जवळच्या लोकांची उगाचच वाटणारी चिंता अशी दुर करा.
मयुरी महाजन
माणूस म्हटलं की तिथे जवळीकता आलीच, नाही तर त्या माणूसपणाला तरी काय अर्थ आहे, जन्म होण्याअगोदर आईच्या उदरात आपण तिच्या सर्व हालचाली सर्व गोष्टी त्या उदरात अनुभवतो, आई जन्मदात्री आहे ,तसेच आपले वडील आपल्या उभ्या आयुष्याचे भविष्य पाहणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे मुलांना सर्वात अधिक जवळीकता आपल्या आई वडिलांची असते, तसेच आई-वडिलांनाही आपल्या मुलांप्रती कायमच जवळीक असते, फरक इतकाच असतो कोणी दाखवते, तर कोणी दाखवत नाही, ह्या गोष्टी स्वभावानुसार ठरत जातात,
आता जी व्यक्ती कायम हृदयाच्या जवळ अगदी मनापासून आपली असते, त्या व्यक्तीला आपण कधी आपल्यापासून लांब जाऊ देत नाही, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आई-वडील आपल्या मुलांची चिंता करतात, ते कितीही मोठे झाले तरीही,
श्याम आणि आई यांची एकदम गप्पांची मैफल रंगायची ,आणि ते दोघं घरात असल्यावरती घर आनंदाने डुलायचे, घरातला त्यांचा कल्लोळ ती भांडणे हे सारे खरे तर घराला घर असल्याची जाणीव द्यायचे, घराला घरपण त्यांच्यामुळे असायचे ,श्याम कितीही खोडकर असला तरी आईचा शाम वरती प्रचंड जीव व श्यामचाही आई वरती ,परंतु श्याम हळू हळू मोठा होऊ लागला, तसतसे शामला जगाचे अनुभव यायला लागले, आपण सुद्धा शिक्षणासाठी बाहेरगावी जावे, हा विचार त्याने बोलून दाखवला, हा विचार चांगला असला तरी, श्याम दूर जाणार ,याने आई व्याकूळ व्हायची, की तू जाणार पण माझे मन मात्र कायम तुझ्यात अडकलेले असेल, कारण वेगळ्या ठिकाणी तू कसं करणार तुला जेवण कसे मिळेल, वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ,…..
सर्वांच्या मताने श्यामचे शहरात शिक्षण घेण्याचे ठरले ,मात्र श्याम ला पाठवताना तिला अश्रू आले, व जड अंतःकरणाने तिने श्यामला शिक्षणासाठी पाठवले होते,ती रोज फोनवर ती बोलायची, विचारपूस करायची ,त्याला नको त्या सूचना देत, दमदाटी द्यायची,
एके दिवशी गावात एक वार्ता आली आणि श्याम सारखाच एक मुलगा त्याच्या वयाचा शिक्षणासाठी शहरात गेलेला त्याचा कॉलेजच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाला, असे समजले, परंतु त्याचा परिणाम झाला श्यामच्या आईवर, ती श्यामला घरी ये म्हणून सांगू लागली, मी तुला कुठे जाऊ देणार नाहीस, अशा आविर्भावात आईची काळजी जरी स्वाभाविक असली ,तरी उगाच नको त्या गोष्टींची चिंता माणसाला आतून पोखरून लागते,
कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात कधीच नसतात ,त्यामुळे ज्या गोष्टी आपण थांबवू शकतो त्या नक्की थांबवायला हव्यात….
आपण आपल्या जवळच्या माणसांना गमवायला घाबरतो, म्हणूनच उगीचच करत असतो, परंतु ती चिंता दूर कशी करावी हा आपल्याला पडलेला प्रश्न असतो, बघूया त्याचं सोपं गणित…
एक- सर्वात आधी तर आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की ज्या गोष्टीसाठी आपण ही चिंता करतोय ,ती चिंता करणे खरंच तितकेच गरजेचे आहे, का?
दोन- दुसरं म्हणजे चिंता करून समस्या येथे थांबणार नाहीये, किंबहुना आपण आपल्याच समस्या निर्माण करून घेतो ,
तीन-ज्या विषयी आपण चिंता करतोय, त्यावर जर आपण चिंतन करून पर्यायी मार्ग शोधून त्यावर विचार केला तर उगीचच केली जाणारी चिंता ही नाहीशी होणारं,
चार- कितीही नाही म्हटलं तरी विशिष्ट टप्प्यावर ती आपण सर्व चिंतेत पडतो ,परंतु एखादी महत्त्वाची वस्तू सापडत नाही, आणि आपण चिंता करतोय, घरात पसारा करतोय, परंतु तीच वस्तू निवांत शांतपणे बसल्यावर अगदी डोळ्यासमोर दिसते, या उदाहरणावरून आपण आपल्या चिंतेला घालवण्यासाठी शांतपणे विचार करायला हवा …
पाच-काही जबाबदारी आपण कोणाला दिल्यावर त्याबद्दल निश्चिंतपणे असायला हवे, कारण आपल्याला असं वाटतं आपली माणसे हि जबाबदारी कसं पेलणार त्यामुळे काही गोष्टी तिथल्या तिथेच सोडून द्यायला आपण शिकायला हवं….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Good