इतर कोणीही नसताना त्यावेळी तुमच्यासाठी जे कोणी होते त्यांना कधीही विसरू नका.
टीम आपलं मानसशास्त्र
माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसाला कायम कोणाची ना कोणाची साथ , सोबत , मदत , आधार पाहिजे असतो. माणसाला आपले माणूस कायम साथ देण्यासाठी लागते. व्यक्ती या संवाद साधून , बोलून , भावना व्यक्त करून , कधी रडून , तर कधी आपल्या व्यक्तीचा आधाराचा खांदा मिळवून , कधी सल्ला मसलत करून, कधी guidance घेवुन तर मधी मनात साठलेले भरभरून मोकळे पणाने बोलून रिकामे होत असता.
आपल्या गरजेच्या वेळी इतर कोणी ही नसताना जी व्यक्ती , वस्तू , किंवा निरागस प्राणी ही जरी बोलता येत नसेल तरी त्याच्या स्पर्शातून , जवळ येवून , चाटून , डोळ्यात बघण्यातून , सोबत असण्यातून खूप साथ देत असतात.
इतर कोणीही नसताना त्यावेळी तुमच्यासाठी जे कोणी होते त्यांना कधीही विसरू नका.
इथे आपण व्यक्ती विषयी बोलुयात. बरेचवेळा आपण एकटे असतो. काही तरी अडचणी येत असतात. कोणतेच मार्ग सापडत नाहीत. कठीण प्रसंग असे येतात की आपण ते आपल्या घरच्यांच्या सोबत बोलूही शकत नाही. अशावेळी तुम्हाला इतर कोणाची साथ , सोबत नसताना , नशीब आणि वास्तव यांच्यात खूप मोठा सामना करत असता. तेव्हा त्या क्षणी एखादा आधाराचा हात , आपलेपणाची साथ, समजून घेणारी व्यक्ती कायम सोबत असते. आणि मी सोबत आहे हा आधार जरी दिला. हेही क्षण जातील ..हेही दिवस जातील असे नकारात्मकता सोडून सकारात्मक विचारांच्या दिशेला घेवून जात असते. आणि मी केले , माझ्यामुळे तू नॉर्मल झाला, त्यातून बाहेर पडला याची कुठेही परत जाणीव ही करून देत नाही. अशा व्यक्तीला कधीही विसरू नये. कारण तिने केवळ तुमच्या करिता सगळे सोडून साथ दिली असते. कधी प्रेमापोटी असेल तर कधी माणुसकी म्हणून असेल तर कधी आपलेपणाने , आपुलकीने केले असते. त्यामुळे त्या व्यक्तीची परतफेड करणे जरी शक्य नसेल तरी त्या व्यक्तीचा कधीच विसर पडू देवू नका.
इतर कोणीही नसताना त्यावेळी तुमच्यासाठी जे कोणी नसताना जे कोणी सोबत असते. तुमच्या करिता कायम उपलब्ध असते. ती व्यक्ती कधी आपण खचून गेलो तर आपल्याला धीर देत असते. तर कधी अपयश आले तर खचून गेलो असतो तेव्हा प्रचंड निराशा आलेली असते. मानसिक त्रास होत असतो. मनातल्या भावना , दुःख , अपयश , स्ट्रगल , स्ट्रेस , आज असे का घडले हे प्रश्न , त्यासोबत उद्याची चिंता यातून पूर्ण खचून गेलो असतो. निराश झाले असतो. अशा वेळी इतर कोणी ही नसताना जी व्यक्ती त्या प्रसंगी आपल्या सोबत असते. तिच्या समोर आपण आपल्या मनातले सारे दुःख , त्रास , यातना , संकटे , अडचणी मोकळेपणाने आणि भरभरून बोलतो, प्राणही रडतो. आपल्या च बाबत का असे घडले याचे अनावर दुःख होवून कधी हंबरडा फोडतो तर मोकळेपणे रडतो. ओरडतो.
अशा प्रसंगी समोर असणारी व्यक्ती केवळ सोबत आहे. ती शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता ही सोबत असली तरी तो मोठा आधार वाटतो. कारण त्या क्षणी आपले ऐकून घेणारे कोणी तरी पाहिजे असते. त्यांक्षनी त्यांचे तत्त्वज्ञान नको असते. त्यांचे अनुभव नको असतात. तर आपल्याला मोकळे व्हायचे असते. अशा प्रसंगी जे शांतपणे आणि तटस्थपणे तुमची साथ देतात. तुमचे ऐकून घेतात. तुम्हाला मोकळे होवू देतात. आणि हे क्षण ही जातील याची खात्री देतात. आयुष्यात सुख , दुःख temporary आहे याची जाणीव करून देतात. आपल्याला विविध मार्ग दाखवतात.
