कोणत्याही बिकट परिस्थितीत काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या टीप्स वाचा.
टीम आपलं मानसशास्त्र
कोणत्याही बिकट परिस्थितीत काही झाले तरी आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये . आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते. बिकट परिस्थितीत आपल्या वरचा आपला विश्वास डळमळीत होत असतो. पण काही ही होवू दे कोणतीही परिस्थिती येवू दे स्वतः वरचा विश्वास कायम ठेवा. आणि त्याकरिता काही टिप्स बघुया.
१.सकारात्मक रहा :
निर्णय आपण स्वतः घेतलेला आहे त्यामुळे कालांतराने परिस्थिती बिकट झाली ही असेल पण ती तात्कालिक परिस्थिती आहे हे कायम लक्षात ठेवा. त्या बिकट परिस्थिती मधून बाहेर पडण्यासाठी आपण इतर अनेक मार्ग , वाटा यांचा वापर करून आहे ही परिस्थिती बदलू शकतो यावर ठाम विश्वास ठेवा.
उदा. आपल्या व्यवसायात, नात्यात खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली तर आपण त्याची कारणे तर शोधतोच पण ती बदलण्याकरिता आपण अनेक पर्याय वापरत असतो. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी हार मानणार नाही आणि माघार घेणार नाही अशी जिद्द ठेवा. आणि आपण परिस्थिती बदलू शकतो यावर विश्वास ठेवा.
२. अनेक विचार करू नका.
परिस्थिती थोडी मनाविरुद्ध गेली, किंवा थोडी जास्तच बिघडली म्हणजे बिकट झाली तर आपले विचार असंख्य दिशेने धावू लागतात. एकावेळी अनेक विचार मनात आल्यामुळे मनाचा गोंधळ उडतो. याउलट एक एक विचार मनात आणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय बदल घडू शकतील , संभव्यता , फायदे , तोटे याचे विचार करून तो विचार एखाद्या कागदावर किंवा कॉम्प्युटर वर एक फाईल करून त्यात नोंद करून ठेवा. त्यानंतर दुसरा विचार करा. असे जे जे विचार मनात येतील त्याची नोंद करून शेवटी comparision करा. आणि त्यातून योग्य विचार निवडून पुढे जा.
३. इतरांचे म्हणणे , मत जरूर ऐका पण निर्णय मात्र स्वतः घ्या :
तुम्ही संकटात आहात , तुमची परिस्थिती बिकट आहे हे समजल्यावर तुमच्या जवळचे , ओळखीचे त्यांची अनेक मते ऐकवतात, किंवा जे झाले त्यावर चर्चा करून किती वाईट झाले यावरच बोलून तुमच्या मनाचे खच्चीकरण करत असतात. तर काही लोक असे करा तसे करा अशा सूचना देत असतात. स्वतः जबाबदारी घेवून करणारे असे कोणीच नसते. अशा वेळी इतर कोणाचे किती ऐकायचे हे स्वतः ठरवा आणि कुठेही निराश होवू नका, इतरांचे ऐकून घेतले तरी निर्णय आपण स्वतः घ्या.
४. निर्णय घ्या आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा ‘ .-
कारण येणारा काळ आणि त्यामुळे बदलणारी परिस्थिती तो निर्णय योग्य का अयोग्य ते ठरवत असते.
५.अपयशातून ही शिकण्याची संधी सोडू नका..
काही वेळेस अपयश आले असेल पण तरी त्यातून नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. अनुभव मिळतात त्यातून आपल्याला सुधारण्याची संधी मिळतें . स्वतला develope करण्याची संधी मिळते. प्रत्येक माणूस हा चालते बोलत पुस्तक असतो. आणि त्याच्याकडून काही ना काही शिकण्यास मिळते. तेव्हा माणसं वाचायला शिका.
एक मार्ग बंद झाला की असे वाटते की आता सगळे संपले. आता काहीच नाही तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तो मार्ग बंद झाला तरी दुसरा मार्ग मिळतोच. किंवा गुगल जसे रस्ता चुकला तरी परत recentering करून परत अचूक किंवा योग्य मार्ग दाखवतो . ते कायम लक्षात ठेवा.
६. कोणतीही बिकट परिस्थिती , संकट, दैनंदिन जीवनात येणाऱ्या ,शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी , नोकरी मधल्या येणाऱ्या अडचणी , हे म्हणजे त्रासदायक गोष्टी असे समजून बघू नका. मलाच हे त्रास असेही विचार करू नका. तर याउलट असे विचार करा की तुम्हाला स्वतः ला सिध्द करण्याची, सुधारण्याची ही मिळालेली संधी आहे. स्वतः चे सामर्थ्य ओळखण्याची संधी आहे असे समजा.
७. प्रयत्न सोडू नका : जिद्द बाळगा:
किती ही बिकट परिस्थिती असेल तरी प्रयत्न सोडू नका. पराकोटीचे प्रयत्न करा आणि जिद्द बाळगा. हार मानून , किंवा कमकुवत आहोत असे समजून थांबू नका. ससा आणि कासव यांच्या शर्यतीचा धडा घेवून सातत्य आणि परिश्रम करा.
कोणत्याही बिकट परिस्थितीत काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कधी ना कधी प्रत्येकावर अशी परिस्थिती येतेच. त्यातून बाहेर पडण्या करिता प्रयत्नांची पराकाष्ठा करा. सर्वांना मनापासून शुभेच्छा.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

लयभारी
motivative for evory person
Very nice
खूप छान
Chhan pathavale thanks
खूपच छान
Nice line