Skip to content

जेव्हा तुम्हाला उदास वाटते, तेव्हा तुम्ही त्याची अशी कारणं शोधता का?

जेव्हा तुम्हाला उदास वाटते, तेव्हा तुम्ही त्याची अशी कारणं शोधता का?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी उदास वाटलं असेल. अस कधी होणार नाही की आपण जन्मल्यापासून फक्त आनंदी, उत्साही राहिलेले असू, आपली एनर्जी एकदम उंचावर पोहोचली असेल. अस का नाही होऊ शकत? कारण शेवटी आपण माणूस आहोत. आपल्याला वेगेवगळ्या भावभावना आहेत, आपले वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत. आपला मुड सतत बदलत राहतो. परिस्थितीनुसार आपल वेगवेगळ्या पद्धतीनं वागणं असत, तश्या प्रतिक्रिया असतात. त्यामुळे आपण कायम आनंदी तर असू शकत नाही.

अनेकदा अश्याही काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ज्याबदल आपल्याला उदास वाटत असत, दुःखी वाटत असत. आपली मनस्थिती त्यावेळी ठीक नसते. आपल्याला अशावेळी काही करावसं वाटत नाही. बरीच जण नुसत गप्प बसून राहतात. काही जण उदास वाटल्यावर मित्रांना भेटतात, बोलतात.

आता हे सर्व उदास वाटल्यानंतर केल जात. पण उदास वाटण्याची कारण; ती मात्र सर्वांची वेगवेगळी असतात. माणूस बदलेल तशी त्याची कारण बदलतात. कारण प्रत्येकाचा परिस्थिती पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काय काय असतात ही कारण? जर आपण स्वतःचा जरी विचार केला की आपल्याला नेमक कधी उदास वाटत तरी आपल्याला अनेक कारण मिळतील?

जसं की आपण जेव्हा एखादी गोष्ट करायची ठरवतो आणि ती आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही तेव्हा आपण उदास होतो. कारण आपला अपेक्षाभंग झालेला असतो ज्या आपण स्वतःकडून केलेल्या असतात. जसे की परीक्षेत चांगले मार्क्स मिळवणं असेल, किंवा चांगली नोकरी मिळवणं असेल. ह्या सारखी अनेक कारण असतात ज्यातून आपण उदास होतो.

जेव्हा आपल्याला कोणी विचारत की तू का उदास आहेस? का दुःखी आहेस तरी बऱ्याच अंशी आपण हीच कारण सांगतो. आता हा उदासपणा फक्त स्वतःकडून फक्त अपेक्षा तुटल्यावरच येतो अस नाही. जेव्हा आपल्याला आपली एखादी जुनी गोष्ट आठवते, जिथे कुठेतरी आपण चुकलेल असतो, ज्याचे पडसाद काही प्रमाणात आपल्या आताच्या जीवनावर पडत असतात अश्या गोष्टी आपल्याला आठवल्या की दुःखी व्हायला होत.

अनेक लोक अशी असतात पण जी भूतकाळात झालेल्या गोष्टीत अडकून आता उदास होतात व आपल्या आताच आयुष्य पण उदासीन करून टाकतात. आपली जवळची व्यक्ती जी आपल्याला खूप दिवस भेटलेली नसेल, तिच्याकडून अस काही झालं असेल ज्याची आपल्याला अपेक्षा नसेल तरी आपल्याला उदास वाटत. उदासपणामध्ये कुठेतरी एकटेपणा पण येत असतो. व्यक्ती जेव्हा स्वतः ला खूप जास्त एकट समजू लागते तेव्हा या उदास पणा वाढतो.

जरी व्यक्ती बदलल्या तरी कमी अधिक प्रमाणात आपल्याला हीच कारण ऐकायला मिळतात. पण याहूनही वेगळी काही कारण असू शकतात ज्याने आपल्याला उदास वाटू शकत, वाटत असेल अशी कारण तुम्ही शोधता का? तेव्हढ आपल आत्मपरीक्षण असत का? तेव्हढे आपण स्वतः ला ओळखत असतो का? जर ओळखत असू तर आपल्याला ही कारण लक्षात येतील. आपल्या एक गोष्ट लक्षात येत असेल की जेव्हा आपण उदास होतो तेव्हा आपण ही गोष्ट आपल्या मानसिकतेशी जोडतो. जे की खरही आहे.

