Skip to content

सतत दुःखामध्ये घुटमळण्यापेक्षा इतरांच्या जगण्याचे कारण बना.

सतत दुःखामध्ये घुटमळण्यापेक्षा इतरांच्या जगण्याचे कारण बना.


दिपाली मुळे

(इमेज कन्सल्टंट अँड लाइफ कोच)


प्रिया एक सुशिक्षित गृहिणी ….नवरा ,दोन मुलं, सासू-सासरे ,दिरजाऊ अशा एकत्र कुटुंबात राहणारी मोठी सून…. प्रिया च्या लग्नाला वीस वर्षे झाली होती .हल्ली प्रिया चा स्वभाव चिडचिडा ,रागीट ,कुरकरा झाला होता .यज्ञेश म्हणजे प्रिया चा नवरा खूप काळजीत होता .की आज काल प्रियाला नेमके काय झाले ???आज त्याने प्रियाशी स्पष्टपणे बोलायचे ठरवले .यज्ञेश घरी आला तेव्हा प्रिया चा चेहरा उदास दिसला .रात्री सगळे आवरल्यावर यज्ञेशने प्रियाला विचारले ,”प्रिया, तुझ्याशी थोडं बोलायचे आहे .” प्रिया अनिच्छेने हो म्हणाली.

यज्ञेश ने शांतपणे बोलण्यास सुरुवात केली.” प्रिया, हल्ली तू खूप चिडचिड करतेस, कायम कुरकुर करतेस ,उदास असतेस ,काय झाले ?काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? काही त्रास होतोय का तुला?” प्रिया हे ऐकून वैतागली .”हे पहा मला काही तब्येतीचा प्रॉब्लेम नाही आणि चिडचिड म्हणाल तर खूप कारणे आहेत त्याची…. सासूबाई त्यांचे वागणे त्यात आता भर जावेचे वागणे ,तुम्ही घरात काही लक्ष देत नाही ,मुलंही माझे ऐकत नाहीत .ते सगळं कसं मी सहन करते माझे मलाच माहीती… कुठल्या कुठल्या दुःखाचे अग्निदिव्य मी सहन करते ते तुम्हाला कळणार नाही…”

मंडळी वर वर पाहता प्रिया दुःखी आहे असे वाटत असले तरी या तर शुल्लक तक्रारी आहेत .दुःख समजून कवटाळून बसली होती. ज्यामुळे आपल्या मनाविरुद्ध गोष्टी होतात त्यावेळी त्या गोष्टींना दुःख समजून आपण बऱ्याचदा त्यातच घुटमळत राहतो आणि जगण्यातला आनंद गमावून बसतो… दुसरे उदाहरण पाहूया… गिरीष आणि गोपाल दोघे ऑफिस सहकारी आणि मित्र देखील ….गिरिषचे वडिलोपार्जित मोठे घर ते ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी…. बायको ,मुलं ,आई वडील…. सगळेच काही वरवर पाहता चांगले वाटत होते पण गिरीष कौटुंबिक भांडणामुळे वैतागलेला…. कायम दु:खी उदास…. गिरीषच्या उलट गोपाल भाड्याच्या छोट्याशा घरात राहणारा आई-वडील, पत्नी, एक मुलगी एकत्रपणे आनंदाने राहणारा ….संघर्ष त्यांच्याही आयुष्यात होता….दुःख होते …

पण गोपाल त्या दुःखाला कुरवाळत बसला नाही याउलट निराधार मुलांच्या एका संस्थेसाठी विनामूल्य तो काम बघत होता. ऑफिसचे काम सांभाळून या संस्थेचे काम बघणं याच्यातच त्याचा दिवस जात होता .गिरीष कायम मित्रांमध्ये आपल्या दुःखाचा पाढा वाचत असे .कायम तक्रार कुरकुर करण्यात धन्यता मानत असे.यामुळे आता मित्रमंडळी त्याला टाळू लागले होते .गोपाल मात्र मित्रमंडळींमध्ये आपल्या स्वभावामुळे आणि त्याच्या गुणांमुळे सगळ्यांना आवडत होता.

