मी हे करू शकतो ,हे इतरांना सांगण्याची नाही तर करून दाखवण्याची गरज आहे.
रोहिणी राधाकीसन
“IF YOU CAN DREAM IT, YOU CAN DO IT!”
जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर , तुम्ही ते पूर्ण ही करू शकता. आपल्या मनात जर काही मिळवण्याची इच्छा निर्माण होते तर ,ती इच्छा सत्यात आणण्याची ताकदही आपल्या मध्ये आहे ,
ह्याची जाणीव स्वतःला करून देण्याची खूप गरज आहे, तो विश्वास स्वतःवर दाखवण्याची खूप गरज आहे . मिनू एक मध्यमवर्गीय घरातील ,ग्रॅजुएशनच्या तिसऱ्या वर्षातील मुलगी.
आई-बाबा ,एक भाऊ जो यू.पी.एस.सी. ची तयारी करत आहे. अश्या एका छोट्याश्या कुटुंबात ती अगदी खुश होती. पण म्हणतात ना सगळे दिवस सारखे नसतात.
एका दिवशी ती कॉलेजवरुन परत घरी येत होती तर तिच्या एका मित्राने तिला घरी त्याच्या बाईकवरुन सोडल आणि त्याच वेळी नेमक तिचे वडील त्याच्या एका मित्राबरोबर त्यांच्या स्टॉपवर चहा घेत उभे होते. तेवढ्यात मिनूला बाईक वरून जाताना तिच्या बाबांच्या मित्राने बघितलं व तो तिच्या बाबांना म्हणाला, अरे ती तुझी मिनू आहे ना ? बघ कशी मुलांबरोबर फिरतेय. व तिच्या बाबांनी ते बघितलं व त्यांना खूप राग आला. ते घरी आले आणि मिनूवर खूप रागावले , तू हे असल्यासाठी कॉलेज ला जातेस का ? आज पासून सगळ बंद , तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचा नाहीस , घरीहून तुझी फायनल एक्झॅम द्यायची आणि लग्नासाठी तयार व्हायच. फक्त एक वर्ष आहे तुझ्याकडे . मिनूने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी तिचं एक नाही एकलं.
आणि दुसरीकडे मिनूचा भाऊ यू.पी.एस.सी. च्या तयारीसाठी दिल्लीला निघाला , त्यांचे आई-बाबा दोघेही खूप खुश होते त्यांच्या मुलासाठी पण मिनूच काय तिचे तर अगदी कॉलेजही बंद केले
होते. मिनूला खूप वाईट वाटायचे ,ती खूप रडायची तिला समजतच नव्हते की तिची चूक नेमकी काय ते . मिनू असच रडत रडत दिवस काढत होती, एके दिवशी मिनूच्या लक्षात आलेकी आई-बाबा फक्त मी मुलगी आहे म्हणून मला अस घरात डांबून ठेवतायत जर हेच दादा जेव्हा त्याच्या मैत्रिणीनां सोडतो तेव्हा तो मुलगा आहे म्हणून सोडून देतात. मी ही आई-बाबांना दाखवून देईल की मुली पण मुलांसारख्याच असतात त्याही प्रत्येक गोष्टी बरोबरीने करू शकतात. आणि ती ही ठरवते यू.पी.एस.सी. ची एक्झॅम देण्याच , पण ती ही गोष्ट लपवून ठेवते अगदी तिच्या आईला देखील याची भनक नाही लागू देत . तिच्या एका मैत्रिणीच्या हातून ती पुस्तक मागवून घेते , येणाऱ्या परीक्षेचा फॉरम भरते आणि तयारीला लागते .
दिवस-रात्र मिनू अभ्यास करते तिच्या रूमच्या बाहेरही निघत नाही . आणि तिला प्रीलीम्स च्या एक्झॅम ची तारीख कळते आणि ती तिच्या मावशीकडे जाते , मावशीला तिने सर्व काही सांगितलेल
असत व तिची मावशीही तिला सपोर्ट करते . मिनू मावशीकडे जाऊन एक्झॅम देऊन येते. तिच्या भावानेही ती प्रीलीम्स दिलेली असते. ती निकालाची वाट बघत न बसता पुढच्या म्हणजेच मेन्स च्या तयारीला लागते. आणि एका महिन्यानंतर प्रीलीम्सचा निकाल लागतो. आणि त्यामध्ये मिनूची मेहनत फळाला येते आणि ती पास होते , मिनूचा दादाही पास होतो आणि आई-बाबांना फोन येतो . तिच्या आई-बाबांना मुलगा पास झाल्याची खूप खुशी होते , पण त्यांना हे माहीतच नसतं की मिनूनेही एक्झॅम देली आहे आणि पासही झाली आहे . पास झाल्याच्या खुशीने मिनूला आणखीन प्रेरणा मिळते आणि ती आणखीन जोमाने दिवस-रात्र एक करून अभ्यास करते आणि मेन्सच्या एक्झॅमसाठी परत मावशीकडे जाऊन ती एक्झॅम देते.
आता ती वाट बघत होती ते मुलाखतीच्या कॉलची आणि तोही दिवस आलाच मेन्सचा निकल जाहीर झाला आणि मिनूने यातही यश मिळवलं. पण यावेळेस तिचा दादा मात्र मेन्समध्ये नापास झाला तिला याचे वाईट वाटले . तिने आता मुलाखतीची तयारी सुरू केली आणि मावशीला घेऊन दिल्लीला गेली व मुलाखत दिली . आता मात्र ती निकालाची आतुरतेने वाट पाहत होती.
आणि शेवटी तोही दिवस आला आणि मिनूने जे स्वप्न बघितल होतं , जे ठरवल होतं ते पूर्ण केलं. आता वेळ होती आई-बाबांना सांगण्याची, तिने काय मिळवलं होतं तिच्या आई-बाबांना किती सन्मानित केल होत हे शेवटी तिने त्यांना सांगितल आणि त्यांना धक्काच बसला, त्याच्या आनंदाचा ठिकाना नाही राहिला , बरोबर त्यांना त्याच्या कृत्यावर लाज वाटली, त्यांनी मिनूची माफीही मागितली आणि मिनूच खूप आनंदाने भरभरून कौतुकही केल. आणि खऱ्या अर्थाने मिनूची मेहनत साध्य झाली .
अश्या खूप मिनू आहेत आपल्या अवती-भोवती त्यांना गरज आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःची स्वप्न स्वतःसाठी पूर्ण करण्याची. आपण एखादी गोष्ट करण्याच जेव्हा ठरवतो,
तो निर्णय घेतो , खऱ्या अर्थाने तिथेच सुरवात झालेली असते ती गोष्ट पूर्ण होण्याची. कुठलीही गोष्ट करण्याआधी ते ठरवून आपण आपल्या मनाची तयारी करत असतो. मग आपण ह्याला-त्याला
सांगून वेळवाया घालवतो , काही लोक आपल्याला चुकीचे सल्ले देतात, काही आपल्याला कमी दाखवतात, कसे आपली ही करण्याची लायकी नाही ही पटवून देतात नाही आपण तिथेच हताश होतो हो ना ! मग कशाला इतरांना सांगत बसायच , त्यांना करून दाखवायच. म्हणूनच
“जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर, ते पूर्ण ही करू शकता.”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chan
👌खुपच सुंदर लेख आहे
खुपच सुंदर लेख आहे 👌