ज्या प्रसंगात तुम्हाला महत्त्व नाही, तेथे तुमचा वेळ देऊ नका.
मयुरी महाजन
जेथे आपलं असणं नसण्याबरोबर असतं, तिथे आपलं नसणंच बरं असतं, आयुष्यात बऱ्याचदा असे प्रसंग येतात, की जवळची माणसं आपल्याला फक्त दाखवण्यापुरतंचं जवळच समजतात, बाकी आपल्या असण्याचा आणि नसण्याचा कुणालाही काही फरक पडत नाही, आपण जर कुठल्या प्रसंगाला हजेरी नाही लावू शकलो, तर आपल्याला वाटतं अरे यार, मला येथे भेट देता नाही आली, तर त्या व्यक्तीला वाईट वाटले असेल, ती व्यक्ती रागवेल माझ्यावर ,पण खरंतर कुणा वाचून कुणाचं काहीच अडत नाही, परंतु कोण कधी कामा येईल, तेही सांगता येत नाही, आपल्यालाही काम पडेल ,यासाठी निव्वळ कितीतरी नाती टिकून आहेत ,
प्रसंग कुठलाही असो, समोरच्या व्यक्तीसाठी आपण काय आहोत, हे जर आपण ओळखून असू ,तर त्या ठिकाणी आपण आपला वेळ जरूर द्यायला हवा ,या जगात पैसा धनसंपत्ती ,याहीपेक्षा कितीतरी पटींनी मौल्यवान असलेली गोष्ट म्हणजे ,आपली वेळ म्हणून तो मौल्यवान वेळ कुणालाही देताना विचार करूनच द्यायला हवा ,कारण आपण दिलेली वेळ, ही कधीच आणि कुठल्याही किमतीवर परत मिळवता येत नाही ,किंवा कुणाला देता येत नाही,
” ये वक्त बहुत किमती चीज है, जिसे भी दे रहे हो, सोच समझ कर देना, लोटताँ नही है…”
आपण आपला वेळ कुणाला, किती आणि कशासाठी देतोय, हे खूप महत्त्वाचे आहे ,जी लोकं आपलं मोल जाणतात, त्यांनाच आपण आपल्या आयुष्यात महत्त्व द्यायला हवं जी माणसं आपलं महत्त्व जाणत नाही, त्यांना आपला वेळ देऊ नका, कारण नको तेथे वेळ देऊन आपण आपली किंमत कमी करून घेतो, हे आपल्यालाही कळत असते, पण आपण भावनांच्या भरात वाहत जातो ,व नंतर आलेले अनुभव आपल्याला स्वतःलाच प्रश्न रूपाने सतावतात, कारण जिथे महत्त्व नाही तिथे महत्त्व देऊन आपण आपलीच किंमत कमी केलेली असते,
आयुष्यात आपल्या वेळेला साथ देणारी माणसे जोडावी , आपणही कुणाच्या वेळेला कामी यावे, यासारखे समाधान नाही, आयुष्यात कितीही नाती असू द्या, कितीही लोक असू द्या ,पण सर्वात आधी आपल्या स्वतःशी आपले नाते आहे, ते कदापि विसरू नका, आयुष्यातल्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात या नात्यानेच आपल्याला साथ दिलेली असते ,मनाच्या निस्वार्थ पणाला आपणच आपल्या स्वतःशी जोडायला हवे, व या स्वतःशी असलेल्या नात्याचा आत्मसन्मान आपण जपायलाच हवा ,सेल्फ रिस्पेक्ट ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे आयुष्यातील...
ज्यावेळेस ज्या प्रसंगात आपल्याला महत्त्व नाही ,तरी आपण जर त्या ठिकाणी वेळ दिला, तर आपल्या आत्मसन्मानाची किंमत आपण स्वतःहून कमी करतो, त्यासाठी ती सेल्फ रिस्पेक्ट जपणं, त्याची जाणीव ठेवणं, आवश्यक आहे, अन्यथा पश्चाताप आपल्याला इतरांपेक्षा स्वतःचा जास्त होतो, आणि तो कधीकधी असह्यही असू शकतो,
आपल्याही आयुष्यात काही लोकांचे महत्त्व हे अगाध असतं, जी माणसं खरंच आपलं महत्त्व जाणतात ना ….ती आपण नसल्यावर रागवतील, चिडतील, भांडतील, वेळप्रसंगी अबोला धरतील, पण आपल्याला जाब विचारतील ,अरे माझ्या आयुष्यातील इतका मोलाचा क्षण आणि तू मला वेळ दिला नाही, अशा ठिकाणी आपण आपला वेळ जरूर दिला पाहिजे, ज्यांना आपलं नसणं सतावतं.. त्यांच्यासाठी आपण असायलाच हवं….
बहुतेक वेळा प्रसंगानुरूप आपले महत्त्व ठरलेले असते, जसे की एखाद्या प्रसंगाला आपणच असलो पाहिजे, तेथे आपले महत्त्व बघूनच आपण वेळ द्यायला हवा, ज्याच्या नसण्याची खंत जाणवते ना ….तेथे त्याचं असणं खूप महत्त्वाचं व मोलाचं असतं …,
हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे, निव्वड कोणाच्याही म्हणण्या बोलण्यावर जाऊ नये, प्रत्येक वेळी कुणी आपल्याला बोलावते, याचा अर्थ असा नाही की ती आपल्याला जवळचं समजते ,किंवा त्याच्या अर्थी आपल्याला मोल आहे, समोरची व्यक्ती फक्त एक फॉर्म्युलाटी म्हणून जर काही गोष्टी करत असेल ,तर ते जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे, वेळ त्यांनाच द्या……. जे तुमच्या वेळेची किंमत जाणतात…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
