जर तुम्हाला नाही म्हणता येत नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात.
सोनाली जे.
बरेचवेळा व्यक्तींना समोरची आपली व्यक्ती असो किंवा परकी तिला नकार देणे जमत नाही . असे का घडते बरे ?
१. कारण आपल्याला समोरच्या व्यक्तीला गमावयचे नसते.
आपली अशी मनोधारणा असते की , आपण जर नकार दिला तर समोरची व्यक्ती आपल्यावर नाराज होईल, कदाचित चिडेल, किंवा कदाचित आपल्या एका नकाराने ती व्यक्ती आपल्यापासून कायमची दूर जाईल. आपण कायमचे त्या व्यक्तीला गमावून बसू. ही मानसिकता असते. भीती असते किंवा मनात शंका असते.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कोणत्याही कृती मुळे आपल्यापासून ती व्यक्ती दूर जावू नये , त्या व्यक्तीला आपल्याला कायमचे गमवांयचे नसते म्हणून आपण ती व्यक्ती जे म्हणेल तसे वागत असतो. तिला कोणत्याच गोष्टींना नकार देत नसतो.
२. एखादी व्यक्ती आपली म्हणले की ती जशी असेल तशी आपली असे मानणारी , स्वीकारणारी काही जण असतात.
मग कधी प्रेमात असलेली स्त्री ज्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे त्याची प्रत्येक गोष्ट स्वीकारते. तो म्हणेल त्याला होकार देते. कारण काय तर तिने त्याला पूर्णपणे स्वीकारले असते. प्रेम हे मनापासून केले असते. त्याच्यात पूर्ण involve होवून गेली असते ती.
३. काही लोक हा / ही आपला / आपली जवळची आहे. नात्याची आहे. त्यांना दुखवयला नको. नाते आहे जवळचे त्यांना जर नकार दिला एखाद्या गोष्टीला तर ते दुखावतील शिवाय इतर नातेवाईक , जवळच्या व्यक्तींच्या मध्ये आपल्या विषयी काही गैरसमज पसरवले जातील. आपली प्रतिमा ही चांगली राहावी याकरिता कधी कधी नकार देत नाहीत.
तर कधी कधी आपल्या लोकांची काळजी असते म्हणून ही ते नकार देत नाहीत. त्यांना वेळेला मदत करण्याची वृत्ती असते.
पण बरेचवेळा असे होते की आपण इतरांना नाही म्हणू शकत नाही. वेळीच नकार देवू शकत नाही. स्पष्टवक्तेपणा दाखवू शकत नाही. आणि मग लोकं तुमचा फायदा , गैर फायदा घेतात. किंवा मग तुम्हाला कायम गृहीत धरतात. तर कधी तुमची फसवणूक ही करतात.
जर तुम्हाला नाही म्हणता येत नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात.
जसे नातेवाईक, मित्र मंडळी , जवळच्या व्यक्ती यांस जर आर्थिक मदत पाहिजे असेल आणि त्यांनी तुमच्याकडे मदत मागितली तुम्ही जर नकार देवू शकत नसाल. नाही म्हणता येत नसेल तुम्हाला तर तुम्ही काही ही करून ती रक्कम त्यांना देणारच. मग तेव्हा तुमच्याकडे तेवढी रक्कम नसेल तर बाहेरून कसे ही manage करून , स्वतः कडच्या saving किंवा राखून ठेवलेल्या पैशातून , वेळ प्रसंगी तुमच्या कडे असणारी एखादी मूल्यवान वस्तू गहाण टाकून , विकून त्यातून पैसे उभे कराल.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्याकरिता जे केले त्याच्या विषयी एक शब्दाने त्यांना जाणीव ही करून देणार नाही तुम्ही.
समोरच्या व्यक्तीची गरज संपली की ती व्यक्ती जी मदती करिता गोड गोड बोलणारी अगदी तुम्ही कोण अशा आवेशात वागत असते. नंतर आनंदाच्या क्षणी तुमची आठवण ही नसते. आणि तुमचे पैसे परत करण्याची वृत्ती ही नसते. किंवा केलेल्या मदतीची जाणीव ही नसते.
तुम्ही त्यांच्याकरीता मदत केली म्हणजे काय करायलाच पाहिजे होती असा attitude ही त्यांचा असतो.
यातून बरेचवेळा तुमची आर्थिक परिस्थिती तर कोलमडून जातेच. पण मानसिक त्रास ही होतात कारण एक तर तुम्ही वेळेला केलेल्या मदतीची किमंत ही शून्य होते. आणि तुमच्या वेळेला परत मदत मिळत नाही. पैशाच्या बाबतीत परत देण्याची वृत्ती खूप कमी असते. आठवण केली तर कुठे पळून जाणार आहे का अशी उलटी उत्तरे ऐकून घ्यायची. मिळाले तरी कुठे तरी परत घेतले म्हणून नाती बिघडतात.पूर्वी सारखी राहत नाहीत त्यामुळे आपणहून ओढवून मनस्ताप करून घेतल्यासारखे च. मोठे धर्म संकट आणि कायमचा वाईटपणा .