मंडळी अशी अनेक उदाहरण आपण पाहू शकतो. काही माणसांना छोट्या अपेक्षाभंगाना दुःख म्हणून त्यात आयुष्यभर घुटमळण्याची सवय असते. दुःख कुरवाळत बसल्यामुळे वर्तमानात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आनंद आपणही घेऊ शकत नाही आणि इतरांनाही घेऊ देत नाही. पर्यायाने आपणच दुसऱ्याना अप्रत्यक्षपणे दुःख देतो नकारात्मकता पसरवतो .अशा व्यक्तींना कालांतराने इतर मंडळी टाळू लागतात .त्यांच्या दुःखाच्या उलट-सुलट चर्चा करतात .यामुळे त्या व्यक्तींचे काम देखील प्रभावित होऊन त्यात त्यान्चा दर्जा खालावतो .

मित्रहो ,सृष्टीचा नियमच आहे की जे तुम्ही दुसऱ्याला किंवा निसर्गाला द्याल ते सर्व दुप्पट होऊन तुम्हाला निसर्ग परत देतो .मग आपण कायम दुःखात घुटमळत राहिल्याने इतरांना व स्वतःला आहे नकारात्मकता आणि दुःख देतो तर ते दुःख ,ती नकारात्मकता पुन्हा वाढवून आपल्याकडे परत येते. यापेक्षा या दुःखाचा स्वीकार करून जर दुसऱ्यांना थोडा आनंद, सकारात्मकता देऊ शकलो तर हाच आनंद पुन्हा आपल्याकडे परत येईल. मग तेच तेच दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा आपण कोणाच्या तरी जगण्याचे कारण होऊ शकलो तर …..

मित्रहो ,माणसाला जन्म आई-वडील देतात पण आपण आयुष्यात जो संघर्ष भोगतो ,दुःख सहन करतो त्यातून बाहेर येण्यासाठी जी व्यक्ती मदत करते ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते .आपण कोणासाठी तरी जगण्याचे कारण बनलो तर आपले हे दुःख कमी होईल .सोबतच कोणाच्या जगण्यासाठी कारण बनल्याचे समाधान व आनंद जीवन जगण्याची नवीन ऊर्जा देऊन जातील .आज आपल्या बाजूला असे कोणीच नसेल त्याला काही समस्या, दुःख नाही पण ते दुःखच बघत राहिलो तर जगणे मुश्कील नाही का ???मग आपण काय करू शकतो यावर ???

आपले मन वेगवेगळ्या कलागुण,छंद यात रमावता येईल.ज्यात क्रिएटिविटी म्हणजे सृजनात्मकता निर्माण होऊन नवनिर्मितीचा आनंद मिळेल. आजूबाजूला किती क्षेत्र असे आहे जिथे आपण काम करू शकतो उदाहरणार्थ.. अनाथ मुलांना शिकवणे, गरजू व्यक्तींना स्वावलंबन शिकवणे ,निसर्गाची निगा राखणे, नवीन पिढीला संस्कारक्षम बनवणे इत्यादी. अजूनही खूप क्षेत्रांमध्ये आपण काम करू शकतो.

शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, संशोधन क्षेत्र, सेवा क्षेत्र ,अशा कितीतरी अनेक क्षेत्रांमध्ये आपण योगदान देऊन कोणाच्या तरी जगण्याचे कारण बनू शकतो. कुणाच्यातरी आयुष्याला उपयोगी पडू शकतो. प्रत्येक गोष्ट पैशात न मोजता काही गोष्टी जीवनात आनंद व समाधानासाठी केल्या पाहिजेत. मंडळी असे केल्यास नक्की नवीन ऊर्जा आणि जगण्याचा उत्साह आपल्याला प्राप्त होईल यात शंका नाही .काय म्हणताय !! नक्कीच करून पहा आणि आम्हाला जरूर सांगा तुमचा अनुभव काय होता!!!

धन्यवाद !!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!