Skip to content

इतकं हळवं होऊन जगू नका की समोरचा काळीज पोखरत राहील.

इतकं हळवं होऊन जगू नका की समोरचा काळीज पोखरत राहील.


मेराज बागवान


काही माणसं खूप हळवी असतात.म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागते.ते खूप भावनिक असतात.भावनांना ते सर्वात जास्त महत्व देतात.इतरांच्या बाबतीत इतकी काळजी घेतात की स्वतःकडे देखील दुर्लक्ष करतात.स्वतःचा स्वाभिमान देखील बाजूला ठेवतात. का तर ती हळवी असतात आणि त्यांना कोणाला दुखावता येत नाही.ह्या लेखात आपण अशाच व्यक्तींविषयी बोलणार आहोत.

हळवी व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करते.आपल्यामुळे कोणी दुखावले तर गेले नाही ना याची काळजी त्यांना सतत वाटत असते.ते खूप भावनिकरीत्या विचार करीत असतात.आणि व्यावहारिक बाजू विचारातच घेत नाही.हा त्यांचा स्वभाव असतो.पण त्यांना भेटणारी व्यक्ती पात्र असेलच असे नाही.

काही जण त्यांना समजून घेणारे देखील असतील.पण ते केवळ १-२ टक्के.बाकी ९८ टक्के लोक तर असेच असतात जे हळव्या लोकांनाच जितका त्रास देता येईल तितका देतात.त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात.म्हणूनच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे , इतकं हळवं होऊन जगू नका की समोरचा काळीज पोखरत राहील.

जी हळवी व्यक्ती असते ती सतत इतरांसाठी काही ना काही करीत असते.मदत करीत असते.आणि आणखीन बऱ्याच गोष्टी. पण अनेकदा समोरची व्यक्ती हळूहळू हळव्या व्यक्तीला गृहीत धरू लागते.”माझ्यासाठी करीत आहे ना,मग कर,अजून कर” असा दृष्टिकोन अनेकांचा हळव्या लोकांच्या बाबतीत असतो.ते त्यांना ‘थँक्स’ सुद्धा कधी म्हणत नाहीत.

कारण नाही म्हटले तरी हळवी व्यक्ती त्या व्यक्तीला समजून घेत असते.आणि त्यामुळेच गृहीत धरणे वाढू लागते आणि हळव्या व्यक्तीची किंमत इतरांसाठी जणू काही शून्यच होऊन बसते.म्हणूच इतके हळवे होऊन जगू नका की समोरचा तुमची काडीची किंमत ठेवणार नाही.

प्रेम माणसाला निडर बनवते, एक प्रकारची मानसिक ताकद देते.पण कधी कधी प्रेम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबाबत इतकी हळवी असते की तिला फक्त ती व्यक्तीच दिसत असते.आणि स्वतःचे अस्तित्वच ती संपवून टाकत असते.नुकताच ‘वेड’ सिनेमा येऊन गेला.त्यात ‘जेनेलिया’ ची अशीच काहीशी भूमिका दाखविली आहे.ज्यामध्ये ती प्रेमाखातर आपल्या नवऱ्याच्या सर्व चुका पोटात घेत असते.

आणि नवरा मात्र तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असतो.जेव्हा तिला तिची स्वतःची जाणीव होते तेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात.मात्र येथे उशिरा का होईना तिच्या नवऱ्याला तिची किंमत कळते आणि त्यांचा संसार शेवटी सुखी होतो.पण हे झालं सिनेमातील.वास्तव खूप भीषण असते.जी व्यक्ती इतरांसाठी विनाअपेक्षा खूप काही करते ती व्यक्ती शेवटी एकटी च राहते.

म्हणूनच तुम्ही जर का हळवे असाल तर कृपया वेळीच स्वतःला सावरा.आजचे युग कलयुग आहे.विश्वासू व्यक्ती भेटणं महाकठीण काम आहे आजच्या जमान्यात.आपलेच जिथे धोका देतात तिथे इतरांचा काय भरोसा? त्यामुळे आज समजत नाही की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही.

पण याचा अर्थ असाही नाही की विश्वासच ठेवायचा नाही.विश्वास ठेवा पण हळवेपणा थोडा बाजूला सारून.डोळे उघडे ठेवून.कारण तुमचा हेतू जरी पारदर्शक असेल तरी समोरचा तस असतोच असे नाही.त्यामुळे स्वाभिमानाने जगा. स्वतःची किंमत स्वतःच जपा. लोक काय तुमची किंमत कमी करायलाच बसले आहेत.

स्वतःचे मानसिक आरोग्य जपायचे असेल तर इतकं ही हळवे होऊन जगू नका की कोणीतरी तुम्हाला जखमांवर जखम देत राहील.इतकं ही हळवे होऊन जगू नका की समोरचा तुमचं अस्तित्वच नाकारेल.आपण स्वतःच समोरच्याला दाखवत असतो की त्याने आपल्याशी कसे वागले पाहिजे.त्यामुळे तुम्ही असे वागा की समोरची व्यक्ती तुमच्याशी मनानेच वागली बोलली पाहिजे.

आजचे जग भयंकर आहे.खोटेपणा,अहंकार,नकारात्मता ठासून भरलेला आहे.पण ह्या सगळ्यात आपल्याला तग धरून उभे राहायचे आहे.Give Up तर कधीच नाही करायचे.त्यामुळे हळवे जरी तुम्ही असाल तरी काही हरकत नाही .पण Tit For Tat तुम्हाला जमले पाहिजे नाहीतर हे जग तुमचा कचरा करून सोडल्याशिवाय राहणार नाही.आजचे जगात चांगुलपणापेक्षा खोटेपणाच जास्त टिकत आहे.त्यामुळे थोडं स्वतःला सावरा.

हळव्या मनांनो घाबरू नका पण स्वतःची थोडी काळजी घ्या!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

15 thoughts on “इतकं हळवं होऊन जगू नका की समोरचा काळीज पोखरत राहील.”

  1. Hoy barobar ahe pan kas ahe pratekachya tatat vegl vadlel ahe( niytine) chota aso va moda बिझने s karnarya navrya mandlina khup samjun gyave lagte kadhitari nahi tar har roj tech tech pun punha tech pan ky karnar byka( bicharya) nahi tya khup samjha astat etranchya bykan peksh
    Kas hot बिझने s chya tetion madhe te bykoch boln manje kat kat vatu lagte ani tyanchyat khup kahi gostin mule durava yeto durava etka ki to vyakti visrto ki mla hi byko ahe
    Kahi velela as si hot ki to vyakti etar ledies barobar chan bolto fakt boln nahi tar sarv kahiiiiiii
    Pan shevti ky tya bai la halve panan mule sarv sahan karave lagte

  2. हा लेख वाचून आनंद व्यक्त आहे असेच चांगले लेख पाठवा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!