Skip to content

क्षुल्लक गोष्टींवर आपल्याला नाराज होण्याची अजिबात गरज नाही.

क्षुल्लक गोष्टींवर आपल्याला नाराज होण्याची अजिबात गरज नाही.


हर्षदा पिंपळे


रमा म्हणजे एक चोवीस वर्षाची तरूणी. दिसायला सुंदर आणि स्वभावानेही तितकीच सुंदर.थोडी कणखर तर थोडी हळवी.कुणी काही बोललं तर क्षणात हळवी व्हायची आणि क्षणात चार शब्द देखील सुनवायची.सगळं चांगलं असून एक रमा क्षुल्लक गोष्टींवर चिडायची. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींमुळे ती पटकन नाराज व्हायची. कुणी काहीही बोललं तरी तिला ते सहन व्हायच नाही.दिवसाची सुरुवात जरी चांगली झाली तरी दिवसभरातील इतर गोष्टींमुळे ती स्वतःचा मूड मात्र खराब करून घ्यायची. त्यामुळे पुढच्या सगळ्या दिवसाची रंगतच निघून जायची.

क्षुल्लक गोष्टी ती इतक्या मनावर घ्यायची की त्याला काही मर्यादाच नसायची.तिच्या अशा वागण्यामुळे ती स्वतःचच नुकसान करून घ्यायची.तिला तिच्या घरचे समजावून समजावून वैतागले होते.पण तरीही रमा काही क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होणं थांबवत नव्हती. शेवटी जे व्हायच तेच झालं.तिचं असं नाराज होणं दिवसेंदिवस वाढतच गेलं.त्याचा परिणाम हळुहळू तिच्या मनावर होऊ लागला.सातत्याने क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होणं तिला खरच महागात पडलं होतं. आयुष्यातील कितीतरी चांगले क्षण तिने वाया घालवले होते.

असो…ही झाली रमाची गोष्ट.पण आपल्याही आयुष्यात असच घडतं नं…?

काही जणांना इतरांना विनाकारण डिवचण्याची सवय असते.त्यामुळे नेहमीच आपण आपल्या नाराज होण्यावर कंट्रोल करू शकतो असं नाही. अनेकदा इतरांच सतत त्रास देणं आपल्याला सहन होत नाही. जरी गोष्टी क्षुल्लक असल्या तरी त्या गोष्टी आपल्याला जास्त वाटतात. अशावेळी क्षुल्लक गोष्टींवरूनही कित्येकजण पटकन नाराज होतात. स्वतःचा मूड खराब करून घेतात. इतकच नाही तर त्याच क्षुल्लक गोष्टींचा परिणाम कामावर आणि वागण्यावरही होतो.

आणि अनेकदा सातत्याने नाराज होणं किती घातक ठरू शकतं याचा कित्येकांना अंदाजच नसतो.सारखं सारखं नाराज होणं कितपत योग्य आहे…? मुळातच जी गोष्ट आपल्या हेल्थसाठी चांगली नाही तीच गोष्ट आपण सातत्याने का करतो याचा विचार करून पहा.क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होणं,चिडणं,रागावणं नंतर नंतर किती त्रासदायक ठरू शकतं याचाही विचार एकदा अवश्य करायला हवा.क्षुल्लक गोष्टीवरून नाराज होणं क्षुल्लक वाटत असेल तर तसं अजिबात समजू नका.

कारण सातत्याने मूड स्विंग करून घेणे,एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून सतत चिडचिड करून घेणे म्हणजे एकप्रकारे स्वतःला मानसिक त्रास करून घेण्यासारखच आहे.कधीतरी नाराज होणं ठीक आहे. पण सातत्याने नाराज होणं काही फार चांगल नाही. उलट सारख सारख नाराज होण्यापेक्षा त्या क्षुल्लक गोष्टी इग्नोर करायला शिका.कधी कधी गोष्टी दुर्लक्षित केलेल्या चांगल्या असतात. फक्त इतकच कोणती गोष्ट क्षुल्लक आहे आणि कोणती गोष्ट क्षुल्लक नाही यातील फरक समजायला हवा.कधी कधी यातील फरक समजतच नाही आणि म्हणूनच नको त्या गोष्ट घडत जातात.

खरच,आयुष्य पाहिलं तर छोटं आहे आणि पाहिलं तर मोठ आहे. आता आयुष्य छोटं असेल तर ते क्षुल्लक गोष्टींवर नाराज होण्यात घालवायच की आहे ते क्षण जगण्यात घालवायच हे समजायला हवं.आणि जरी आयुष्य हे मोठं असलं तरीही ते क्षुल्लक गोष्टींवर नाराज होण्यात का घालवायच…? विस्तीर्ण अशा आयुष्याची आपण मजा घ्यायला हवी नं…?पूर्ण आयुष्य क्षुल्लक गोष्टींवर नाराज होण्यात घालवलं तर काय अर्थ आहे जगण्याला…?




क्षुल्लक गोष्टींवरून तुम्हीदेखील नाराज होताय…?तर थांबा…अशा क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होण्याची अजिबात गरज नाही.कधी कधी गोष्टी सैल सोडून दिलेल्या केव्हाही चांगल्या असतात. नाराज झालो तर नुकसान आपल्या आयुष्याच होणार आहे. डिवचणारा डिवचत राहतो म्हणून आपणही सतत नाराज व्हायलाच हवं का…?तर नाही. आपण आयुष्यातील काही क्षुल्लक गोष्टींकडे आवर्जून दुर्लक्ष करायला हवं.तरच आयुष्यातील पुढचे क्षण मजेत, आनंदात घालवता येतील. नाहीतर सगळं आयुष्य नाराज होण्यातच निघून जाईल.


So… विचार करा.आणि सतत नाराज व्हायच की क्षुल्लक गोष्टी सोडून स्वतःवर लक्ष केंद्रित करायच हे ठरवून घ्या.इतकं सुंदर आयुष्य आहे ते असं क्षुल्लक गोष्टींमध्ये वाया जाऊ देऊ नका.ते हसतखेळत जगायला शिका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!