ज्या नात्यांमुळे मानसिक संतुलन बिघडते, अशी नाती जपावी का?
सोनाली जे.
मानसशास्त्र म्हणले की मन आणि वर्तन या दोन्हींचा अभ्यास हा आलाच. मन यात कशाचा समावेश आहे ? भावना मग त्या सुखद अथवा दुःखद , येणारे विविध अनुभव त्याचा होणारा परिणाम, आपल्या सोबत असणारे आपले असे जवळचे लोक त्यांचे बोलणे , वर्तन या सगळ्याचा परिणाम हा आपले मन आणि वर्तन यावर होत असतो.
ज्या नात्यांमुळे मानसिक संतुलन बिघडते, अशी नाती जपावी का?
साधी गोष्ट आहे बघा रस्त्यातून चालणारे कोणी असेल त्याच्या वागण्याचा , बोलण्याचा आपल्यावर कितीसा परिणाम होतो? आणि किती काळ होतो?
एखादी व्यक्ती रस्त्यात धडपडली तर आपण माणुसकी दाखवतो , गरज पडली तर आपल्या कडील पाणी पिण्यास देतो, काही बिस्कीट असतील तर ती खाण्यास देतो, गरज असेल तर दवाखान्यात घेवून जातो. तेही एका ठराविक मर्यादे पर्यंत. खुप मोठा अपघात असेल तर पोलिस केस आणि अजून भानगडी नकोत म्हणून कोणती मदत ही करत नाही. बरेचवेळा लांबून बघून निघून ही जातो.
आता परक्या व्यक्ती बाबत आपण अंतर राखून असतो. त्याचा वागण्याचा बोलण्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही.
मात्र जेव्हा आपण आपली माणसे म्हणत असतो .मग ती जन्मजात नात्याने किंवा रक्ताच्या नात्याने असेल तर कधी त्यापलीकडे जावून आपण जोडलेली नाती असतील . अशा नात्यात कुठे ना कुठे काही बंधने येतात. अपेक्षा येतात. अगदी नवरा बायको चे नाते घ्या ना त्यात ते जन्माने एकत्र असतात का ? नाही ?रक्ताने नाती जुळत असतात का ती ? तर नाही ? पण दोन भिन्न कुटुंब एकत्र येवून ही नाती जोडली जातात. सोयरिक होते. अशावेळी अपेक्षित असते की केवळ नवरा बायकोचं एकत्र येणे नाही तर दोन्ही कुटुंबे एकत्र येणे. वेळप्रसंगी आनंदी असो दुःखी , गरज असो अशावेळी एकमेकांना मदत करणे , साथ देणे अपेक्षित असते.
समजा नवरा बायको मध्येच सतत वाद असतील , एकमेकांना समजून घेत नसतील , एकमेकांची मानसिक , भावनिक आणि आर्थिक ही काळजी घेत नसतील , अशा नात्यात जर कायमच मानसिक संतुलन ढळत असेल, चिडचिड ,राग , भांडणे वादावादी ताण तणाव होत असेल तर याचे कारण शोधणे नक्कीच गरजेचे आहे.
विनाकारण कोणती गोष्ट घडत नसते. नवरा बायकोच्या एकमेकांच्या कडून काही अपेक्षा असतात. त्या समजून घेण्यास कमी पडतात. एकमेकांच्या सोबत संवाद आणि सुसंवाद साधण्यास कमी पडतात. आता संवाद म्हणजे एकतर्फी सुधा असू शकतो. पण सुसंवाद हा मात्र दोन्ही बाजूने साधला जातो. तो असेल तर वाद होत नाहीत असे नाही पण प्रत्येक गोष्टीवर solution शोधले जाते. पर्याय शोधले जातात. मार्ग शोधले जातात. आणि जर संवाद च संपला . बोलणेच खुंटले तर मात्र सगळ्या गोष्टी , विचार मनात साठून साठून त्या विचारांचा , भावनांचा कोंडमारा होतो. बरेचवेळा काही विचारायचे असते. काही सांगायचे असते. एकमेकांची सोबत गरजेची असते. एकमेकांनी एकमेकांची विचारपूस करणे गरजेचे असते.
नवरा बायको मध्ये केवळ शारीरिक संबंध निर्माण झाले असे होत नाही .तर ते मनाने ही एकत्र असतात. शरीराने एकत्र येण्यापूर्वी तेवढे मन , भावना समजून आपुलकी , प्रेम , एकमेकांची ओढ , आवडी निवडी समजून घेणे, एकमेकांना वेळ देणे , कधी एकमेकांना रिलॅक्स करणे मग एकांतात बसून तर कधी मस्त एखादा सिनेमा , बाहेर फिरायला जावून , कधी बायकोची रोजची धावपळ यातून तिला विश्रांती म्हणून हॉटेल मध्ये किंवा कधी स्वतः एखादी मस्त रेसिपी करून .
