जग झपाट्याने बदलतेय आणि तुम्ही?
रोहिणी राधाकिसन
जग झपाट्याने बदलतेय, आपण जगाचा वेग नाही पकडला तर आपण या शर्यतीत खूप मागे पडू. येथे असं कोणीच नाही ज्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहीत नाही हो ना! पण कदाचित या गोष्टीचा खूप मोठा परिमाण आपल्या आयुष्यावर होऊ शकतो जर आपण गोष्टीचा निष्कर्ष समजून घेतला तर, आता मला सांगा ससा एवढा जलद, चपळ आणि वेगवान असूनही शर्यत हरला, आणि कासव एवढा शांत ,शिथिल असूनही तो शर्यत जिंकला. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की ससा जोमाने निघाला पण एका क्षणानंतर थांबला , आणि कासव त्याच्या मंद गतीनेका होईना ना थांबला ,ना थकला त्याने त्याचे प्रयत्न देखील नाही थांबवले, की असा विचार नाही केला की ससा एवढा जलद , गतीशील आपण कसे जिंकणार , त्याने फक्त एकच केल आणि ते म्हणजे तो चालत राहिला अगदी सातत्याने बरोबर ना ! मग एक प्राणी असून जो गुण त्या कासवाकडे आहे तो मनुष्य असून आपल्याकडेही नाही.
आपण एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपल्याकडे किती काबिलियात आहे ते काम करण्यासाठी याचा विचार कधीच नाही करत किंवा, आपण हे काम कसे पूर्ण करू शकतो , जास्तीत जास्त या पासून फायदा किती करून घेऊ शकतो याचाही विचार नाही करत ,किंवा मग या कामाला कमालीत बदलण्यासाठी मला स्वतःवर किती काम करावे लागेल ,यासाठी मला कुठल्या गोष्टींची गरज लागेल ,भांडवल किती लागेल याचाही विचार नाही करत. आपण विचार याचा करतो की जर मी हे काम केल तर मला कोण हसणार तर नाही ना?, जर माझ काम यशस्वी नाही ठरल तर कोणी मला नाव तर नाही ना ठेवणार ?, आणि जर माझ भांडवल बुडाल तर मला घरचे काय म्हणतील?, आणि जर मला याच्या मध्ये यश मिळालचं तर मी कसा पैसे उधळिण? आणि खूप.. . . . . . . . . या विचारांमध्ये अडकलेले असेच आणखीनही पलंगावर मोबाईल हातात घेऊन स्क्रोल करत बसलेत. आणि जे स्वतःवर विश्वास ठेऊन ,परिणामांचा विचार न करता कामाला लागले ते आज यशस्वीरित्या बदलत्या जगासोबत आयुष्य जगत आहेत. आता तुम्ही म्हणाल की अस थोडी असत की प्रत्येक व्यक्ति यशस्वी ठरतोच ? बरोबर ,पण त्यांच्याकडे वेळ असताना स्वतःवर विश्वास ठेऊन एक संधी स्वतःला दिल्याच समाधान तरी आहे.
जग 100 च्या स्पीड ने धावतंय आपण त्यासोबत 40 च्या स्पीडने तरी चाललं पाहिजे नाही तर आपण असे कुठे तरी असू, कोणापर्यंत आपला आवाजही नाही पोहचणार. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही , सोफ्यावर बसल्या-बसल्या लोकांच्या कर्तुत्वाच्या गाथा एकण्यापेक्षा , आपली ही गाथा कोणी एकावी यासाठी जरा हालचाल करा, जे आहे त्यापासून सुरवात करा, सातत्याने करा जे करायच आहे ते ,कधी तुमची मेहनत तुम्हाला कुठल्या शिखरावर नेऊन ठेवेल तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण त्यासाठी तुम्हाला पहिले ठरवाव लागेल की तुम्हाला काय करायचंय . आणि त्यासाठी
1.पहिली स्टेप म्हणजे लोक काय म्हणतील या विचारातून बाहेर येणं .
2. दुसरं म्हणजे स्वतःच्या कार्यक्षेत्राची ओळख करून घेणे.
3. आपल्या स्वप्नाला सत्यात आणण्यासाठी स्वतःवर किती काम करावं लागेल ते समजून घेणे.
4. यशासाठी योजना आखणं.
5. महत्वाच म्हणजे पहिली स्टेप घेणं, छोटीका होईना पण सुरुवात करा.
6. आणि सर्वात महत्वाच जे कराल ते सातत्याने करा.
बऱ्याचदा आपण एखादे काम खूप जोमाने सुरू तर करतो पण शेवट नाही होत , आपण विचार करतो की, नाही आता या कामात रस नाही वाटत, दुसरं काही तरी करुयात त्याचही तसंच आणि एक वेळे नंतर आपण सर्वच सोडून देतो , विचार करतो की मला यशच नाही कुठल्या कामात , हे मला जमणारं नाहीचं , पण तुम्ही विचार केला आहे का? की, या जगात खूप अश्या अशक्य गोष्टी शक्य करणारी खूप लोकं आहेत , त्यांनी केल मग आपण का नाही करू शकत? तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे .
आपण मागे पडतो ते आपल्या सवयींमुळे. व्यक्ती किती यशस्वी होईल हे त्याच्या सवयींवर ठरतं. यशस्वी व्यक्तिंमध्ये काही सवयी आपल्याला सारख्या बघायला मिळतात . जसं की –
1. सकाळी लवकर उठण्याची सवय त्यांना सर्वांच्या पुढे ठेवते , जिकडे आपण आणखी आपल्या पलंगावर घोरत असतो , तिकडे त्यांची महत्वाची कामे पार पडलेली असतात.
2. प्रत्येक परिस्थितीमध्ये काही नवीन संधी शोधणे, आणि आपण त्याच परिस्थितिला समस्या समजतो , जॉब गेला बॉसला शिव्या घालतो ; आणि ते याला संधी समजून स्किल
वाढवून जास्त पगाराची नौकरी शोधतात किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करतात.
3. प्रत्येक अडचणीत सकारात्मक राहून मार्ग शोधतात आणि आपण हे माझ्याचं सोबत का झालं म्हणून रडत बसतो.
4. यशस्वी लोक स्वतःवर लक्ष देतात इतरांवर नाही.
5. वेळ आपल्याकडे आणि त्यांच्याकडे सारखीच आहे पण तरीही आपण जगाच्या मागे आणि ते जगाच्या पुढे , कारण एकच आहे, आपण वेळेला महत्वच नाही देत , आपला वेळ मोबाईल अॅप्स् स्क्रोल करण्यातच जातो.
वेळ हा पैश्यांपेक्षा मौल्यवान आहे , आपण तो वाया नाही घालवला पाहिजे,;त्याचा योग्य वापर केला पाहिजे,तरच आपण या जगाच्या बरोबरीनं राहू!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chan
Khup avdala
Jabardast
खूप छान
खूप छान
अप्रतिम
Kup sunder👌👌