Skip to content

झोप येत नाही याचा मानसशास्त्राशी काय संबंध??

झोप येत नाही याचा मानसशास्त्राशी काय संबंध??


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


शरीर आणि मन, ऐकताना बोलताना आपण या गोष्टी वेगवेगळ्या वेळी, वेगळवेगळ्या पद्धतीने संदर्भात जरी बोलत असलो तरी या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपण आरोग्य अस म्हणतो तेव्हा त्यात फक्त शारीरिक आरोग्य येत नसून मानसिक आरोग्य ही येत. म्हणूनच जेव्हा शरीरात काही बिघाड होतो तेव्हा त्याचा परिणाम मनावर होतो आणि मनात काही खळबळ निर्माण झाली ती त्याचे पडसाद शरीरावर उमटतात.

म्हणून चांगलं निरोगी आरोग्य ठेवायचं असेल तर या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आता काय काय येत निरोगी आरोग्यामध्ये तर चांगलं राहणीमान, चांगली जीवनशैली. ज्यामध्ये आहार आला, पुरेशी झोप आली, व्यायाम, आपलं काम, छंद या सारख्या गोष्टी.
यात कुठेतरी अडथळे आले तर आपल्या एकंदरीत रहाणीमानावर परिणाम होतो. यातलाच एक गोष्ट म्हणजे झोप.

आपल्या आरोग्यामध्ये झोपेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीरासाठी जस अन्न गरजेचं आहे तसच पुरेशी झोपही गरजेची आहे. ती जर नसली तर माणूस आतून आणि बाहेरून हलल्यासारखा होतो. आता जेव्हा ही झोप डिस्टर्ब होते तेव्हा अनेकदा लोकांना अस वाटत की त्यामागे काहीतरी शारीरिक कारणच आहे. उदा. अंग दुखणे, बीपी, खोकला ताप, किंवा काहीच शारीरिक श्रम नसणे या सारख्या गोष्टी. व्यसनामुळे पण झोपेवर परिणाम होतो. तसच अती प्रमाणात caffen च सेवन करणे. म्हणजेच चहा कॉफी वगैरे दिवसातून खूपदा पिणे. या गोष्टी कारण ठरत नाहीत का? तर नक्कीच ठरतात. पण झोपेचं चक्र बिघडण्याची फक्त इतकीच आणि हीच कारण नाहीत. याच्या मागे मानसशास्त्रही आहे. ते कसं?

तर अतिप्रमाणात केली जाणारी चिंता, घेतला जाणारा ताण. आपल्याला ज्या काही भावना आहेत त्या सर्व नैसर्गिक आहेत. म्हणजेच काय त्या आपण पूर्णपणे घालवू शकत नाही. त्या येणारच. मग तो राग असुदे, चिंता असुदे, आनंद असुदे किंवा दुःख. समस्या या भावना येणे नाही तर त्या किती प्रमाणात येतात ही आहे. चिंता गरजेची नसते का? असते एखादं काम नीट करायचं असेल, त्याची सुरुवात करायची असेल तर थोडीफार चिंता लागते.

पण ही जेव्हा योग्य प्रमाणात असते तेव्हा ती चिंता नसून काळजी होऊन जाते. आणि आपण काळजी करूच शकतो. पण झोपेचं चक्र बिघडत ते काळजीने नाही तर अती चिंतेने अनेकजणांना मुळातच अतिविचार करण्याची सवय असते. एक जरी गोष्ट घडली त्यावर तासनतास विचार करत बसणे. आता दिवसभर ते माणूस कामात असतो तेव्हा कुठे यासाठी वेळ मिळणार. मग हा मिळतो झोपताना. यातून झोपेसाठी जी एक मनाची शांतता पाहिजे तिचं निघून जाते आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. एकसारखे विचार केल्याने आपण त्याच गोष्टीवर लक्ष देतो आणि झोप येत नाही.

चिंतेप्रमाणे नैराश्याने ही झोपेवर परिणाम होतो. याचा एकत्र परिणाम म्हणजे अनेक जणांना insomnia हा मानसिक आजारही होऊ शकतो. insomnia हा एक झोपेशी संबंधित आजार आहे. यामध्ये व्यक्तीला झोप लागत नाही, जरी लागली तरी मधे मध्ये जाग येते आणि याचा परिणाम दुसऱ्या दिवसावरही होतो. थकवा येणे, दुसऱ्या कामात लक्ष न लागणे यासारख्या गोष्टी घडतात. insomnia हा जरी एक आजार असला तरी यात बाकीचे अनेक आजार जोडले गेलेले असतात.

जस नैराश्य, चिंता, एखादा शारीरिक आजार. आणि हेच आजार याची कारणही ठरतात. याबरोबरच झोपेच्या सवयी. आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी किमान ७तास झोप आवश्यक असते. पण लोकांचं राहणीमान बदलत चाललं आहे. रात्र रात्र भर काम करणे, पार्ट्या करणे यात अखी रात्र घालवली जाते आणि दोन ते तीन तास झोपल जात. झोपेला पुरेस महत्त्वच दिलं जात नाही. त्याचे परिणाम नंतर दिसतात.

अतिप्रमाणात फोनचा वापर हे देखील झोपेवर परिणाम करतात आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम insomnia होतो. म्हणूनच जर
झोपे संबंधी काही समस्या आढळत असतील तर याची फक्त शारीरिक कारण शोधून गप्प बसू नका तर त्यामागे आपली असलेली मानसिकता आपल्याला स्वतः ला झोपेचं असलेले महत्त्व, आपल्या सवयी, विचार पद्धती यावर पण लक्ष द्या त्या सुधारा आणि योग्य ते उपचार घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!