कधी मस्त candel light dinner with light music. दोघांना ही प्रफुल्लित करते. एकमेक हळुवार समजून घेत , थोडा रोमान्स आणि गप्पा टप्पा ,जवळीक साधत जे शारीरिक संबंध निर्माण होतात ते आणि शारीरिक संबंध साधताना एकमेकांच्या गरजा समजून घेतल्या तर ते अतिशय आनंददायी , सुखी आणि शांतता निर्माण करतात.
आणि जर अशा नात्यात समजून घेण्यास दोघांपैकी कोणी कमी पडले किंवा सतत काही ना काही अपेक्षा आणि असमाधान राहिले तर मात्र नात्यात मानसिक असंतुलन वाढते. संतुलन बिघडते.
नवरा बायको सारखी इतर ही अनेक नाती असतात. एकत्र कुटुंब आहेत जी केवळ एका घरात एकत्र राहतात मात्र त्यांच्यात कधी बोलणे नाही, मदत करणे नाही, समजून घेणे नाही , आर्थिक गोष्टी मध्येही कधी एकमेकांची साथ नाही. तसे मानसिक आधार ही नाही. भावनिक attachment नाही. एकमेकांच्या विषयी आदर नाही, एकमेकांच्या बद्दल तोंडावर एक आणि मागे एक बोलणं होत असेल तर अशा दिखव्याच्या नात्या मुळे ही मानसिक संतुलन बिघडते, तर कधी काही गैरसमज होतात आणि मग असे प्रश्न पडतात की अशी नाती जपावी का?
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसे प्रत्येक व्यक्ती ही विभिन्न व्यक्तिमत्त्व घेवून आलेली असते. विचारसरणी , वागणे , व्यवहार , भावना वेगळ्या असतात.
वरकरणी बघताना नाण्याची एकच बाजू दिसते. आणि त्याच बाजूने बघितले जाते. तसा दृष्टिकोन निर्माण होतो. पण नाण्याची ती बाजू पलटली की नाण्याची दुसरी बाजू काय आहे हे बघितले जाते. समजून घेतले जाते. तसे काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी या प्रत्येक नात्यात असतात. आणि सगळ्यात महत्वाचे अपेक्षा, गैरसमज , संवादाचा अभाव , आदर या चांगली नाती नात्यांमुळे मानसिक संतुलन बिघडते पण म्हणून अशी नाती कायमची तोडायची का ?
असे होत नाही. कारण आपल्या लोकांच्या च वर्तनाचा त्रास होतो. अगदी सुरुवातीला चांगली असणारी नाती ही कधी कधी हळूहळू बिघडत जातात. त्याला अनेक कारणे असतात. जसे कायमच एखाद्याने च समजून घेणे असेल , दुसऱ्याने कधी समजून घेणे नसेल , एकमेकांच्या मध्ये आदर नसेल, एकमेकांवर विश्वास नसेल किंवा एकमेकांनी एकमेकांच्या करिता केलेल्या गोष्टींची जाणिव नसेल तरीही नाती बिघडत जातात. आणि अशी काही नाती असतात जी कधीच तोडू शकत नाही. आणि ती अशी ही असतात की , जी धरलं तर चावत सोडलं तर पळतं .
तेव्हा अशी त्रासदायक , मानसिक संतुलन बिघडवणारी नाती जपावी का हा प्रश्न पडतो.
खरे तर सगळ्यांचे उत्तर आहे संयम.. भावना , reactions या तात्कालिक प्रसंगावर अवलंबून असतात. त्यामुळे त्या भावना ही क्षणिक असतात. मात्र या क्षणिक भावनांच्या पेक्षा ही बरेचवेळा ही नाती खूप आपुलकीची , प्रेमाची , घट्ट विणलेली असतात. तेव्हा बरेचवेळा एखाद्याचे वागणे खटकले , बोलणे टोचले , काही गोष्टींचे त्रास झाले तरी ते सहन करून त्या क्षणी खूप संयम पाळून झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे या गाण्यासारख एकमेकांचे गुण दोष समजून घेवून , सांभाळून घेवून नाती तोडण्यापेक्षा नाती जपली जातात.