याशिवाय तेच तेच विषय डोक्यातून काढून टाकण्यासाठी कधी इतर विषयांवर गप्पा , गोष्टी, कधी हलके फुलके विनोद , तर कधी कुठे बाहेर घेवून जातात, , कधी मस्त खाणे पिणे , बाहेर ट्रीप , विविध खेळ यातून त्याच त्या विषयातून बदल होतो. मन निराशेतून उत्साही होते. आनंदी होते. काही तरी नावीन्य येते.
मनावर आघात झाला तर मनाने हळवी असो अथवा खूप strong व्यक्ती मनाने कोलमडून जाते अशावेळी जवळच्या व्यक्तीने धीर दिला तरच ती परत सावरू शकते.
इतर कोणीही नसताना त्यावेळी तुमच्यासाठी जे कोणी होते त्यांना कधीही विसरू नका. याचे कारण त्या व्यक्तीने त्या क्षणी तिच्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला प्राधान्य दिले असते. तुम्हाला तिने तेवढा भरपूर वेळ दिला असतो. प्रसंगी स्वतः ची महत्वाची कामे सोडून ती तुमच्या सोबत असते. आणि तुम्हाला आलेल्या निराशा , नकारात्मक विचार , इच्छा , प्रसंग , संमस्या या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले असतात. तिची स्वतची positive energy लावलेली असते. स्वतः जे अनुभव घेतले असतात, त्याची जोड तुम्हाला सावरताना मदत करत असते. प्रसंगी पुढे मागे न बघता पैसा ही खर्च केला असतो. आणि त्या क्षणी ती व्यक्ती केवळ तुमच्या करिता उपलब्ध असते. तिचा अमूल्य वेळ , मग दिवस असो की रात्र ती कधी ही केवळ तुमच्या करिता उपलब्ध असते. ती वेळ देत असते. भेटण्यासाठी स्वतः खर्च करून धडपडत येत असते.
खरे तर व्यक्ती आणि तिचा वेळ सोबत, आधार असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या दृष्टीने तुम्ही अत्यंतिक महत्वाचे आहात असेच होते. याशिवाय त्यावेळी तुम्हाला गरज असताना ती व्यक्ती साथ देताना कधीच इतरांचा विचार करत नाही. कोण काय म्हणेल , कोणाला काय वाटेल असल्या फालतू विचारात अडकून ही न पडता कृती ने साथ सोबत देत असते. आणि सगळ्यात तुम्हाला कुठेच एकटीला , अर्ध्या वाटेत सोडत नाही. तुम्हाला सगळ्यातून बाहेर पडेपर्यंत ती व्यक्ती साथ देते.
आणि तुम्ही सावरला .किंवा अगदी असेही होवू शकते की समस्या काही नाही पण सोबत कोणी नाही अशावेळी त्या व्यक्तीची सोबत ही लाख मोलाची ठरते.
भयानक अंधार आहे. रात्र म्हणजे तसा प्रवास ही भीतीदायक च. त्यात निर्जन रस्त्यावर गाडी बंद पडते. आणि अशावेळी भीतीने थरकाप उडतो. गाडीतून खाली उतरायचे तर जंगली प्राणी असतील, अंधार असेल किंवा कोणी चोर , लुटारू काही करतील या भीतीने आपण गाडीतून उतरायचे धाडस ही करत नाही. त्यात अशी एक व्यक्ती मदतीला धावून येते , जी तिच्याविषयी तुम्हाला खात्री पटवून देते आधी. तिचा मोठा आधार वाटतो प्रसंगी . जी तुमची गाडी सुरू करून देते. तिला तुम्ही त्याक्षणी च काय तर पूर्ण आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. आणि त्यात तुम्ही जर काही पैसे , वस्तू तिला आपलेपणाने भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला आणि तिने ते घेण्यास नकार दिला असेल. त्यात काय मदत करणे ही माझी आवड आहे असे म्हणून न कुरकुर करता , न लाजता लागेल ती मदत करून गाडी सुरू करून सुखरूप जा. असे सांगितले तर आयुष्यभर ती व्यक्ती आपल्या लक्षात राहील. आणि राहिलीच पाहिजे कारण प्रसंगी तिने आपल्याला केलेली निस्वार्थी मदत याचे आपण कायम ऋणी राहतो.
