नसेल तर कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. मनाची शांतता असेल तर सद्सदविवेक बुद्धी जागृत राहते. माणूस यशाच्या एक एक पायऱ्या आत्मविश्वासाने चढू शकतो आणि सफल होऊ शकतो.जेव्हा मानसिक शांतता असते,तेव्हा नाती देखील खूप सुंदर रित्या बहरतात.जणू ही आत्मिक शांतता आयुष्यात प्रसन्नता, सुख, समृद्धी, नवी चेतना, ऊर्जा च घेऊन येते.जी आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असते. या उलट आत्मिक शांतताच नसेल तर आयुष्य जणू जिवंतपणी नरक बनू लागते.
म्हणूनच आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येवो, स्वतःची आंतरिक शांतता भंग होऊ देऊ नका.तुम्ही शांत तर जग शांत.तुम्ही शांत तर तुमच्या समस्या देखील शांत होऊ लागतील.आणि ‘थ्री इडियट्स’ मधील ‘रँचो’ आपल्याला सांगून गेलाच आहे ना….
‘जब लाईफ हो आऊट ऑफ कंट्रोल तो सिटी बजा के बोल ,ऑल इज वेल….’.
So Let’s Begin….One step towards Peace….
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूप छान। सुदंर लेख आहे
Khupch sundar sangitle ahe
Mast… Khaarokharch sunder sangitaly ani ek changla drushtikone nirmaan karnàra aahe.. I like it.
Wish to have a copy of it.