आयुष्य सुंदर आहे. सर्वगुण संपन्न असे कोणीच नाही. प्रत्येकात चांगले वाईट गोष्टी आहेत, गुण दोष आहेत. त्यामुळे एकमेकांना सांभाळून , समजून घेवून तर कधी समजावून सांगून , तर कधी दुर्लक्ष करून नाती जपली जातात. आणि एक लक्षातघ्या कायम आपल्या हक्काच्या लोकांकडे च हट्ट केले जातात, त्यांच्या कडे अपेक्षा ठेवल्या जातात. त्यांच्याच वागण्याचा त्रास होतो. ती परकी नसतात आपली असतात म्हणून त्रास होतो पण याच लोकांच्या कडून सर्वात जास्त आनंद , सुख आणि समाधान ही मिळत असतें .
एकमेकांची काळजी घेतली जाते. आणि अशी नाती विविध पदर्थासारखी असतात. कधी गोड , कधी , कडू , आंबट , खारट , तिखट , तुरट चव असते तशी ही नाती ही असतात आणि ती ही कायम हवीहव शी वाटतात. क्षणिक वाटते ही आता सगळे संपवून टाकावे .सहन होत नाही आता. पण मग हेही लक्षात येते की तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना !!
बघा हुं तुम्ही ही अशी तुमची आपली नाती वेळेत जपा. तुटत आली असतील तर वेळीच धागा घेवून कायमची घट्ट शिवून घ्या. Stitch and time saves nine. कायम लक्षात घ्या. जर कुठे नाती तोडायचा विचार करत असाल तर नक्की थांबा , विसावा घ्या आणि सगळे माफ करून नाती जपा.
कधी आपली चूक असेल तर आपणहून माफी मागा, समोरच्याची चूक असेल तर त्याला माफ करून आपणहून बोला, कधी समजून घ्या , कधी समजावून सांगा, कधी तडजोड करा. पण कायमच पडती बाजू घेवू नका. समोरच्याला ही जाणीव करून द्या त्याची ही चूक आहे. आणि तरीही त्याला आपले काहीच चूक आहे असे वाटत नसेल आणि तुम्हाला नाते जपायचे असेल तर मग सगळे सहन करून नाते जपा. आणि सहन करणे शक्य नसेल. काहीच पर्याय कायमचा निघत नसेल. कायम मानसिक त्रास होत असतील. सतत एकमेक दोषारोप होत असतील. तर मग एकमेकांचे मार्ग वेगळे करा. कोणालाही आपल्या नात्याची नकोशी आणि त्रासदायक बंधने नकोत. नाती जेवढी मुक्त , मोकळेपणाने असतील तेव्हढी जास्त खुलतील.
सविता आणि उमेश यांचे दोघांचे ही नुकतेच लग्न झाले. दोघांचे ही आधीचे घटस्फोट. उमेश ला एक मुलगा. तोही चांगला मोठा. सातवी मध्ये असलेला. उमेश ने सविता सोबत लग्न करतानाच तिला सांगितले की आपण कोणता चांस घ्यायचा नाही. मुले होवू द्यायची नाहीत. तरच लग्न करू. सविता तयार ही झाली. जसजसे संसार फुलू लागला. एकमेकांचा सहवास वाढला. संबंध वाढले तसे सविता ला ही आपले ही एक गोंडस बाळ हवेहवेसे वाटू लागले. तिने उमेश ला गोडीत सांगितले. तरी त्याचे नाही हे ठाम. थोडी अलिप्त राहून बघितले तरी उमेश ला काही फरक नाही पडला.rather त्याच्या लक्षात ही आले नाही ते.
मग सविता ने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यातले शारीरिक संबंध ही नको असे होवू लागले. अगदी नाते कोणत्याही क्षणी तुटेल अशी अवस्था. पण मग तेव्हा उमेश ने परत एकदा सविता ला जवळ घेतले. तिच्या भावना , तिला वाटणे हे साहजिक आणि स्वाभाविक आहे हे ही त्याने मान्य केले. पण त्याचे वय ,वत्याच्या मुलाचे वय आणि त्याची जबाबदारी यांचा विचार करता जर एखादा चान्स घेतला आणि उमेश चे काही बरे वाईट झाले तर त्याच्या मुलाची आणि सविता तिच्या बाळाची जबाबदारी कोण घेणार ही वास्तविकता .हे प्रश्न त्याला सतावत होते आणि ती वास्तविकता त्याने तिला खूप प्रेमाने आपलेपणाने समजावून सांगितली. तेव्हा सविता ला ही ते परत पटले आणि तिने मुल होवू न देण्याचा निर्णय घेतला. ही कायमची तडजोड तिने आपले नवरा बायकोचे नाते जपण्यासाठी केली.
तुम्ही ठरवायचे की तुम्हाला माणूस महत्वाचा का तुमच्या अपेक्षा , भावना. कधी कधी दुसऱ्यांना ही समजून घेणे गरजेचे असते. माणूस महत्वाचा असेल तर नाती जपा आणि ती फुलवा.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
