Skip to content

काहीवेळेस आपल्याला ते मॅसेज, नंबर डिलीट आणि ब्लॉक करण्याची गरज पडते, स्वतःला शांत ठेवण्यासाठी.

काहीवेळेस आपल्याला ते मॅसेज, नंबर डिलीट आणि ब्लॉक करण्याची गरज पडते, स्वतःला शांत ठेवण्यासाठी.


मयुरी महाजन


संवादाला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे ,त्या संवादाच्या जोरावरतीचं माणसाने आज प्रगतीच्या कितीतरी वाटा गाठलेल्या आहेत ,संवाद ही मानवी जीवनाची पहिली पायरी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही ,कारण की जन्माला येणारे बाळ सुद्धा हसून रडून आपली प्रतिक्रिया म्हणजेच आपल्याशी काहीतरी संवाद करत असते,

संवाद हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाणारा मेसेज किंवा ती माहिती आजच्या घडीला सर्वात महत्त्वपूर्ण ठरते, म्हणून दळणवळणाची कितीतरी साधने उपलब्ध झालेली आहेत, त्या पाठीमागे सुद्धा हाच उद्देश आहे ,आताच्या काळामध्ये व पूर्वीच्या काळामध्ये खूप अंतर असलेले आपल्याला बघायला मिळते, पूर्वीच्या काळी पत्र पाठवून लोक एकमेकांची खुशाली कळवायचे, काही दुःखाची वार्ता असेल ते सुद्धा खूप दिवसांनी समोरच्या व्यक्तीला कळत होती ,

परंतु आजच्या घडीला झालेले बदल हे जितके फायद्याचे तितकेच तोट्याचे असलेले बघायला मिळते, कारण की प्रगतीच्या विकासाच्या टप्प्यावरती माणसाने गाठलेली उंची कौतुकास्पद नक्कीच आहे, परंतु तीच साधने वापरण्यासाठी आता आपल्याला काही नियमावली तयार करून त्यानुसार जगावे लागणार, अशी सुद्धा शक्यता नाकारता येणारी नाही ,

एका कवीने म्हटलेले आहे ,की आधुनिकतेच्या जगात माझ्या माणसे झाली वेडी,

आणि मोबाईल मात्र स्मार्ट झालेत,

आपण आज आपलं मानसशास्त्राच्या माध्यमातून जे काही वाचन या ठिकाणी करतोय, ते सुद्धा आपल्याकडे मोबाईलच्या माध्यमातून पोहोचते, आज एका क्षणात एका क्लिक वरती जग येऊन थांबलेलं आहे ,त्यामुळे नक्कीच काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, परंतु कुठलीही गोष्ट वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहेत, आजच्या घडीला सायबर गुन्ह्यांमध्ये झालेले वाढ आपल्या प्रत्येकातून कुणीतरी एक त्या सायबर गुन्ह्याचा शिकार झालेला आहे, हे होऊन गेल्यावर कळतं,

परवा एक ताई भेटल्या, म्हणाल्या माझा आधीचा नंबर बदललेला आहे, कारण एकूण मी सुद्धा विचार करायला लागले, असं कसं होऊ शकतं ,अनोळखी नंबर वरून त्यांना घाणेरडे मेसेज, असशील फोटो यायचे ,त्यांनी नंबर ब्लॉक केला तरी सुद्धा दुसऱ्या सेकंदाला परत दुसऱ्या नंबर वरून कॉल आणि मेसेज येऊ लागले, त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने त्यावर तक्रार नोंदवली ते जेथे राहतात तिथेच पाच ते सहा जणांनी ही समस्या आम्हालाही आहे, हा मुद्दा बोलून दाखवला. पोलिसात सुद्धा त्यांनी दखल दिली तर असे कितीतरी केसेस त्यांच्याकडे असलेले बघायला मिळाले ,शेवटी त्यांनी नंबर बदलून घेतलेत ,

मित्रांनो असे काही घडणारी ही एकटीच माणसे नाहीत ,परंतु हे सर्व होताना आपली मानसिकता मात्र कुठेतरी डगमगते, व प्राधिकरणाची भावना सुद्धा वाढीस लावू शकते, काही वेळेस आपल्याला ते मेसेज, नंबर डिलीट किंवा ब्लॉक करण्याची गरज पडते, स्वतःला शांत ठेवण्यासाठी, जर कधीही आपण अश्या समस्येतून जात असणारं तेव्हा गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, मग कुणाला याबद्दल कसे सांगू ,कुणाला सांगायला गेलो ,तर ते आधी माझ्यावरच संशय घेतील, असे तुम्हाला वाटू शकते, अशावेळी जी माणसे आपल्या विश्वासातील असतील, जे आपल्याला समजून घेऊन आपली मदत करतील, अशांची मदत नक्की घ्या ,कारण की जी गोष्ट तुम्ही आज टाळत आहात ,उद्या ती तुमच्यासाठी समस्या होऊ शकते,

एक मैत्रीण जी नव्याने लग्न बंधनात बांधली जाणार होती, तिला एक अनोळखी नंबर वरून कॉल येतो, व ती घाबरून जाते, तिला त्याच नंबर वरून अश्लिल फोटो येतात, जे की काही सेटिंग चा वापर करून तिच्या स्टेटसला ठेवण्यात येतात, तिला बदनाम करण्याच्या हेतूने केले गेलेले हे काम तिला आयुष्यात मानसिक त्रास देऊन जाते, व कोणाला सांगता न येण्याची सोय, तिच्या मानसिक खच्चीकरणाला जबाबदार ठरते, परंतु ज्याच्याशी रेशीम गाठ बांधली जाणारी असते, ती व्यक्ती समजूतदार तर होतीच, परंतु तिला कुठल्याही प्रश्नाचा जाब न विचारता, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, हे शब्द तिला त्यातून सावरण्यासाठी मोलाचे ठरले ,

येथे सांगितलेल्या दोन्ही गोष्टी या काल्पनिक चित्र नाहीत, ते वास्तव आहे ,भावनांच्या भरात वाहून कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देत बसू नका ,स्वतःला शांत ठेवून त्याचा विचार करा ,स्वतःकडे कमीपणाची भावना बाळगू नका, वेळ आलीच तर सरळ काही नंबर ब्लॉक करा, ते मेसेज व नंबर डिलीट करण्याची आपल्याला गरज पडते, दुसऱ्यासाठी नाही किमान स्वतःसाठी स्वतःचा विचार स्वतःच्या पद्धतीने करायला शिकायला हवं…..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *