Skip to content

किरकोळ गोष्टींची केलेली चिंता आपल्या आयुष्यात नवीन काहीही घडू देत नाही..

किरकोळ गोष्टींची केलेली चिंता आपल्या आयुष्यात नवीन काहीही घडू देत नाही..


मयुरी महाजन


चिंताही बहुतेकदा काल घडलेल्या गोष्टींविषयी ,भविष्यात घडणाऱ्या गोष्टींविषयी, असलेली दिसून येते, परंतु श्रीकृष्ण म्हणतात, जीवन हे भूतकाळातही नाही ,आणि भविष्यकाळातही नाही, जीवन हे तर वर्तमान काळ या क्षणांमध्ये लपलेले आहे, त्यामुळे आपण आपल्या वर्तमान काळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा ,

परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे ,या गोष्टी आपल्याला कितीही कळत असल्या तरी, वळत मात्र नाही ,का ???कारण नाही म्हटलं तरी आपल्याला प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता लागलेली दिसून येते, पण या ठिकाणी आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, की जर चिंता केल्याने आपले प्रश्न सुटणार असतील ,समस्या सुटणार असतील, तर चिंता जरूर करा ,परंतु चिंता करून, काळजी करून, जर ते प्रश्न सुटणार नसतील ,तर आपल्या चिंता करण्याचा उपयोग तरी काय ????

चिंता ही मानवी स्वभावाच्या ठाई असलेली भूमिका आहे ,जी विविध पैलूंमध्ये मोडली जाते, व व्यक्ती परत्वे ,त्याच्या वयापरत्वे तिचे कमी अधिक स्वरूपही बघायला मिळते, चिंतेचे काही प्रकार पडतात ,त्यात वास्तविक चिंता, अवास्तविक चिंता, सामाजिक चिंता, आवड आणि निर्णय याविषयी वाटणारी चिंता,

चिंता ही काही प्रमाणात व्यक्तीला पुढे जाण्यासाठीची एक प्रेरणा सुद्धा असते, परंतु ही चिंता जेव्हा वास्तविक चिंतेत मोडते, तेव्हा ती प्रेरणाचे काम करते ,जसे की करिअर विषयी वाटणारी चिंता ,व्यक्तीला अभ्यास करायला भाग पाडते ,व आपल्याला यामध्ये स्वतःला झोकून द्यायचे आहे ,असा स्वतःला दिलेल्या संदेश व्यक्तीच्या कन्फर्ट झोन मधून त्याला बाहेर पडायला भाग पाडतो ,

कसलीचं चिंता नाही, असं अजिबात नाही, कारण कमी अधिक प्रमाणात चिंता ही प्रत्येकाला असते, मग त्यात लहान बाळ असो ,किंवा मोठी व्यक्ती असो, फक्त चिंता ही अति चिंता होऊ नये ,म्हणून काळजी घ्यावी ,कारण अति होणारी कुठलीही गोष्ट माणसासाठी त्रासदायक ठरत असते ,

आपण बघितले की माणूस चिंता करतो ,बऱ्याच प्रकारांमध्येही चिंता करतो, परंतु काही वेळेस चिंता किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा केलेली आढळते ,ज्या गोष्टी खरंतर चिंता करण्यासारख्या नसतातच, अशा किरकोळ गोष्टींची केलेली चिंता, हे आपल्या आयुष्यात नवीन काहीही घडू देत नाही ,

बघा जीवन आपणही जगतो, जीवन प्राणी मात्र सुद्धा जगतातच, आपण कधी ऐकलाय का??? की प्राणी चिंतेत आहे, भावना त्या प्राणीमात्रांना सुद्धा आहेत, त्यात शंका नाही, पण ते चिंता करून आपली शक्ती वाया घालवत नाही ,म्हणूनच ते त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांचं त्यांचं कार्य ,अगदी आनंदाने पार पाडतात,

कारण त्यांना कुणाच्या पुढे जायचे नसते ,नाही कुणाच्या मागे राहायचे असते, ते फक्त त्यांच्या क्षमता व त्यांच्या गुणधर्मानुसार आचरण करतात ,त्यामुळे त्यांना कसलीचं चिंता उरत नाही ,खरंतर प्राण्यांना आपण जीव लावला ना, ते त्यापेक्षा दुप्पट आपल्याला देतात, पण कधीच त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेवू नये,

हे असं झालं नाही तर, ते तसं झालं नाही तर, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, अरे जेव्हा व्हायचं असेल, तेव्हा होईलच आपण कशाला उगाच त्याची चिंता आतापासून करायची ,आणि ज्या किरकोळ गोष्टीतून काही नावीन्य उत्पन्न होणार नाही ,त्याची फीजूल चिंता करण्यात अर्थ तरी काय???

काही माणसे फार चिंता करतात, पण ज्या किरकोळ गोष्टींची ते चिंता करत होते, त्या गोष्टी अगदी सहजरीत्या घडून जातात ,आणि मी उगाच चिंता करत होतो ,प्रत्येक गोष्टींची चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करूया….. काहीतरी नावीन्य नक्कीच हातात लागेल, नाहीतर चिंतन करण्याची साधना तरी नक्कीच अवगत होईल, जर आपल्या आयुष्यात नवीन काही घडावं असं वाटत असेल, तर किरकोळ गोष्टींची चिंता करणे सोडून द्या, कारण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, आपण त्या जरूर करायला हव्यात, परंतु ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्याची चिंता न करता, त्यांचा स्वीकार करावा….


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “किरकोळ गोष्टींची केलेली चिंता आपल्या आयुष्यात नवीन काहीही घडू देत नाही..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!