सिरियस व्हा आतातरी!! कारण कोणालाही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काही देणं घेणं नाही.
सोनाली जे.
सध्या सोशल मीडिया हा जणू प्रत्येकाला आपल्या भावना , चांगला , वाईट मुड एक्स्प्रेस करण्याची जागा. किंवा प्लॅटफॉर्म म्हणावा लागेल.
बघा ना तुम्ही ज्या मूड मध्ये असता त्या मूड नुसार तुम्ही मेसेज पाठविता. आनंदी असता तेव्हा आनंदी मेसेज पाठविता , sad mood मध्ये असता तेव्हा रडका , शायरी असे काही पाठविता. तर कधी सगळ्या गोष्टी करून ही यश मिळत नाही तेव्हा देवावर विश्वास ठेवता . मग देवच काही मार्ग काढेल म्हणून काही देवाचे पाठविता.
यश , अपयश या गोष्टी आपल्या हातात नसतात पण कष्ट घेणे , त्याकरिता प्रयत्न करणे , नवनवीन गोष्टी शिकणे , स्किल develope करणे हे मात्र कायम आपल्या हातात असते.
College मध्ये असताना एखाद्या विषयात एखाद्या सेम ला फेल झालो तर आपल्याला वाटते आता आपल्या बरोबरचे मित्र काय म्हणतील? नातेवाईक काय म्हणतील ? आपल्याला नावे ठेवतील का ? आपण मित्रांच्या मागे राहू का ? असे विचार करून आपण खूप निराश होतो. ते काही म्हणतील म्हणून त्यांच्यात मिक्स होणे टाळतो Introvert होवू लागतो. पण खरेच सिरियस व्हा आतातरी!! कारण कोणालाही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काही देणं घेणं नाही.तुम्ही पास झाला , नापास झाला, पहिल्या पाचात आलात तरी ही कोणाला ही काही देणे घेणे नसते . कारण प्रत्येक जण आपापल्या लाईफ मध्ये व्यस्त असतात. त्यांच्या पुढे त्यांचे प्रॉब्लेम्स असताना किंवा अगदी आनंदी गोष्टी जरी असतील तरी त्यांच्या त्यांच्या असताना त्यांना इतरांच्या लाईफ बद्दल काही देणे घेणे नसते.
प्रिया चांगल्या घरातली संस्कारित मुलगी, अभ्यासात हुशार , कायम पहिला किंवा दुसरा number . त्यात पहिला किंवा दुसरा ही चढाओढ ती आणि मिहिर यांच्या दोघात असे. शाळेपासून एकत्र , कॉलेज मध्ये ही एकत्र .दोघांनी ठरवून admission घेतली. कायम एकत्र आणि हुशार , एकमेकांना अभ्यासात , इतर activity मध्ये मदत करणारे हे दोघे सगळीकडे एकत्र च जात. Canteen असो अथवा शॉपिंग असो. त्या दोघात एक वेगळी attachment ही होती. दोघे close येत गेले तसे प्रेम म्हणा किंवा friendship पेक्षा थोडे पुढे गेले. दोघांची cast वेगळी होती. सुरुवातीला दोघांच्या घरून नकार होता पण तरी नंतर दोघांच्या घरी होकार होता. पण दोघे अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करून होते. आधी शिक्षण चांगली नोकरी आणि नंतर लग्न हे ध्येय पक्के ठरले होते.
प्रिया आणि मिहिर दोघांचे शिक्षण ही झाले. यावेळी प्रिया पहिली आली मिहिर दुसरा. दोघांना ही लगेच चांगले जॉब मिळाले. पण ते मात्र दोन वेगळ्या कंपनी मध्ये. आणि मग दोघे कामात खूप अडकून पडले. मिहिर कंपनी तर्फे परदेशी जाणार हे नक्की ठरले. घरचे आग्रह करत होते लग्न करून जा. प्रिया आणि तू दोघेही एकत्र राहाल काळजी नाही. पण मिहिर नाही म्हणाला. थोडे तिकडे स्थिरस्थावर होवू दे मग लग्न . सुरुवातीला नियमित होणारे व्हिडिओ कॉल हळू हळू कमी होवू लागले. कायम मिहिर चे एकच कामात busy आहे. तो आपणहून तर कधी फोन करत नव्हता. पण प्रिया ने केला तरी घेत ही नव्हता.हळूहळू मेसेज ही नाहीत. संवाद ही नाहीत.
