खबरदार !! कमी झोप घ्याल तर दिवसभरात हे धोके पत्काराल !!
सोनाली जे.
झोप म्हणले की काही लोक जाम खुश होतात. अहाहा , आमची झोपायची कधी ही तयारी असते असे म्हणणारे. तर काही असे असतात की त्यांना विचारले आज सुट्टी चे काय करणार ? किंवा काल सुट्टी होती काय केले ? काही नाही मस्त झोप काढली असे म्हणणारे ही झोप प्रिय खूप आहेत. तर याउलट मला झोपच नाही. झोप कमी आहे .. झोप झाली नाही म्हणून disturbed आहे असे म्हणणारी ही आहेत.
सुखाची , आनंद देणारी झोप का बरे प्रिय असते लोकांना ? एक तर दिवसभराचा शिणवटा , दिवसभराची शारीरिक आणि मानसिक धावपळ , ताण – तणाव या सगळ्यातून रिलॅक्स होण्याकरिता.. शरीर आणि मन या दोघांना ही विश्रांती मिळण्यासाठी झोप ही अत्यंत गरजेची असते.
बरेचवेळा काय होते की , चला आता उद्या सुट्टी आहे , उद्या आरामात उशिरा उठायचे आहे असे विचार करूंन रात्री उशिरापर्यंत जागरण केले जाते. टीव्ही वरचे कार्यक्रम , एखादा आवडता सिनेमा बघणे , मोबाईल वर , सोशल मीडियावर active राहणे , तर कधी आवडते छंद रात्री जागून पूर्ण करणे. तर कधी बाहेर मित्र मैत्रिणींच्या सह दंगा मस्ती , कधी night out , त्यावेळी गप्पा टप्पा , यात जागरण केले जाते. कमी झोप घेतली जाते. असा विचार केला जातो की जावू दे उद्या सुट्टी तर आहे. उद्या जास्त वेळ झोप घेवूया. म्हणून आजची झोप कमी होते.
खबरदार !! कमी झोप घ्याल तर दिवसभरात हे धोके पत्काराल !!झोपेचे महत्व आणि अपुऱ्या झोपेमुळे होणारे परिणाम :
१. एखाद्या वेळेस अपुरी झोप झाल्यास आपल्या वागण्यावर , आपल्या कामावर, आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम दिसून येतो.
२. अपुऱ्या झोपेमुळे आपल्या मानसिक स्थितीवर ही परिणाम होत असतो.
३. अन्न, पाणी ही जशी शरीराची मूलभूत गरज आहे. तसेच झोप ही सुधा आपल्या शरीराची एक मूलभूत , जैविक गरज आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरात जैविक बदल घडत असतात आणि अपुरी झोप झाली तर त्या होणाऱ्या जैविक बदलांमध्ये ही गडबड होते.
४. अपुरी झोप किंवा कमी झोप होणे म्हणजे नेमके काय होते :
झोपेची सुरुवात म्हणजे झोप लागण्यातच अडथळे येणं रात्री बराच काळ जागं राहाणं, झोपेविना पडून राहाणं सकाळी लवकर जाग येऊन नंतर झोपच न येणं रात्री वारंवार जाग येणं. यात सततची अस्वस्थता जाणवते . मन अस्वस्थ होतेच. वेगवेगळे विचार येत राहतात. तर कधी भीती वाटते. कधी त्यात भविष्याचे विचार मनाला सतावत राहतात . त्यातून चिंता , ताण , तणाव आणि निराशा ही वाढू शकते.
कारण फार पुढचा विचार करून आता जे आपल्या हातात आहे. जे सुख , शांतता , आनंद आहेत ते आपण गमावून जे नाही त्याचा विचार करण्यात आपली energy आणि वेळ ही घालवतो. आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ही घालवून बसतो. कारण मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध आहे. मनाने खचला तर शरीर साथ देत नाही. शरीराने खचला तर मन strong असेल तर शरीर ही साथ देते.
कमी झोप घ्याल तर दिवसभरात हे धोके पत्काराल !!
१. सततची अस्वस्थता : नॉरएपिनेफ्रिन, गाबा, डोपामिन, सिरोटोनिन ही चार प्रमुख संदेशवाहक रसायनं आपल्या वर्तनावर परिणाम करत असतात. आनंदाची भावना, सुखाची भावना, उत्साह वाटण्यासाठी, निराश करणाऱ्या भावनेविरोधात लढण्यासाठी तसेच सकाळी फ्रेश वाटावे यासाठी या रसायनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
कमी झोप झाली तर ,दिवसाची सुरुवात च मरगळ किंवा अनिच्छे सारख्या अवस्थेत होते. जाग आली तरी अंथरुणातून उठावे वाटत नाही. पडून रहावे वाटते. आता उठू असे मनाला बजावत राहिलो तरी उठण्याची इच्छा होत नाही. किंवा ती क्रिया होत नाही. अंग , खांदे , जड झाल्यासारखे वाटते. कंटाळा आणि उदास असल्यासारखे वाटू लागते.
२. आळस येतो . झोप कमी झाली तर मन आणि शरीर दोन्ही ला ही आळस येतो. काहीच करण्याची इच्छा होत नाही.
