काहीवेळेस शांत रहावं लागतं, कारण मनात नेमकं काय चाललंय हे व्यक्त व्हायला शब्द सापडत नसतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
अस होत ना, की आपण शांतता शोधायचा प्रयत्न करतो. आता ही जी शांतता आहे ती आपल्याला कुठे बाहेर शोधायची नसते. आपल्याला आंतरिक शांतता हवी असते. म्हणजेच काय तर आपल्याला आतून, मनातून शांत व्ह्याच असत, आपलं मन शांत करायचं असत. रादर बराच वेळा व्हावं लागत. असे बरेच प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, अश्या बऱ्याच गोष्टी घडतात ज्या आपल्याला कोणाकडे तरी मोकळ्या करायच्या असतात, कुठेतरी व्यक्त करायच्या असतात. कारण मनात जे खूप काही साठलेलं असत ते एका मर्यादेनंतर त्रास देऊ लागत. ते कधी एकदा बाहेर काढतो अस झालेले असत.
पण विचार, भावनांचा इतका गोंधळ होत असतो की आपल्यालाच समजत नाही की नेमक आपल्या मनात काय चालू आहे? आपल्याला काय हवय? आपण एखादी गोष्ट करतोय तर का? अचानकच आपल्याला चांगल वाटत, अचानक दुःख होऊ लागत. आपलं आपल्यालाच समजत नाही हा इतका गोंधळ का होत आहे? हे अस का होत? कारण तेवढी स्व जाणीवच विकसित झालेली नसते. आपल्याला आपली जितकी जास्त माहिती असेल, मग त्या आपल्या भावना असतील, एखाद्या प्रसंगात आपल्याला येणारे विचार असतील, आपल्याला चांगल्या बाजू, कमकुवत बाजू याबद्दल जर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत असेल तर ते नीट व्यक्त करू शकतो.
पण अस होताना दिसत नाही. हे अनेकांच्या बाबतीत होत. ते खूप आटापिटा करत असतात, समोरच्या व्यक्तीला सांगण्याचा. पण समोरच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचतच नाही. इथे त्या माणसाचा दोष असतो अस नाही. जर आपल्यालाच नीट मांडता येत नसेल, व्यक्त करता येत नसेल तर समोरची व्यक्ती काही करू शकत नाही. आपण म्हणतो देखील, मला तुला काही खूप सांगायचं आहे, पण कसं सांगायचं हेच समजत नाही, म्हणजे माझ्या मनात जे आहे ना, मला जे जाणवत आहे त्याला नेमक कोणत्या शब्दात सांगायचं ते शब्दच मला सापडत नाहीत.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच आपल्याला काय जाणवत त्याची माहिती असण, स्वतःच्या तसच इतरांच्या भावना ओळखता येणं, त्यांचं नियमन करता येणं व त्या योग्य पद्धतीने जिथे पाहिजे तिथे व्यक्त करता येणं. जेव्हा याचा अभाव आपल्यामध्ये असतो तेव्हा आपल्याला समजत नाही आपल्याला काय जाणवत आहे. मनात तर खूप काही चाललेल असत पण त्याला नाव मात्र देता येत नाही. माझी चिडचिड होते आहे, मला अमुक एखादी व्यक्ती आवडतच नाही, ती समोर आली तरी मला कसतरी होत. पण हे का होत? हे अस होण म्हणजे काय? आणि मग यावर काय केलं पाहिजे? या कश्याचीच उत्तर मिळत नाही आणि म्हणून शांत राहावं लागतं.
आपल्याला सर्वांशी बोलायला वेळ असतो, मात्र स्वतःशी बोलायला नाही. आपण स्वतःसाठी असा किती वेळ काढतो? खूप कमी. सुरवातीला डायरी वैगरे लिहिण्याच जे प्रमाण होत ते आता टेक्नॉलॉजीच्या युगात कमी होत चाललय. स्वतःसोबत पाच मिनिट घालावायला पण आपल्याला वेळ नसतो. पण या निमित्ताने आपण स्वतःसोबत वेळ घालवू शकतो. जेव्हा आपण शांत होतो, अंतर्मुख होतो जेव्हा आपण स्वतःला शोधायला लागतो. कारण हेच महत्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणार तेव्हा आपण ती दुसऱ्याला सांगू शकणार. फार काही करावं लागत नाही. केवळ शांत राहून एका त्रयस्थ नजरेने स्वतःचा निरीक्षक व्हायचं.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Amcha sarkhana tumacha adhar dev tumache bhale Karo
Nice ❤️