चांगला मुलगा शोधायच्या नादात आई-बाबा आपल्या मुलीसाठी एक खेळणं शोधतात?
सोनाली जे.
कोणतेही आई वडील हे आपल्या मुलांचे चांगले व्हावे हाच विचार करतात. आणि त्या दृष्टीने प्रयत्न ही करतात. कसे असते की त्यांना अनुभव जास्त असतो , बरे वाईट याची जाण असते. अगदी सांगायचे तर त्यांनी चार पावसाळे मुलांच्या पेक्षा जास्त बघितलेले , अनुभव घेतलेले असतात.
नुपूर , नील आणि नेहा तींघे भावंडे. नुपूर चे लग्न तिचे बाबा सरकारी ऑफिस मधून निवृत्त झाले आणि लगेचच नुपूर चे लग्न करून दिले. एक जबाबदारी कमी होईल म्हणून त्यांनी घाई घाईत निर्णय घेतला. मुलगा ही सरकारी नोकरी मध्ये त्यामुळे तसे secure life बघितले. आणि तसे झालेही.
नील आणि नेहा चे कॉलेज चे शिक्षण सुरू असताना अचानक बाबांना खूप सिवियर हार्ट अटॅक आला. डॉक्टरांनी केवळ एक टक्का chances सांगितले होते. तीन DC चे शॉक देवून हार्ट परत सुरू केले होते. दोन दिवस व्हेंटिलेटर वर होते. बाबांची विल पॉवर खूप चांगली म्हणून त्यातून वाचले. पण bypass surgery ने जे ब्लॉक होते ते दूर करणे हाच इलाज सांगितला डॉक्टरांनी आणि तीन ठिकाणी पूर्ण ब्लॉक होत्या नसा. बायपास झाली. त्यात ही प्रचंड त्रास झाला. जवळजवळ एक वर्ष त्यांना recovery करिता गेले. Regular रूटीन checking पुढे दीड वर्ष सुरू होते.
त्यानंतर stable झाल्यावर मात्र बाबा कायम सगळ्यांना सांगत हे माझे बोनस लाईफ आहे. आणि त्यांना त्या बोनस लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. नील चे इंजिनिअरिंग पूर्ण होवून त्याची नोकरी , लग्न .
नेहाचे शिक्षण पूर्ण करून नेहा चे कन्यादान ते असेपर्यंत स्वतः करायचे होते. नेहाच शिक्षण पूर्ण होण्याआधी च बाबांच्या मित्राची मुलगी भाग्या आणि नेहाची मोठी ताई नुपूर भेटल्या होत्या आणि त्यांचे बोलणे होवून भाग्या म्हणाली तिचा धाकटा भाऊ मीत लग्नाचा आहे. अंतर जास्त होईल .सात आठ वर्ष पण आपण इतके वर्ष ओळखतो . आपल्या बाबांची मैत्री इतकी वर्ष आहे. विचार करा.
हे जसे नुपूर बाबांच्या सोबत बोलली तसे बाबा निश्चिंत झाले. दोघा मित्रांचे बोलणे झाले. भेटी गाठी ठरल्या. मुलगा व्यवसाय करतो. आणि चढ उतार तर असतात त्याप्रमाणे income ही कमी जास्त प्रमाणात होत असते. बाबांच्या मित्राचा स्वतः चा बंगला , जॉइंट family , दोन्ही मुलींची लग्न झालेली , मोठा मुलगा सून आणि त्यांची एकच मुलगी , आज्जी , सगळे घरी कौतुक करणारे, पोळी भाजी ला बाई , धूने भांडी बाई , घरी तसे काहीच काम नाही .
नेहाला लग्न झाल्यावर शिक्षणाची परवानगी ही . त्यामुळे बाबांनी दुसरा कोणताही विचार केला नाही. मुलगी चांगली मोठ्या शहरात ही राहील. घरी एकत्र कुटुंब , जबाबदाऱ्या नाहीत , असे विचार करून नेहाला स्पष्ट सांगितले तुझे इथे लग्न ठरवितो आहे. माझे आयुष्य किती माहिती नाही. यावर नेहाने एक दोनदा सांगितले ही की बाबा माझे शिक्षण पूर्ण होवून नोकरी मिळेल मग मी लग्नाचा विचार करेन. त्यावर बाबा नाही म्हणले आणि ठाम राहिले. आपल्यामुळे बाबांना कोणता त्रास व्हायला नको म्हणून ते म्हणतील त्या मुलाशी लग्न केले.