उदास वाटण ही आपली एक मानसिक स्थितीच आहे. पण ज्या गोष्टी आपल्या मनस्थितिशी जोडल्या असतील गरजेचं नाही त्याची कारण आपल्या मनाशीच जोडलेली असतील. नेमक हेच आपण करतो. आपल्याला जेव्हा उदास वाटत तेव्हा आपण त्याची कारण अश्याप्रकारे शोधतो. पण याहूनही वेगळी कारण असू शकतात ज्यातून हा उदास पणा येऊ शकतो. ती कारणही आपण पाहिली पाहिजेत.

त्यासाठी आता म्हटल्याप्रमाणे फक्त मानसिक गोष्टी कारणीभूत नसतात. आपल्याला तीन गोष्टींचा प्रभाव पडत असतो. तो म्हणजे आपलं शरीर, आपल मन आणि आपण जिथे राहतो तो समाज. या तीन गोष्टींच्या भोवती आपल आयुष्य फिरत असत. आपल शरीर आणि मन या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. त्यांना पूर्णपणे वेगळं करता येणं शक्यपण नाही. त्यामुळे आपल्यामध्ये जी काही उलथापालथ होत असते त्यात या दोन्ही गोष्टींचा सहभाग असतो. शरीराचा आजार मनावर प्रभाव टाकतो, त्याचप्रमाणे मनाचा आजार शरीरावर प्रभाव टाकतो.

जेव्हा उदास वाटत तेव्हा पण असच होत. मुड स्विंग्ज येणं हे त्यातलच एक आहे. यामध्ये आपल्याला काही करू नये अस वाटत, काहीही कारण नसताना उदास वाटत असत. आणि हे कारण आपल्याला समजत नाही यामुळे अजून त्रास होतो. कारण समजत नाही यासाठी कारण आपण फक्त मनाचा विचार करतो जे खरतर शरीराशी असत. अनेक असे शारीरिक आजार आहेत ज्यातून उदास वाटू शकत. जसं की, थायरॉईड. थायरॉईडचा ज्यांना त्रास असतो त्यांना मुड स्वींग्ज येत असतात. त्यातून उदास पण वाटत असतं.

सीझनल अफेक्टिव डिसऑर्डर ज्यामध्ये बाहेरच्या वातावरणाचा आपल्याला परिणाम होऊन होर्मोनल बदल होतात आणि आपल्याला उदास वाटते. असेच शरीराशी संबंधित आजार आपल्याला उदास पण देतात. हे झालं शारीरिक. यानंतर येतो तो समाज. समाज हा घटक आपल्या आयुष्यात खूप प्रभाव पाडत असतो. जेव्हा समाजात अश्या काही घटना घडतात ज्या खूप त्रासदायक असतात, जसं की दंगे, हल्ले, नैसर्गिक आपत्ती, महामारी. या सारख्या घटना पण आपल्याला उदास करू शकतात. कारण माणूस हा संवेदनशील प्राणी आहे.

समाज हा माणसांनी बनलेला असतो. त्यामुळे इतरांच्या दुःखाशी आपण जोडले गेलो तर आपणही दुःखी होतो, उदास होतो. कोरोना असेल किंवा पूर ओळख असो व नसो एकेमकाना जी मदत केली गेली ती कश्यामुळे? कारण इतरांच्या दुःखाने पण आपल्याला त्रास झाला म्हणून. आता ही या दुःखाची चांगली बाजू झाली ज्यातून आपण इतरांना मदत होते.

पण जेव्हा एकसारखे असे प्रसंग घडतात, समाजात जेव्हा उलथापालथ होते तेव्हा आपल्या व्यक्तिगत जीवनावर त्याचा परिणाम होतोच. तसेच समाजात वावरत असताना सतत इतरांशी आपली तुलना करणे, दुसऱ्यांच्या आधारावर आपल्या जीवनाचं मोजमाप करणे यातून जी आपण एक असमाधानी वृत्ती तयार करतो त्यातूनही उदास पणा येतो. त्यामुळे जेव्हा कधी उदास वाटेल तेव्हा फक्त आपल यश अपयश न पाहता, आपल्या चुका न पाहता या बाकीच्या गोष्टी पण पहिल्या पाहिजेत, त्यांचापण विचार केला पाहिजे.

ही कारण का शोधायची? यातून आपल्याला काय मिळणार? तर अनेकदा आपला जो त्रास वाढत असतो तो आपल्याला त्याची कारण न समजल्याने. जर आपल्याला एखादी गोष्ट का होते आहे हे समजलं तर ती कशी बरी करायची हे समजत. म्हणून काहीही झालं तरी त्याचा एकांगी विचार न करता सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे. तर त्यावर सोल्युशन मिळायला मदत होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जेव्हा तुम्हाला उदास वाटते, तेव्हा तुम्ही त्याची अशी कारणं शोधता का?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!