काही व्यक्ती नुसतं रडून त्या प्रसंगात सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न करतात.
मयुरी महाजन
भावभावना हे परमेश्वराने मानवाला दिलेल्या अमूल्य देणगी आहे, त्यामुळेच आपल्या जीवनात आनंद आहे, दुःख आहे, समाधान आहे, संपुष्टात आहे, या सर्व गोष्टी मानवाला विधात्या कडून मिळालेली अमूल्य देणगी आहे ,आणि त्यामुळेच मानवी जीवनाला अर्थही आहे, रडलेला नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणे कठीणचं, कारण जन्माला आल्यापासून आपण रडायला आपोआपच शिकलो असतो ,परंतु रडण्याला त्या त्या प्रसंगात ,त्या त्या व्यक्तीपरत्वे ही व त्या व्यक्तीच्या वयापरत्वेही वेगवेगळे स्थान बघायला मिळते,
एकच क्रिया रडणे, जेव्हा वेगवेगळ्या प्रसंगात घडते, किंवा वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरती घडते, त्यानुसार त्याची कमी अधिक तीव्रता ठरवली जाते, रडणे काय असते, याचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहेच, परंतु नेमकं त्यामागचे पैलू अभ्यासण्याचा आपण कधी प्रयत्न केला नाही,
डोळ्यातून अश्रु उगाचच येत नसतात ,त्या अश्रू येणेमागेही भरपूर गुपित दडलेले असतात, काही ठराविक वेळापर्यंत मुलांचे रडणे हे मानवी दृष्टिकोनातून स्वाभाविक समजले जाते, पण जसं- जसा वयाचा टप्पा वाढत जातो ,तसे शिकवले जाते, रडण्यासाठी आता तू लहान राहिला नाहीस, म्हणजेच तू मोठा झालास, मोठी झालीस, या पद्धतीने, मनावरती बिंबवले जाते, की मोठे झाल्यावर तुम्ही रडू शकत नाही ,कारण ते लहानपणाचे लक्षण आहे,
मित्रहो मोठी माणसे रडत नाही, असा अजिबात नाही, फक्त ते आपल्याला त्यांचे अश्रू कधीही दाखवत नाही ,आयुष्याच्या प्रवासात माणूस हसतो सर्वांना सोबत पण तो रडतो,काही ठराविक विश्वासू व जिवलगांवरच, काही व्यक्ती मात्र नुसतं रडून सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न करतात,
आपण रडत असताना साहजिकच कोणीतरी विचारेलं काय झालं ??म्हणून ,नको रडूस या पद्धतीने काही जण फक्त सिंपथी मिळवण्यासाठी भूकेले असतात ,म्हणजे आपण किती दुःखात आहोत, हे आपल्याला रडून दाखवून समोरच्या व्यक्तीकडून फक्त सिंपथी मिळावी ह्या आशे पोटी व्यक्ती म्हणून आपल्या दुःख सांगत असतो,
रडून माणूस मोकळा होतो, हे अगदी खर आहे, भरून आलेलं मन कुठेतरी ते व्यक्त होऊन मोकळे होणे गरजेचे आहे, परंतु आपण कुणाजवळ मनमोकळे करत आहोत, व आपल्या मोकळे होणाला तितके पैलूही आहेत का??? जे आपल्याला केवळ सिम्पतीच्या अपेक्षा न ठेवता, आपल्याला समाधानाची रेषा काढता येईल, हे तपासून पाहणे गरजेचे आहे, म्हणून काही व्यक्ती नुसतं रडून त्या प्रसंगांमध्ये सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न करतात,
सिंपथी मिळून आपली त्या प्रसंगातून सुटका होते, असं अजिबात नाही, फक्त मनाचा तो भ्रम असतो, कुणाची तरी मिळालेली सिंपथी म्हणजे आपल्याला एखाद्या प्रसंगातून वाट मोकळे करून देणे, आपल्या मानसशास्त्रीय भाषेमध्ये असे म्हणतात की आपण कोणाचे दुःख समजू शकतो, पण त्या दुःखाला अनुभवू शकत नाही, आणि यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये तद्नुभूती असे म्हटले जाते, त्यासाठी आपण नेहमी लक्षात असू द्यायला हवे, जर कुठल्याही वाईट प्रसंगात दुखात कुणी आपल्याला आधार मागत असेल ,तर सल्ले देण्यापेक्षा त्या व्यक्तीला तुमची साथ द्या, कारण पाठीवरच्या आधारापेक्षा हातात हात देऊन दिलेली साथ, ही त्या व्यक्तीला जास्त बळ देऊन जाईल,
सहानुभूती देणार्या व्यक्ती तितक्यास निकोप व निष्पाप भावनेने सहानुभूती देतीलच असे, नाही, कारण काही वेळा आपले दुःख इतरांसाठी आपल्याला आतून तोडण्याची संधी असू शकते, त्यामुळे आपल्याला आपल्याच भावनेत वाहवत न जाता, असे चेहरे ओळखणेही गरजेचे आहेत, कारण की काही गोष्टी जितक्या पारदर्शक दिसतात ,ते तितक्याच पारदर्शक नसतात, म्हणून नुसतं रडून जर एखाद्या प्रसंगात सिंपथी मिळवण्याच्या प्रयत्नात असणार तर ,आपण त्यामुळे आपलेच नुकसान तर करत नाही ना हे तपासून बघा..
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