लग्नानंतर मोठ्या शहरात , मोठ्या कुटुंबात आणि वयाने लहान असलेल्या नेहाला एकदमच आई बाबांच्या पासून दुरवल्या सारखे वाटले. सासरी आजे सासू बाईंपासून , सासू सासरे ,दिर जाऊ , नणंदा त्यांचे नवरे , मुले एकदम सगळ्यांचे स्वभाव समजून घेणे याला वेळ लागला. त्यात नवरा म्हणजे मीत अबोल , कोणतीच गोष्ट कधी मोकळेपणाने बोलणार नाही. सुरुवातीचे आनंदाचे दिवस ..प्रत्येक नव्या सुनेचे , बायकोचे काही तरी स्वप्न असते. पण हळूहळू स्वप्ने आणि सत्य यातला फरक नेहा ला खूप जवळून बघता आला , अनुभवता आला.
लग्नानंतर दोघांना अशी कोणतीच मोकळीक नाही. झोपताना ही सर्व जण एकत्र च झोपत . दिर जाऊ मात्र स्वतंत्र खोली. हनिमून काय असते हे ही माहिती नाही नेहाला कारण लग्नानंतर जवळपास एक दिवसाची ट्रीप गेले तेही सगळे मिळून . तिकडून आल्यावर सासू ने पहिले सांगितले की मंगळसूत्र काढून ठेव कारण तू लहान आहेस , कॉलेज मध्ये जाणार तू थोडे दिवसांनी. रिस्क नको. नेहाने सगळे दागिने काढून सासूबाईंना दिले.
पण अतिशय ऑर्थोडॉक्स आणि छोट्या गावातून आलेल्या नेहाला मंगळसूत्र काढून ठेव म्हणाल्यावर रडू च आले कारण त्यांच्या संस्कराप्रमाने मंगळसूत्र एकदा घातले की कायम ..मग ते पती निधन किंवा स्वतः चे निधन झाल्यावर च निघणार अशा समजुतीला , भावनांना पहिला तडा गेला. त्यानंतर लगेच दुसरा मोठा बॉम्ब स्फोट च ..सासू ने सांगितले आता तुझे शिक्षण सुरू आहे मुल बाळ होवू द्यायचे नाही. सगळे एकत्र झोपत त्यातून खरेच नेहा आणि मित चे संबंध काहीही नव्हते. नेहाला आश्चर्य वाटले मित ला कसे काही वाटत नाही. पण त्याने कधी ही कोणता विषय मोकळेपणे बोलला नाही.
गावातून इकडे आल्यावर इकडच्या कॉलेज मध्ये admission घेण्याकरिता धावपळ. पण घरात बाकी कोणी ही मदत केली नाही. निदान मीत कॉलेज मध्ये सोबत आला. फी भरताना ही नेहा ने स्वतः ची फी स्वतः भरली. पण तेही खर्चा करिता माहेरून पैसे दिले होते सोबत त्यातून.
दुसरे दिवशी सासरे म्हणले नेहाला तुझ्यात काय बघितले काय माहिती. पण एवढी चांगल्या शिकलेल्या मुलींची स्थळे आली होती तरी तुला होकार दिला. थोडेसे अजब वाटले नेहाला शांत बसली. तेवढ्यात सासरे पुढे म्हणाले . कॉलेज पूर्ण वेळ नसते. घरात झोपा काढायच्या नाहीत. आपली आपली नोकरी करायची. घरात सगळे आपले खर्च आपण करतात. तू ही नोकरी बघ.
हे सगळ्यांचे विचित्र वागणे फार त्रासदायक होते नेहाला. दिर जाऊ कशात नसत. त्यांची नोकरी सुरू त्यांच्या मुलीला मात्र सासू सासरे , नणंदा सगळे सांभाळत .नेहा वर ही ती जबाबदारी पडली.
यातली कोणती गोष्ट नेहा आई बाबांना सांगू शकत नव्हती कारण ते २५० किलो मीटर दूर, त्यांना त्रास नको. आणि घरातून नेहाला एसटीडी फोन करण्यास ही बंदी. का तर बिल येते. आई बाबांना फोन करायचा झाला तर बाहेरून करायचा . स्वतः चे खर्च स्वतः करायचे. मोजके पैसे येताना दिले होते माहेरहून किती दिवस पुरणार. मित तर कधी पैशाचे नाव ही काढत नसे.
