Skip to content

जे आहे त्यात समाधान मानायला हवे.. जे नाही त्यासाठी दुःख करण्यात काही अर्थ नाही.

जे आहे त्यात समाधान मानायला हवे.. जे नाही त्यासाठी दुःख करण्यात काही अर्थ नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)


“हवे हवेची हावच फसवी कधीच संपत नाही
मृगजळ फसवे समोर दिसता जो तो धावत जाई
हेच धावणे होऊन बसते जन्मभराचा ध्यास
सरते सारे जेव्हा होतो या ध्यासाचा भास…”

मृणाली कितीतरी दिवसांनी आज बागेत फेरफटका मारायला आली होती. आता आता च मुलांच्या शाळा सुर झाल्या होत्या त्यामुळे दिवसभर त्यांची आवराआवर, खाणं पिण बाकीची काम यात तिचा वेळ जात होता. बाहेर पडली तरी कामासाठीच पडणार अस व्हायचं. आज खूप दिवसांनी तिला स्वतःचा असा वेळ मिळाला म्हणून ती जरा बागेत आली. खूप छान वाटत होत तिला. लहान लहान मुलं मस्त खेळत होती, नवरा बायको फिरायला आले होते. वयस्क लोकांचा त्यांचा असा वेगळाच ग्रुप होता, त्यांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या. एकंदरीतच प्रसन्न अस वातावरण होत ते. सर्व जण नाचत होती, खेळत, खात, बागडत होती.

मृणालीला बागेत यायला आवडायचं त्याच अजूनही एक कारण असायचं. ते म्हणजे इथे आलेली सर्व लोक आहे त्या क्षणांचा आनंद घ्यायची, रमायची. मग लहान मुल आणि वृद्ध आजोबा पण. इथे लोक गरीब श्रीमंत वैगरे राहायचा नाही. निसर्गाच्या आणि छोट्या मुलांच्या सहवासात लोक आपलं दुःख काही काळा पुरत का होईना बाजूला ठेवत, विसरत आणि आताचा क्षण जगायचे. हे सर्व दृश्य खूप छान वाटायचं. या सर्वांना पाहून तिच्या चेहेऱ्यावर अापुसकच एक हसू यायचं.

असच ती बसली होती तेव्हा तिचं लक्ष एका ठिकाणी गेलं आणि तिला आनंद आणि आश्चर्याचा धक्काच बसला. कारण समोर तिची लहानपणीची मैत्रिणी दिप्ती होती. ती लगेच उठून तिच्याकडे गेली आणि तिला जोरात मिठी मारली. दिप्ती च लक्ष नसल्याने ती दचकली पण जेव्हा तिने मागे मृणालीला पाहिलं तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. त्यांना किती बोलू अस झालं होत म्हणून त्या दोघींनी मस्त भेळ घेतली व एका बाकावर येऊन बसल्या. खात खात त्यांनी बोलायला सुरुवात केली.

अग दिप्ती, किती वर्षांनी भेटतोय आपण, चेहेरा नाही बदलला तुझा पण बाकी अवतार फुल्ल बदलला आहे. एकदम मॉडर्न झाली आहेस तू. यावर दीप्ती जरा लाजली आणि म्हणाली, तू मात्र अजून तशीच आहे हा! दिप्ती तिला हसत म्हणाली. खरच मृणाली फार बदलली नव्हती. तशी चांगल्या घरात असूनही त्याच वार कधी तिच्या डोक्यात शिरल नव्हत. लहान असल्यापासून समंजस आणि समाधानी अशी तिची वृत्ती असायची. दिप्ती जरा या उलट होती. आहे ते ठीक आहे पण त्याहून अजून पाहिजे. आईने छान फ्रॉक आणला तरी रियाकडे जसा क्लिप आहे तसा मला हवा. नेमके नाही ते हवं असणारं.

आताही परिस्थितीत काही फार बदल नव्हता. हे मृणाली जेव्हा दिप्तिशी गप्पा मारू लागली तेव्हा तिला समजलं. खूप दिवसांनी भेट झाली होती, त्यामुळे घराबद्दल वैगरे विचारणं आलच. त्यावर दीप्ती च बोलण अस, अग मस्त आहे ग सर्व, अरेंज मॅरेज च केलं आम्ही. पण मी आधीच सांगून ठेवलं, मला चांगलं घर मोठं, गाडी वैगरे हाताखाली कोणतरी असणार हवं, नवरा पण नीट चांगल्या स्वभावाचा हवा. सुदैवाने तसाच मिळाला. हे ऐकुन मृणाली पण आनंदित झाली.