तसेच प्रेमाचे आहे. एखाद्या गोष्टीला त्याक्षणी नकार दिला तर तो नकार तेवढा दिसतो आणि त्यावर पटकन action घेतली जाते. पण नकार का आणि कोणत्या परिस्थितीत , कोणत्या कारणासाठी दिला याचे विचार ही केले जात नाहीत किंवा समजून ही घेतले जात नाही.
शिरीन आणि श्रेयस दोघांचे जीवापाड प्रेम, लग्न ही करणार होते दोघे. रोजच भेटायचे. प्रेमाच्या गप्पा..फोनवर गोड संवाद. मेसेज होत होतेच. रोज बाहेर फिरणे. पिकनिक.दोघांच्या घरून लग्नाला ही संमती होती.
आजपर्यंत एका दिवसाच्या पिकनिक नेहमी होत. यावेळी श्रेयस ने हट्ट धरला की आपण दोघांना समजून घेतले पाहिजे, अजून जास्त वेळ दिला पाहिजे म्हणून चार दिवसाची ट्रीप त्याने ठरवली. शिरीन चे आई बाबा ही काळजीत पडले. पण शेवटी श्रेयस ने हट्ट च धरला त्यामुळे श्रेयस आणि शिरीन दोघांच्या आई बाबांनी होकार दिला पण तेही या अटीवर की लग्नापूर्वी तुम्ही कोणत्याही मर्यादा ओलांडणार नाही. दोघांनी कबूल केले.
जाताना मस्त आपली गाडी घेवून गेले. प्रवासात गप्पा गोष्टी ..जोक्स. एकमेकांना खाणे पिने भरवत मध्येच हलका स्पर्श..रोमांचित करत होता. निसर्गाच्या सानिध्यात..पुढे मस्त समुद्रकिनारी तिथले वॉटर स्पोर्ट्स. असे करून परत जेव्हा त्या धुंद मस्त वातावरण एकमेकांच्या गोड सहवासातून हॉटेल वर आले तेव्हा थोडे हलके ड्रिंक सोबत लाईट music आणि मस्त लाईट इफेक्ट यात दोघेही अजून च रोमँटिक वातावरणात गेले. तरी शिरीन मर्यादा ठेवून होती. पण श्रेयस मात्र खूप जास्त जवळीक करत होता. आणि शेवटी त्याने न राहवून शिरीनला आपल्या बाहू पाशात ओढून घेतले. हळूहळू नाही नाही म्हणता म्हणता दोघांनी ही दिवसभराच्या एकमेकांच्या गोड सुखद सहवासात घालवलेल्या त्या मस्त क्षणांनी आलेल्या त्या रोमांचक वातावरणाने दोघांनी मर्यादा ओलांडल्या.
दुसरे दिवशी ठरवून की काल झाले तेवढे पुरे..आता जे काही असेल ते लग्नानंतर असे दोघांनी ही खूप बजावले मनाला. पण तसेच घडले दिवसभराचा गोड सहवास..निसर्गरम्य वातावरण, बोटीवरच्या त्या धुंद वातावरणात आणि संगीतात दोघेही धुंद झाले आणि परत त्या रात्री ही तेच घडले.
दोघे तिकडून परत आल्यावर खूप आनंदी आणि एक वेगळेच सुख दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आता लग्नाची घाई करायची असे घरचे ही ठरवत होते . आणि हे दोघेही.
आणि अचानक श्रेयस ला ऑन साईट परदेशात जावे लागणार हे कन्फर्म झाले. त्याची निघण्याची घाई सुरू झाली. तिकडून आल्यावर लग्न करू असे म्हणून तो निघाला सुधा. तिकडे गेल्यावर सतत शिरीन ला इकडे ये म्हणणारा श्रेयस प्रोजेक्ट मध्ये अडकून गेला. लवकर येण्याची चिन्हे काहीच नव्हती. शिरीन इकडे प्रेग्नंट होती पण तिने श्रेयस घ्या आणि तिच्या आई बाबांना स्पष्ट घडले ते सांगितले. श्रेयस चे आई वडील हे मूल accept करण्यास तयार झाले नाहीत. पण शिरिनला मात्र आई बाबांनी साथ दिली.
श्रेयस शिरीन वर नाराज होता कारण ती तिकडे जाण्यास तयार नव्हती..पण त्याला बाळाचे आगमन होणार आहे हे माहितीच नव्हते. शिरीन बरोबर हळूहळू त्याचे व्हिडिओ फोन कमी होत गेले बिझी आहे म्हणत केवळ कधी तरी मेसेज होत होते.
इकडे शिरीन मात्र शेजारी पाजारी ..नातेवाईक , ओळखीचे, ऑफिस इथे मात्र सगळ्यांचे टोमणे खात होती. श्रेयस चे आई वडील तर त्यांनी कधीच संबंध तोडले होते.
पण केवळ शिरीन आणि तिचे आई बाबा खंबीर होते. ते सगळ्या परिस्थितीला तोंड देत गेले. आणि शिरीन नी एका गोंडस मुलाला जन्म दिला. खूप आनंद झाला त्यांना.