नेहा ने मिळेल ती पहिली नोकरी पकडली. सकाळी सात ते अकरा कॉलेज मग ११.३० ते ७.३० ऑफिस , गाडी नाही , बस ला पैसे खर्च करण्यापेक्षा चालत जायची यायची .बर ते जवळ ही नाही. रोज आठ ते नऊ किलोमीटर अंतर चालत जाणे येणे. आल्यावर परत स्वैपाक. कॉलेज ला जाण्यापूर्वी स्वैपाक .कारण बाई सोडून गेली . मग मिळेल बाई शोधू असे करत ते रोजचे झाले. सगळे आवरून डबा घेवून एकदा बाहेर पडले की ८ वाजता घरी, येताना दोन दिवसाच्या भाज्या घेवून यायच्या.. आल्या आल्या पहिला स्वैपाक मग जेवण. दुसरे दिवशी ची तयारी झाली की मग अभ्यासाला बसायचे. रात्री दोन अडीच पर्यंत अभ्यास , अडीच ते पाच झोप की उठून आवरायचं कारण सकाळी सात ला कॉलेज. स्वैपाक , भाजी पोळी , कुकर सगळे करून आवरून कॉलेज मध्ये जाताना रोजची होणारी कसरत तिला करावीच लागे. दमले हा शब्दच शब्दकोशात नव्हता.
नेहाचा पगार येवू लागला तसे खर्च ही वाढू लागलं . मित चे भाड्याचे ऑफिस. त्याची मिळकत काहीच नाही. हे हळूहळू समजू लागले. पण जावू दे होईल सगळे नीट म्हणून नेहा त्याचे ऑफिस भाडे , घरखर्च स्वतः करू लागली.
घरात स्वातंत्र्य कोणतेही नाही. सगळे करून ही सासू कधी चांगले म्हणत नव्हती . नवीन म्हणून कोड कौतुक राहिले बाजूला. पण सतत मित चे काही उत्पंन नाही म्हणून कमी दर्जाची वागणूक. आणि दिर जाऊ मात्र सरकारी नोकरी म्हणून त्यांचे सतत कौतुक. या सगळ्या गोष्टी नेहाने आई बाबांपासून लपवून ठेवल्या की त्रास नको त्यांना. बाबा heart patient आहेत जपले पाहिजे त्यांना.
एकदा मात्र नेहाची काही चूक नसताना किरकोळ गोष्टीवरून सासू वाई चिडल्या. नवऱ्याने ही बाजू घेतली नाही मग मात्र नेहाचा संयम संपला. आणि ती सगळे समान घेवून माहेरी आली. सासरी एवढेच म्हणाली आई बाबांना भेटायला जाते.
घरी आल्यावर आई बाबांना न राहवून सगळे सांगितले. बाबा शांतपणे म्हणले की नवीन आहे ..समजून घे. शांत रहा. थोडं adjust करावे लागते. बरं नेहा काय काय सांगणार होती बाबांना की नवरा कमवत नाही , तीच्य मिळकतीवर खर्च मात्र करतो. त्याचे काही वाटत नाही. कधी मोकळेपणाने बोलणे नाही , अतिशय रागीट, सतत बहिणी , आई यांच्या बरोबर , पण नेहाची कधी विचारपूस ही नाही की कधी काय गरज आहे हे समजून घेणे नाही. सासू सासरे , दिर जाऊ सगळेच असे कुठे ना कुठे त्रास देणारे. संगण्याचा प्रयत्न केला ही.
यावर बाबांचे उत्तर हेच की मित चे आता उत्पन्न नाही .तू मिळवीत आहेस तू खर्च कर. ताटात सांडले काय वाटीत काय. दोघांचं ही कर्तव्य आहे. आता तू कर .त्याला मिळेल तेव्हा तो करेल. पण नेहाने हे ही सांगण्याचा प्रयत्न केला जवळीक ही नाही. तरी बाबांचे होईल सगळे. नेहाने तिकडे जाणार नाही सांगितले तेव्हा मात्र बाबांनी निक्षून सांगितले की , थोडे सांभाळून घे. Adjust कर. पण ते घर तुझे आहे . आता तू तिकडेच राहायचे. एवढेच काय सासरी फोन करून सांगितले की नेहचे काही चुकले असेल तर माफ करा तिला या गाडीने बसवून देत आहे.
चांगला मुलगा शोधायच्या नादात आई-बाबा नी आपल्या ओळखी चे स्थळ म्हणून दिले नेहाला पण त्यांनाही ते जाणविले की आपण चुकलो . आपल्या मुलीसाठी एक खेळणं शोधल. कारण ज्याला स्वतः चे अस्तित्व नाही , विचार करण्याची क्षमता असून घरातील इतर जे सांगतील तसेच विचार आणि वर्तन , घरातली कामे करायला नेहाला मात्र मदत नाही. आईला मात्र सगळी मदत .. कुठे घेवून जायचे असेल तर तिला घेवून जाणार .बहिणी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे. एकही मित्र नाही. त्याच्या काम , नोकरी पैसे यावरून काही बोललं की चिडचिड , अगदी प्रसंगी स्वतः मारून घ्यायचे नाही तर नेहाला मारायचे ..हे सुधा सहन करत होती नेहा. पण तिचे संयमाचे बांध तुटू लागले. कॉलेज मध्ये कायम distinction मिळविणारी नेहा , तिची मेहनत , प्रयत्न तिच्या गोष्टींचं कौतुक सोडा. पण माणूस म्हणून पण वागणूक देत नव्हते.
