Skip to content

कोणाची मनापासून काळजी घेताना आपला वापर तर होणार नाही ना, याचा नक्की विचार करा.

कोणाची मनापासून काळजी घेताना आपला वापर तर होणार नाही ना, याचा नक्की विचार करा.


पुजा सातपुते


निसर्गाने माणसाला बऱ्याच भावना प्रदान केल्या आहेत. त्यातली एक भावना म्हणजे काळजी घेणे. सगळ्याच जणांना आपले जे खास असतात, जवळचे असतात त्यांची काळजी असते. काही जण ती खुले पणे दाखवतात तर काही पाठी राहून काळजी करतात.

जेव्हा कोणी काळजी करणारं असतं तेव्हा आपल्यालाही बरं वाटतं. एक प्रकारे सेक्युर वाटतं आणि आपल्याला जेव्हा त्या व्यक्तीच्या काळजी घेण्याची जाणीव असते तेव्हा त्या व्यक्तीला पण समाधान मिळतं.
बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आपण काही लोकांची खूप काळजी करतो पण त्या लोकांना त्याची जाणीव नसते.

ते आपल्याला ग्रांटेड घ्यायला लागतात आणि आपल्या साध्या स्वभावाचा फायदाही घेतात. आपण या लोकांसाठी खूप काही करतो, कितीही कठीण परिस्थिती असो, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा सगळं ठीक होतं तेव्हा ही लोकं सहजपणे विसरून जातात आणि आपल्याला जेव्हा मदतीची किव्हा सपोर्टची गरज लागते तेव्हा ते आपल्याला इग्नोर करतात.

आपल्याला साथ नं देणारे जेव्हा जवळचे नसतात तर एवढा त्रास होत नाही पण जेव्हा ते आपले खास असतात तेव्हा आपलं मन दुखावतं. ज्या लोकांसाठी एके काळी जीव ओतलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते ते जेव्हा असे वागतात तेव्हा आपोआपच आपल्याला आपल्या स्वतःचा राग यायला लागतो. हळू हळू आत्मविश्वास कमी व्हायला लागतो, डिप्रेशन येतं आणि लोकांबद्दल असलेला विश्वास निघून जातो. सगळी लोकं अशीच असतात असं वाटायला लागतं आणि नकळत जी लोकं आपली खरंच मनापासून काळजी करतात आपल्याकडून त्यांचं मन दुखावलं जातं.

या सगळ्या प्रोसेस मध्ये आपण विनाकारण आपलं व आपल्या जवळच्या लोकांचं आयुष्य खराब करतो. त्यापेक्षा आपण जर माणसं ओळखून काळजी घेतली तर किती बरं होईल. कोणाची मनापासून काळजी घेताना आपला वापर तर होणार नाही ना हा विचार जर अगोदर केला तर आपोआपच सगळं सोपं होईल.

आपण जर खूप समजूतदार असलो तर असं वागायला कठीण जातं आणि त्रास होण्याची शक्यता जास्त असते कारण समोरच्याने काहीही केलं, कितीही आपलं मन दुखावलं तर आपल्यात त्यांना माफ करण्याची वृत्ती असते आणि हाच समजूतदारपणा आपल्याला नडतो. म्हणून जी लोकं आपल्या फीलिंग्सला रेसिप्रोकेट करतात, जे आपल्याला समजून घेतात त्यांच्याशीच समजूतदारपणे वागायचं. असं केल्याने आपले बरेच प्रॉब्लेम्स संपतात आणि आपलं मनही दुखावलं जात नाही.

मुख्य म्हणजे आपण जर पहिले स्वतःची काळजी घ्यायला शिकलो तर आपण आपल्यात सेल्फ रिस्पेक्ट निर्माण करतो, एक बाउंडरी बनवतो म्हणजे कोणीही आपला गैरफायदा घेऊ शकत नाही.

आयुष्यात स्वतःसाठी आणि इतरांसाठीही काही रूल्स बनवा आणि त्यांना पाळा म्हणजे तुम्हाला कोणाच्याही वागण्याचं दुःख जाणवणार नाही. आपल्या लोकांची काळजी नक्कीच घ्या पण कोणालाही तुमचा फायदा घेऊ देऊ नका. असं केल्याने तुम्ही नेहमी खुश राहाल आणि तुमचं आयुष्याही सिम्पल राहील.

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. स्वतःची व आपल्या खास लोकांची काळजी घेऊन ते जरूर सुंदर ठेवा पण कोणालाही तुमचं मन दुखवण्याचा आधिकार देऊ नका. विनाकारण मन दुखवून घेऊ नका, डिप्रेस होऊन आपलं सुंदर आयुष्य खराब करू नका. अश्या लोकांकडे बघा जे तुम्हाला मानतात आणि प्रामाणिक पणे तुमची काळजी करतात.

कारण तुम्ही दुःखी राहिलात तर त्यांना वाईट वाटणार आणि नकळत तुम्ही त्यांच्या काळजी करण्याचा गैरफायदा घेतल्या सारखं होणार. योग्य व्यक्तींच्या मदतीने आयुष्याला योग्य बनवा. आपल्या जवळच्या सगळ्यांची नक्कीच काळजी घ्या पण स्वतःला त्रास न करता आणि आपला वापर तर होत नाही आहे ना हा विचार करून.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!