Skip to content

काही गोष्टींचा स्वीकार करावाच लागतो, नाहीतर मन खायला उठतं.

काही गोष्टींचा स्वीकार करावाच लागतो, नाहीतर मन खायला उठतं.


पुजा सातपुते


आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात. कधी चांगल्या तर कधी वाईट. चांगल्या गोष्टी घडल्या तर त्या सगळ्यांना हव्याच असतात कारण कोण वाईट गोष्टी किव्हा दुःख स्वतःवर ओडवून घेणार. पण कधी कधी आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात आणि नकळत त्यातनं चांगलं होतं. त्या वेळेस दुःख जरूर होतं, मन दुखावलंही जातं, पण काही वर्ष निघून गेल्यावर आपल्याला जाणीव होते, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं.

काही गोष्टी आपल्याला घडवतात, आपल्या आयुष्यात बदल आणतात आणि त्या गोष्टी जर घडल्या नाहीत तर आपण आपल्या आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकत नाही. म्हणून त्या गोष्टींचा आपण जेवढ्या लवकर स्वीकार करू तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. कारण आपण जर जास्त विचार करत राहिलो कि हे असं का घडलं तर आपलच मन खायला उठतं!

नको नको ते विचार मनात येतात, डिप्रेशन येतं, स्वतःमध्ये कमीपणा वाटू लागतो, आपण त्या विचारांच्या ओझ्याखाली दबलो जातो आणि आपण आपलं सुंदर आयुष्य नकळत थांबवतो.

निसर्ग प्रत्येकाची व्यवस्तीत काळजी घेत असतो. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला कुठे काय माहित असतं आपल्या बरोबर पुढे काय होणार आहे ते. तरी सुद्धा लहानपणी आपण आपलं आयुष्य बिनधास्त जगायचो कारण आपल्याला पुढची जास्त चिंता नसायची. जे आपल्याकडे कडे होतं, आपली खेळणी, आपले जवळचे लोकं मग ती कशीही असली तरी आपण त्यांचा स्वीकार करायचो. हा कधी कधी काही गोष्टींसाठी हट्ट धरायचोही पण कोणी समजावलं तर जे आहे त्यात समाधान मानायचो.

मग थोडे मोठे झाल्यावर, कळायला लागल्यावर आपली चिंता वाढायला लागली, कधी दहावीच्या मार्कांवरून, कधी कॉलेज निवडण्याच्या विचारांमधून तर कधी नोकरी शोधण्याच्या टेन्शन वरून. कारण आपण आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याची खूप कमपेर करत असतो. त्याला / तिला एवढे मार्क्स मिळालेत तर मला पण मिळाले पाहिजे, मला पण त्याच कॉलेजला ऍडमिशन मिळाली पाहिजे, मला पण तसाच जॉब पाहिजे.

मान्य आहे प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं आणि ते पूर्ण होण्यासाठी सगळेच खूप धडपडत असतात आणि नक्की त्यासाठी प्रयत्न करावा. पण या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे आपण एवढे लागतो कि आपण आपलं आयुष्यच जगायला विसरतो. आपण आनंद शोधण्यात इतके बीझी होतो कि वर्तमानातल्या आनंदी क्षणांना पूर्ण पणे इग्नोर करतो.

या ऐवजी जर आपण आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टींचा स्वीकार करायला शिकलो तर आपलं आयुष्य किती सोपं होईल. जे स्वप्न आज पूर्ण नाही झालं ते पुढे नक्कीच होईल, कारण कधी कधी आपल्याला काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. खूप मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन न मिळता कुठल्या दुसऱ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली तर तुमचं शिक्षण थांबणार आहे का?, भरपूर पगारातली नौकरी जरी लगेच नाही मिळाली तर पुढे पण ती नाही मिळणार असं आहे का?

आपल्याला जे मिळालं आहे त्याचा जर आपण स्वीकार करायला शिकलो तर आपली स्वप्न हळू हळू पूर्ण करण्यापासून कोणी आपल्याला थांबवू शकणार नाही. प्रत्ये्क अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो आणि आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची संधी देत असतो.

जे तुमचं आहे ते कायम तुमचंच राहणार आणि कधी ना कधी तरी ते नक्कीच तुम्हाला मिळणार. आत्ता जे मिळालं आहे त्याचा स्वीकार करा आणि जी तुमची स्वप्न आहेत त्याच्यासाठी मार्ग निर्माण करा. उगीच डिप्रेस होऊन, स्वतःला त्रास करून लाईफ कॉम्प्लिकेट नका बनवू. निसर्ग आपल्यापरीने काम करत असतो आणि तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करत राहा.

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे नका लागू. जी गोष्ट जशी आहे तशी स्वीकारा. पॉसिटीव्ह विचार करा कारण जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि प्रत्ये्क गोष्टीची वेळ यावी लागते. जे नाही मिळालं त्यासाठी हताश होऊन बसू नका, जे मिळालं आहे त्याचं सोनं करा. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा म्हणजे तुमचं मन नको त्या गोष्टीवरून कधीच खायला उठणार नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “काही गोष्टींचा स्वीकार करावाच लागतो, नाहीतर मन खायला उठतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!