हळूहळू सगळ्यांचे वागणे खटकू लागले नेहाला तरी बाबांच्या करिता शांत राहत होती. आणि एके दिवशी न सहन होवून बाबांना पत्र लिहिले. आणि आता सहन होत नाही सांगितले. बाबांनी तिला शनिवार रविवार सुट्टीचा ये सांगितल्यावर हो म्हणाली पण घरच्यांनी तिला पाठविले नाही. काही तरी घरचा कार्यक्रम हे कारण सांगून पाठविले नाही.
चांगला मुलगा शोधायच्या नादात आई-बाबा आपल्या मुलीसाठी एक खेळणं शोधला हे जाणविले बाबांना . तो धक्का सहन झाला नाही . आणि बाबा त्या शनिवारी नेहाची वाट बघत होते पण ती आली नाही. बाबाच अचानक त्याच शनिवारी रात्री गेले . कायमचे सोडून . नेहाला एव्हढा धक्का बसला की माझ्यामुळेच ते गेले. मी सांगितले नसते तर त्रास झाला नसता ही गोष्ट आयुष्यभर टोचणी देते तिला.
बाबांच्या नंतर आई एकटी काय करणार होती. तीच दुःखात. त्यामुळे नेहाला आहे तिथे आणि तसे राहावे लागले. आता दुःख सांगायला ही कोणी नाही. बरेचदा आई वडिलांना अनुभव असला तरी त्यांचे निर्णय ही चुकू शकतात. आपले म्हणून त्यांनी आपल्या मित्रावर ठेवलेला विश्वास चुकीचा होता.
अनेक मुलं आणि मुलींच्या बाबतीत असे घडते की मुलांना , मुलींना काय कळते .त्यांना काही अनुभव नाही, आपण करू ते योग्य च असते. या विचाराने आई वडील कोणाच्या तरी ओळखीने , विश्वास ठेवून , दिखावा बघून , किंवा लोक जे present करतात त्यावर भुलून चांगला मुलगा शोधायच्या नादात आई-बाबा आपल्या मुलीसाठी एक खेळणं शोधतात.
खरे तर आई वडिलांचा हेतू चांगला असतो. पण अतिशय जागरूक राहून , बारकावे तपासून मगच त्यांनी निर्णय घ्यावा. नाही तर आजकाल मुले मुली आपला निर्णय घेत असतात. जोडीदार शोधत असतात. त्यावर विश्वास ठेवून , त्यांना समजून घेवून त्यांचा निर्णय ही विचारात घेणे जरुरीचे असते. आणि त्यांना संधी देणे ही गरजेचे असतें. जबाबदारी पडली की ते आपोआप योग्य निर्णय घेतात हे लक्षात घेतले पाहिजे पालकांनी ही.
नेहा सारख्या अनेक मुली आहेत ज्यांच्या बाबतीत चांगला मुलगा शोधायच्या नादात आई-बाबा आपल्या मुलीसाठी एक खेळणं शोधतात.
आणि आयुष्यभर मुलींना भोगावे लागते. नाही तर मारहाण , घटस्फोट नाही तर एका घरात राहून केवळ कर्तव्य करायची .त्यात मुले झाली की होईल सगळे नीट ही एक चुकीची समजूत मोठ्यांची. जे आयुष्यभर मुलीला सांभाळावे आणि सहन करावे लागते.
लग्न , जोडीदार हे खूप अवघड काम आहे . योग्य जोडीदार मिळणे खरेच खूप पारख करावी लागते. अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. शिक्षण , खरे income ,मुलाची कर्तबगारी , हुशारी , मित्र , बँक बॅलन्स , घरचे वातावरण , हे थोडे जवळून अनुभव घेवून , शेजारी पाजारी विचारपूस करून, चौकशी करून , मध्यस्थां मार्फत बोलणी करून व्यवहार स्पष्ट करून मग कोणते निर्णय घ्यवेत हे सगळ्यात गरजेचे आहे. त्यामुळे एखाद्या मुलीचे आयुष्य बरबाद होणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
