खरंच वेळ बदलते की वेळेनुसार लोकं बदलतात, नेमकं काय घडतं??
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. एकदा आलेली वेळ आपल्या आयुष्यात परत कधीच येत नाही. तसच आता आपण ज्या परिस्थितीत आहोत ती पण शेवटपर्यंत तशी राहील अस नसत. म्हणजेच काय तर वेळ सतत बदलत राहते. ती कधीही सारखी राहत नाही. आत्ता दोन खोल्यात राहणारा माणूस कधी श्रीमंत होईल आपण सांगू शकत नाही. तसच एखादा गर्भश्रीमंत माणूस कधी कंगाल होईल याची पण आपण कल्पना करू शकत नाही.
थोडक्यात काय, तर वेळ कधीही सारखी असत नाही. ती सतत बदलत राहते. म्हणूनच तिला इतकं महत्त्व आहे.
प्रश्न हा आहे की या बदलते वेळेनुसार माणूस पण बदलतो का?
तर याच उत्तर आहे हो पण आहे आणि नाही पण आहे. म्हणजेच आपण अस म्हणू शकत नाही की वेळेनुसार सर्वच माणसं बदलतात. अस म्हटल तर ते अतिसामान्यिकरण होऊ शकत. जे चूक आहे. कारण सर्वच लोक वेळेनुसार बदलत नाहीत. आपल्या आयुष्यात अशी काही निवडक लोक असतात जी आपल्यासोबत अगदी आयुष्याच्या सुरुवातीपासून असतात. अगदी लहानपणीपासून मग ते आपले पालक, आपली भांवंड किंवा आपले मित्र असतील.
म्हणून आपण म्हणतो देखील आणि आपल्याला अस ऐकायला पण मिळत, फक्त सुखात नाही तर जे सुख दुःखात आपल्या सोबत असतात ती खरी आपली माणसं. वेळ कोणाला सांगून येत नसते, पण या वेळेत आपल्या सोबत जी असतात, आपल्याला जी धीर देतात ती आपली असतात.
संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेला संजू हा चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. त्याच्या आयुष्यातला संघर्ष चढ उतार त्यामध्ये दाखवले आहेत. आईचा मृत्यू, व्यसनाच्या आहारी जाणं ते तुरुंगवास सर्व काही त्यात दाखवले आहे. पण या सगळ्यामध्ये त्याच्या सोबत असतो तो त्याचा मित्र कमली. तो त्याची शेवटपर्यंत साथ देतो. त्याला हिम्मत देतो. अशीच काही लोक आपल्या आयुष्यात असतात जी कोणताही स्वार्थ मनात न ठेवता फक्त आपुलकीच्या नात्याने आपल्यासोबत असतात.
याच्याउलट काही लोक असतात जी फक्त आपली वेळ चांगली असते तेव्हा आपल्या सोबत राहतात, जेव्हा त्यांचा काही फायदा होत असतो, त्यांना आपल्याकडून काही मिळत असतो तोपर्यंत ते आपल्या बरोबर राहत. पण आपल्या वाईट दिवसात आपल्या सोबत राहत नाहीत. अनेकदा अस होत की आपण काहीतरी मदतीची अपेक्षा करत असताना साधी ओळखही दाखवलं जातं नाही. याच काळात खरी माणसं समजतात. आज आपली वाटणारी कधी परकी होतात आपल्या समजत पण नाही. हीच ती लोक असतात जी वेळ बदलली की बदलत जातात. आपली साथ सोडतात.
पण मग असा फरक कसा पडतो? वाईट असो की चांगली, या वेळेनुसार काही माणसं तशीच राहतात आणि काही बदलतात. हे कसं होत? हा फरक येतो कसा? तर हा फरक आहे विचारांचा. हा फरक आहे संस्कारांचा. माणसं माणसामध्ये फरक पडत असतो तो त्यांच्या विचारांमुळे. त्यांचे जसे विचार असतात त्यानुसार माणूस वागतो. त्यामुळे वेळेमुळे माणूस बदलतो अस म्हणण्यापेक्षा माणसाच्या विचारांमुळे तो बदलत असतो. परिस्थिती, वेळ हे फक्त एक कारण असत.
म्हणून संगत करताना चांगले विचार असलेल्या माणसाशी असली पाहिजे. चांगली नैतिकता असलेल्या माणसाशी पाहिजे. तेव्हा परिस्थिती बदलली तरी तो माणूस बदलणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