एकदा शेवटी प्रियाने मिहिर ला मेसेज केला की महत्वाचे बोलायचे आहे. वेळ मिळेल तेव्हा मेसेज कर बोलू. शेवटी दोन दिवसांनी मिहिर ने मेसेज केला. मग प्रियाने फोन केला. प्रिया त्याच्यावर खरेच खूप प्रेम करत होती. तिने त्याला विचारले ही की तू का टाळतो आहेस मला . तो कुठे काय म्हणाला , मग प्रियानेच विषय काढला की आपण लग्न करायचे आहे त्याचे काय , कधी ? आता तुझ्याशिवाय खरे च मी एकटी राहू शकत नाही. पण मिहिर ने चक्क नकार दिला लग्नाला. प्रिया ने खूप समजावले. असे करू नको. शाळे पासून आजपर्यंतच्या छोट्या मोठ्या आठवणी , एकत्र केलेल्या गोष्टी , एकमेकांनी मिळविलेल्या achievement , सहवास , प्रेमातल्या त्या गुलाबी आठवणी, एकमेकांची घेत असलेली काळजी, छोट्या छोट्या गोष्टी मधले शेअरिंग. एकत्र पावसात भिजून घट्ट मिठीत शिरलेल्या आठवणी सगळे सगळे परत परत सांगून ही मिहिर मध्ये काहीच फरक पडला नाही. .त्याने लग्नाला नकार दिला. कारण काय तर आता करियर करायचे आहे फक्त.
प्रिया खूपच हताश झाली, निराश झाली. मनाने पूर्ण कोलमडली. तिच्या आई बाबांना तिचे असे उदास राहणे बघवत नव्हते. त्यांनी मिहीरच्या आई बाबांना जावून भेटायचे ठरविले. ते भेटले ही . आणि त्यांनी ही मिहिर आणि प्रिया चे लग्न लवकरात लवकर करावे अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणले मिहिर ने निर्णय घेतला हे प्रिया ने च सांगितले त्यामुळे त्याचा जो निर्णय असेल तो योग्य.
न राहवून शेवटी प्रियाच्या आई वडिलांनी मिहिरच्या आई वडिलांना सांगितले की पोर पहिल्या पासून एकत्र होती . अभ्यास , एकमेकांची काळजी , बाहेर एकत्र जात , विश्वास होता त्यांच्यावर, पोरांचे प्रेम सगळे माहिती होते. आपण ही समंती दिली होती त्यांना. लग्न ही करणार हे नक्की होते. पण तरी कधी तरी मध्ये हे प्रेम पुढच्या स्टेप ला गेले. मन, भावना आणि शरीर ही एकत्र आली. त्यातून प्रिया आणि मिहिर करिता खरे तर आनंदाची बातमी की ते आई बाबा होणार..पण हे लग्नाआधी. पण अचानक मिहिर ने लग्नाला ही नकार दिला. त्याला या गोष्टीची कल्पना ही दिली प्रियाने पण तो नाहीच म्हणाला .. उलट तिला मूल नको असेल तर abortion कर म्हणाला.
पण प्रियाने बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला आहे. म्हणून तुम्ही तरी समजवा मिहिर ला असे त्याच्या आईबाबांना सांगितले . पण उलट ते प्रीया ला दोष देवू लागले. तिला समजत नव्हते का ती स्त्री असून अशी कशी काय वाहवत गेली. तिचा दोष आहे. आता आम्ही काहीच करू शकत नाही. आणि आम्ही नाही त्या मुलाचा नातवंडं म्हणून स्वीकार करू शकत. कारण आमचे नातेवाईक , समाज काय म्हणेल आम्हाला. सगळे नावे ठेवतील. त्यामुळे मिहिर सांगतो ते बरोबर आहे.
प्रिया आई बाबांना घेवून आली . आता कोणाकडे ही कसली भिक मागू नका म्हणाली. मी निर्णय घेतला आहे बाळाला मी जन्म देणार. आई बाबा ही घाबरले .लोक काय म्हणतील , शेजारी पाजारी , नातेवाईक काय म्हणतील . प्रिया म्हणाली ते काय म्हणतील याचा विचार मी करणार नाही. प्रिया ने गोंडस बाळाला जन्मदीला ही . आजूबाजूचे , नातेवाईक चार दिवस काही तरी कुजबुज केली. नंतर कोणाला ही काही देणे घेणे ही नव्हते. मिहिर ने जेव्हा प्रिया चे आणि बाळाचे फोटो बघितले तेव्हा मात्र त्याला ही राहवले नाही. तो परदेशातून परत आला आणि रीतसर लग्न ही केले त्याने प्रियाशी. हे जेव्हा लोकांना समजले तेव्हा ही लोकांना काही देणे घेणे नव्हते.