स्नेहल आणि तिची आई बस ने प्रवास करत होते.. सांगली ते पुणे आणि पुणे ते शिर्डी असा प्रवास होता. वडिलांची नुकतीच heart surgery झालेली होती. वडील आणि भाऊ घरी होते. दोन दिवसात केवळ देवदर्शन घेवून परत यायचे असे ठरले होते.
सांगली सोडून बस फक्त वीस किलोमीटर गेली आणि एका ट्रक ने जोरदार धडक दिली. आश्चर्य म्हणजे बाकी कोणत्याही पॅसेंजर ना काही ही लागले नाही. मात्र स्नेहलच्या आईला मात्र काच फुटून ती डोक्यात घुसली. जोरदार मार बसला. रक्त बंबाळ झाली होती तेवढ्यात बस मधली एक तरुणी पुढे आली मी डॉक्टर आहे सगळ्यांनी बाजूला व्हा असे म्हणून तिने अगदी हळुवारपणे सनेहलच्या आईच्या डोक्यात घुसलेली काच काढली
. डॉक्टरने तिच्या ड्रेस ची ओढणी काढून तिने भरदिशी स्नेहालच्या आईच्या डोक्याला बांधली .डोके गच्च धरून ठेवले. खाली उतरवून लगेच परत सांगलीच्या दिशेने जाणारी गाडी थांबविली स्वतः त्यात त्यांच्या सोबत बसली. सांगलीत हॉस्पिटल मध्ये घेवून गेली.योग्य ते औषधोपचार करेपर्यंत थांबली. नंतर काळजी चे कारण नाही आता निघते असे म्हणून ती निघाली तेव्हा स्नेहल ने त्या डॉक्टरीण बाईंचा नंबर घेतला. त्यांचा पत्ता घेतला. त्यांचे आभार मानले. पैसे आणि ओढणी विषयी म्हणले तर माझी आई असती तर मी केलेच असते ना. असे म्हणून काही नको म्हणून निघाली. पण त्यानंतर स्नेहल आणि तिची आई या डॉक्टरीण बाईना कधी ही विसरल्या नाहीत. विसरू शकत ही नव्हत्या. त्या अपघातात त्यांनी केलेली तत्पर तेची मदत. स्वतच्या प्रवासाची फिकीर न करता. अनोळखी असून ही डॉक्टर असल्याचे कर्तव्य आणि माणुसकी ..दाखवून शेवटपर्यंत थांबून आधार दिला आणि आता जीवाला कोणता धोका नाही याची खात्री पटल्यावर त्या निघाल्या होत्या. एव्हढा मोठा आधार दिला होता त्यांनी त्या प्रसंगात.
पुढे प्रत्येक सण वार, कार्यक्रम या सगळ्यात या डॉक्टरीण बाईना स्नेहल आणि तिच्या आईकडून आमंत्रण असे. आणि यांच्यामुळे जीवनदान मिळाले हे आवर्जून स्नेहलची आई सगळ्यांना सांगत असे.
इतर कोणीही नसताना त्यावेळी तुमच्यासाठी जे कोणी होते त्यांना कधीही विसरू नका. कधी आपल्या लोकांनी तर कधी परक्या लोकांनी दिलेली ही साथ आपुलकीने , प्रेमाने , आपलेपणाने दिलेली असते. मदत असते त्यांची. तर त्यांचे समाजाप्रती ते कर्तव्य करत असतात. पण तेही निस्वार्थीपणे.
आयुष्य सुंदर आहे. वेळोवेळी जे लोक , ज्यांनी आपल्याला साथ दिली , सावरले , आधार दिला, त्या प्रसंगातून बाहेर पडताना सोबत केली , ते वाईट , चांगल्या प्रसांगाचे साक्षीदार आहेत. ज्यांना त्याचा कोणताही मोबदला नको. आणि याउलट मी केले. माझ्यामुळे झाले चांगले असेही कुठे मोठेपणा न दाखवणारी जी व्यक्ती , ज्या व्यक्ती असतील त्या केवळ आपल्या करिता , आपल्यावरच्या प्रेम , आपलेपणा असतो म्हणून या गोष्टी करतात. त्यांना आयुष्यात कधी विसरू ही नका आणि अंतर ही देवू नका.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