समाज नावं ठेवत होता. आपले जवळचे लोकही त्यात कुठे कमी पडत नव्हते.
बरेचवेळा शिरीन ला ही असे वाटायचे की, त्या क्षणी त्या धुंद वातावरणात एक नकार दिला असता तर आज हे संकट तिच्यावर आले नसते. तिने आवडीने मुलाला जन्म दिला पण आपल्या समाजाला ते मान्य नाही ..
तिचे आई बाबा साथ देत.समजावत. खूप सकारात्मक राहण्यास सांगत. त्या दृष्टीने प्रयत्न करत आणि हेही दिवस जातील. सगळे दिवस सारखे नसतात हे सांगून तिला खंबीर रित्या पुढे positively जाण्यास मदत करत होते.
दोन वर्षांनी श्रेयस एकदम surprise द्यायचे म्हणून शिरीन ला भेटण्यास आला तेव्हा त्याला सगळी खरी परिस्थिती समजली. त्याने आई बाबांच्या विरोधात जावून बाळ आणि शिरीन दोघांना आपलेसे केले. पण आई बाबांचा रोष पत्करावा लागला.
असे प्रसंग आयुष्यात घडत असतात. आपण कायमच होकार देत गेलो तर आपल्याला गृहीत धरतात.
जर तुम्हाला नाही म्हणता येत नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात.
अगदी जावयाची गोष्ट माहिती सगळ्यांना ..पहिल्यांदा सासरी गेलेला जावई..जेवायला मेथी ची भाजी आणि इतर पदार्थ ही होते कशी झाली भाजी खूप मस्त म्हणाल्यावर सारखीच मेथी पानात . जावई नकार देवू शकला नाही आणि भाजी संपली की परत वाढणे सुरू .. त्यातून कशी बशी संपविली पण रात्रभर पित्ताचा त्रास सहन करावा लागला त्याला. हेच वेळीच नकार दिला असता तर त्रास वाचला असता आणि आजारी पडण्याचे संकट वाचले असते.
अशा अनेक गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात. इच्छेविरुद्ध कधी ही होकार देवू नका. कधी तरी नकार देण्यास , स्पष्ट राहण्यास ही शिका.
एखाद्याला गमावू म्हणून त्याच्या हो ला हो म्हणू नका. तर Train yourself to let go of everything you fear to lose.
आयुष्य सुंदर आहे .भरभरून जगताना इतरांच्या मताचे गुलाम होवून त्यांच्या हो ला हो म्हणण्यापेक्षा आपले एक स्वतंत्र व्यक्तित्व घडवा. कधी कधी वेळीच देण्यात येणारा नकार ही खूप मोठे व्यक्तिमत्त्व घडवत असतो.
थॉमस एडिसन चे उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. त्याला शाळेतून एक दिवस घरी पत्र दिले ते त्याने आईकडे वाचण्यास दिले. आईने ते वाचून एडिसन ला सांगितले की शाळेतून पत्र असे आले की तुमचा मुलगा खूपच हुशार, genius आहे.आमच्या शाळेत आम्ही त्याला शिकवू शकत नाही.
आई पुढे लगेच म्हणाली आजपासून तुला मीच घरी शिकवत जाईन. तुला कोणत्याही शाळेत घालण्यास माझा नकार आहे. लहानपणापासून विविध प्रयोगाची आवड असलेल्या एडिसन ने पुढे अनेक शोध लावले आणि मोठा शास्त्रज्ञ बनला.
पुढे एक दिवस तो त्याचे कपाट आवरताना त्याला जुनी डायरी दिसली त्यात ते शाळेचे पत्र दिसले त्यात असे लिहिले होते की तुमचा मुलगा मंद आहे आम्ही त्याला शिकवू शकत नाही तुम्ही घरीच शिकवा.
एडिसन ला ही ते आईचे वाक्य आठवले की तुमचा मुलगा खूप हुशार आहे. आणि तिने त्याला कोणत्याही शाळेत घालण्यास नकार देवून स्वतः शिक्षण दिले. उलट त्याच्यावर खूप मेहनत आणि personal attention तिला देता आले आणि त्यातून त्याची विविध प्रयोग करण्याची आवड ही तिला समजली आणि वाढीला लागली कारण ते समजले की त्याला प्रयोग करण्यास आवडतात तेव्हा त्याच्या वडिलांनी ही त्याला भरपूर प्रयोगाची पुस्तके आणून दिली. आई वडिलांनी प्रोत्साहन दिले.
याउलट तो नॉर्मल मुलांच्या शाळेत शिकला असता तर त्याला कायम कमी , मंद म्हणूनच हिणवले गेले असते आणि तो अजून मागे राहिला असतां. त्याला निराशा आली असती.
म्हणून वेळीच दिलेला एक नकार तुम्हाला अनेक गोष्टीपासून , त्रासापासून वाचवितो. जर तुम्हाला नाही म्हणता येत नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात. म्हणूनच वेळीच नकार द्यायला शिका.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


अगदी छान