म्हणूनच सांगते की, सिरियस व्हा आतातरी!! कारण कोणालाही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काही देणं घेणं नाही. आपण मात्र कायम इतरांचे विचार करत असतो .लोक काय म्हणतील. आपल्या मुलाला इंजिनिअर करायचे हे पहिल्या पासून ठरले पण त्याला कमी मार्क्स पडले तरी त्याने इंजिनिअर व्हावे का तर आपण सगळ्यांना सांगत होतो. लोक क्षणात विसरून ही जातात हो . तुम्ही तुमच्या मुलाला इंजिनिअर करा नाही तर डॉक्टर , तो पास झाला तर वाहवा. नापास झाला तर अरेरे . एवढेच पण तेही तोंडदेखले. त्यांना काहीच फरक पडत नसतो. किंवा अगदी तुमचा मुलगा बोर्डात आला तरी त्यांना काही फरक पडत नाही. मात्र तुम्ही खूप आनंदी होता. सगळ्यांना पेढे , पार्टी देता थोडे दिवसांनी लोक तेसुद्धा विसरून जातात. कारण प्रत्येक जण स्वतच्या आयुष्यात व्यस्त आहे. प्रत्येक जण आज जगण्याच्या धडपडीत आहे. नोकरी , बढती , वाढती स्पर्धा , यश अपयश , नोकरी गेली दुसरी मिळविणे , त्या करिता स्ट्रगल, घर , संसार ,मुले त्यांची शिक्षण , स्वतचं घर , गाडी याकरिता प्रसंगी कर्ज , ते फेडणे, आपली आपली मौज मजा , सगळे स्वतः मध्ये दंग आहेत. इथे वेळ आहे कोणाला तुमच्याबद्दल विचार करायला ? नाहीच मुळी च नाही.
म्हणून एकच कळकळीने सांगणे आहे की सिरियस व्हा आतातरी!! कारण कोणालाही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काही देणं घेणं नाही.तुम्ही काय करता , कसे राहता , उपाशी आहात , का रोज मेजवानी करता ,तुमची घरे किती , पैसे किती , दागिने किती ,किंवा तुम्ही किती मोठ्या पोस्ट वर आहात. अगदी देशाकरीता जरी तुम्ही कार्यरत असाल तरी लोकांचे attitude हे की त्यात काय त्यात भरपूर पैसे मिळतात. पण पैसे असतील तरी रिस्क ही असते. आणि देशसेवा हा हेतू. हे कोणीच लक्षात घेत नाही. त्यांना काही ही देणे घेणं नसते.
आपण मात्र लोक काय म्हणतील , आपण असे वागलो तसे वागलो तर आपले नातेवाईक काय म्हणतील, यश अपयश हे काही असेल तरी लोक काय विचार करतील ..यश मिळाले तर लोक खुश होतील ..आपल्या आनंदात सहभागी होतील ..किंवा अपयश आले तरी लोक आपल्या दुःखात आपले सांत्वन करतील ही अपेक्षा असते. मात्र तसे काही घडत नाही .. कारण खरेच तुम्ही काय सहन केले ,किती स्ट्रगल केले याशी लोकांस काही महत्व नसते. अगदी नवऱ्याने परदेशी जावून तिकडे कसे हाल , मग राहण्या खाण्या पासून ,नोकरी मिळविणे असेल , ती टिकविणे त्यातून पैसे कमविणे , गरजा भागविणे. मग पैसे जास्त कमवून घरी पाठविणे ..आपल्या कुटुंबाला सुखी समाधानी , secure Life देणे हे पुरुष आपले कर्तव्य समजत असला तरी त्याचे कुटुंब त्याचे struggle समजून घेणार नाहीत तर केवळ त्याने पाठविलेल्या पैशातून आरामात आणि secure Life कसे जगता येईल याचा उपभोग घेतील. जर घरचे असे असतील तर बाहेरच्यांना तरी तुमच्या personal life बद्दल काय देणे घेणे असणार.
कोसळणाऱ्या सरींमधे सोबत असलेली छत्री उपयोगी नाही हे माहीत असूनही ती “सोबत” आहे एवढाच काय तो दिलासा आपण स्वतःला देतो आणि निश्चिंत रहातो. आयुष्यातील काही नात्यांची कधी कधी तीच गत असते…
आपले चढ उतार, वेदना ह्यांना आपल्या व्यतिरिक्त कुणीच सामोरे जाऊ शकत नाही पण मग अशावेळी आपण एकटे नसून कुणीतरी सोबत आहे अशी मनाची समजूत घालावी लागते…. शेवटी नात्यांमधली भावनिक गुंतवणूक मनाला आशावादी ठेवते हेच खरं….
आयुष्य सुंदर आहे . तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने जगा. बाकी कोण काय म्हणेल , इतरांना काय वाटेल याचे विचार करू नका.
सिरियस व्हा आतातरी!! कारण कोणालाही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काही देणं घेणं नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूपच छान आणि वास्तववादी
It’s real fact .no one stand for you .
Khup Chan Kharech Aahe Konala Kahi Vatat Naahi
Amazing keep it up
👌🏻👍🏻
Khup chan lihile ahe. True lines
Khup sunder ahe lekh 👌👌apratim