तिला दिप्तीचा लहान पणीच स्वभाव माहीत होता, ती कधी समाधानी अशी नसायची. पण आता संसारात तरी ती समाधानी आहे हे ऐकुन तिला बरं वाटलं. पण अस नव्हत. दीप्ती पुढे सांगू लागली, सर्व ठीक असल ना तरी मला काय हे अगदी परिपूर्ण वाटत नाही. आता माझा नवरा हुशार आहे, कमवणारा आहे. मग काय बिघडलं जर मी त्याला नवीन काहीतरी आणायला सांगितलं तर. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत. दर वेळी काहीतरी नवीन असतंच त्यांच्याकडे. आणि ती बाई तर मला मुद्दाम बोलावून सर्व दाखवते.

मग मलाही वाटत आपल्याकडे पण ते असावं. म्हणून मी ते आणायला सांगते तर ते माझ्या नवऱ्याला पटत नाही. त्याच म्हणणं एकच आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे का?जर नसेल तर का आणायची. आहे त्यात आपण आनंदी राहायचं. पण तुला माहीत आहे मृणाली मला एकाच गोष्टीत अडकून राहायला आवडत नाही. नव नवीन वस्तू गोष्टी झाल्या की मस्त वाटत. पण ते यांना कोण सांगणार अस बोलून तिने जरा तोंड वाकडं केलं.

यावर मृणाली हसली व म्हणाली, खरच तू अजिबात बदलली नाहीस, मला सुरुवातीला वाटल पण तू अगदी आहे तशीच आहेस. दीप्ती जरा फुरंगटून म्हणाली, होहो तुला वाटतच नाही ना आपल्याकडे काही असावं अस. संत तू. मृणालीला तिच्या या वागण्याची सवय होती त्यामुळे तिला तस काही वाटलं नाही. पण तिला तिच्या या स्वभावात फरक पडला पाहिजे अस मात्र वाटलं. दीप्ती मला का नाही वाटणार की नवीन काही येऊ नये. मलाही वाटतच की! पण फरक हा आहे की मी त्यासाठी आहे त्यातला आनंद नाही ग घालवत.

माझ्या कडे आता जे आहे त्यात मी खूप समाधानी आहे. तू तुझ्या नवऱ्याची तक्रार करतेस पण तू तो म्हणाला त्याप्रमाणे खरच कधी विचार केला का? खरच ज्या गोष्टींचा तू हट्ट करतेस त्याची काही गरज असते का? आहे त्यात तुझं भागत का नाही? हे जे तुला सतत काहीतरी वेगळं झालं पाहिजे, नवीन घेतल पाहिजे अस वाटत हे स्वतःहून आलेले असत की तुलना करून? तुलाही याच उत्तर माहीत आहे. अशी तुलना करून आपण कधीच समाधानी होऊ शकत नाही.

आज तू त्यांनी आणलं तस आणशील ही कदाचित. पण कुठ पर्यंत? तुलना करायची असेल तर स्वतःशी कर. काल मी कुठे होते आणि आज कुठे आहे. फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये समाधान न शोधता आपल्या आत काय चांगले बदल होत आहेत त्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहिलं तर त्या होणाऱ्या बदलाने तो अधिक समाधानी होशील. हे समाधान आल्यावर तुला तुझ्याकडे आहे त्या गोष्टीतून ही समाधान मिळायला लागेल. आणि नवीन काही हवं असल तरी आताचा आनंद टिकवून ते कसं मिळवता येईल आणि त्यासाठी काय चांगले प्रयत्न केले पाहिजेत याकडे लक्ष दिलं तरी नाही त्याच दुःख होत नाही.

मृणाली ने जरी हे आपल्या मैत्रिणी ला सांगितलं असल तरी हे आपल्या सर्वांना लागू होत. आपण पण जे आहे त्यात आनंद मानला पाहिजे. एखादी गोष्ट नसण्याची बरीच कारणं असतात. जी दर वेळी सोडवता येत नाहीत. मग का बर आपण असा अट्टाहास करायचा. कोकिळेचा गळा चांगला असतो पण म्हणून तिने त्याकडे लक्ष न देता अस म्हटल की मला मोरसारखा सुंदर पिसाराच हवा तर ते शक्य आहे का? नाही ना! तसचं आपल्या आयुष्याचं आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या कराव्यात,आणि समाधानी रहावं. हाताबाहेर आणि नसलेल्या गोष्टी साठी दुःख करण्यात काही अर्थ नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जे आहे त्यात समाधान मानायला हवे.. जे नाही त्यासाठी दुःख करण्यात काही अर्थ नाही.”

  1. रविंद्र मधुकरराव धुर्वे

    बरा आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!