३. डोकेदुखी , अर्धशिशी , डोळ्यांवर ताण , झापड येणे : कमी झोप झाली तर त्यामुळे सकाळी उठल्यावर डोकेदुखी सुरू होते. फ्रेश किंवा उत्साही वाटत नाही. काही वेळेस अर्धशिशी चे त्रास सुरू होतात. तर अपुऱ्या आणि कमी झोप घेण्यातून डोळ्यावर ताण येतो , झापड येते. चष्मा ही लागतो. ते बरेचवेळा समजत नाही त्यामुळे डोकेदुखी सुरू राहते. यातून आपल्या हातात असलेले काम बिघडण्याची शक्यता जास्त असते.
उदाहरणार्थ : झोप झाली नसेल आणि आपण कामानिमित्त बाहेर पडलोच तर जर गाडी चालवताना डोळ्यावर ताण पडला , दुचाकी असो अथवा चारचाकी असो . ती चालवताना डोळ्यावर ताण आला , झापड आली तर अपघात होण्याची शक्यता जास्त असते. आणि मग त्या अपघातातून होणाऱ्या परिणाम यांना तोंड द्यावे लागते.
४. सततचे विचार डोक्यात येत राहतात : obsessive compulsive behaviour : झोप झाली नाही म्हणून आपली झोप झाली नाही हेच सतत विचार डोक्यात येत राहतात. आणि मग आता थोडी झोप काढावी म्हणजे मग फ्रेश वाटेल हे विचार येवून तशी कृती करण्याचा प्रयत्न होतो. परंतु मग दिवसभरात पुढची कामे , schedule , अभ्यास , शाळा time table बिघडेल याची भीती वाटून धड झोपही लागत नाही.
आणि सतत तेच विचारचक्र सुरू राहते. झोप न झाल्यामुळे तसेच सेराटोनिन, डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन सारखी रसायनं कमी पडल्यामुळे ‘ जड डोके, आकसून गेलेले अंग व मरगळलेले मन अशी अवस्था होईल. मनात विचारांची संख्या वाढेल, त्या विचारांमध्ये नकारार्थी विचार वाढतील. विचारांची गर्दी वाढल्याने मानसिक थकवा जाणवेल. विसरल्यासारखे होईल. प्रत्येक कामात ते बिघडेल की काय अशीच शंका येत राहील. मनाला जर काही विचार टोचले की तेच विचार परत परत येत राहातील. शरीरात एखादी वेदना, दुःख असेल तर त्याची तीव्रता आहे त्यापेक्षा वाढलेली वाटेल. जुनी दुःखे, कटू आठवणी मनात परत परत रुंजी घालतील.’
५. एकाग्रता आणि स्मरणशक्ती यावर विपरीत परिणाम होतो : – झोप झाले नाही म्हणून मनात अस्वस्थता जाणवू लागते. शरीर ही मर्गळते. डोक्यातल्या विचारांमुळे मन एकाग्र होवू शकत नाही आणि बाकी विचारात अनेक गोष्टी विसरायला होतात. स्मरणशक्ती वर परिणाम होतो.
६. झोपेमुळे शरीरातील अवयव रिलॅक्स होतात. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील अवयव आणि पेशी , नसा यांना विश्रांती मिळत नाही. त्यामुळे आपल्या वाढ आणि विकासावर परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूतील पेशी नसा नीट काम करत नाहीत . त्यामुळे नवीन विचार , एकाग्रता होणार नाही, स्मरणशक्ती विक होते. त्याचा परिणाम मेंदूला विश्रांती न मिळाल्याने नवनिर्मिती होवू शकणार नाही. शरीर ही तरतरीत आणि उत्साही राहणार नाहीत.
७. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड , नैराश्य , एकटे राहणे पसंती म्हणजे introvert होत जातात लोक. कोणाच्या मध्ये मिसळू नये वाटते. निराशा वाढत जाते. ताण आणि नैराश्य वाढत जाते. परिणामी नकारात्मकता वाढते.
८. झोप न झाल्यामुळे आणि शारीरिक अंतर्गत बदल घडत असल्याने हार्मोन वर ही परिणाम होतो ..त्यातून डायबिटीस blood pressure , निद्रानाश हे रोग वाढतात च. अगदी झोप न झाल्याने अशक्तपणा ही जाणवतो. शारीरिक संबंधांवर ही त्याचा परिणाम होतो. फ्रेश मूड असेल तर शारीरिक संबंध ही उत्साहाने प्रस्थापित होतात. खबरदार !! कमी झोप घ्याल तर दिवसभरात हे धोके पत्काराल !! वरचे संभाव्य धोके लक्षात घेता. तुम्हाला झोप खूप गरजेची आहे हे लक्षात घ्या. Health is wealth अशी म्हण आहे. आणि ती खरेच अगदी योग्य आहे.
तुम्ही तुमचे शरीर आणि मन यांची कायम काळजी घेणे गरजेचे. आयुष्य सुंदर आहे. भरपूर काम ही करा ..आनंद घ्या. निसर्गात फिरा..मीडिया ,सोशल मीडिया वापर करा .मित्र मैत्रीणीना भेटा. पण आयुष्याचा मूलमंत्र लक्षात ठेवा. लवकर निजे लवकर उठे. तुम्ही रात्री दहा वाजताच्या आत झोपला तर तुमची ideal झोप असते ती. आणि मग पहाटे फ्रेश मूड ने उठणे शक्य होते.
शुभेच्छा !
