Skip to content

‘बायकोशी गोड बोलून हवं ते मिळवता येतं’, हा उद्देश चुकीचा आहे.

‘बायकोशी गोड बोलून हवं ते मिळवता येतं’, हा उद्देश चुकीचा आहे.


टीम आपलं मानसशास्त्र


विवाहरूपी संसाराला एकदा का सुरुवात झाली कि एकमेकांना सांभाळता-सांभाळता अनेक समजुतीच्या पायऱ्या चढाव्या लागतात. समजून घेणारे दोन्ही मन असल्यास ह्या पायऱ्या सहज पार केल्या जातात. पुष्कळ वेळेस समजून घेण्याच्या या भावना एकाच्या मंद तर दुसऱ्याच्या खूपच तीक्ष्ण असतात.

अशावेळेस एकमेकांना साथ देता-देता संसाराला अनेक समस्या भेडसावत जातात. काही ठिकाणी तर कृत्रिमरीत्या वागणूक ठेऊन एकमेकांना हाताळण्याची प्रक्रिया सुरु होते. यामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे गोड बोलणे.

संशोधनानुसार यामध्ये महिलांसोबतच पुरुषही आजकाल प्रचंड प्रमाणात हि भावना वापरताना दिसतात. एरव्ही धकाधकीच्या जीवनात कुठेतरी दुर्लक्षित झालेली पत्नी हाताबाहेर जाऊ नये किंवा तिच्या प्रति आपली किंमत अबाधित राहो, यासाठी हि बाब प्रकर्षाने जाणीवपूर्वक वापरली जाते.

यामध्ये मुख्यत्वे खालील बाबींची पूर्तता व्हावी म्हणून हि भावना सर्रास वापरली जाते.

१) बायकोचा राग दूर होण्यासाठी.

पुरुषांच्या हाती एखादी चूक घडली असल्यास आणि त्याची माहिती बायकोला कळल्यास तिच्याशी गोड बोलून मन शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. तिचं मन दुसरीकडे वळविण्यासाठी तिच्याशी सोबत अतिशय नम्रपणा वापरला जातो.

२) तिच्याकडून अपेक्षा पूर्ण होण्यासाठी.

बायकोकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी तिच्याशी जाणीवपूर्वक गोड बोलण्याचा कार्यक्रम आखला जातो. मनात ठेवलेली अपेक्षा जर रास्त असेल तर काही प्रसंगी ते योग्य सुद्धा समजले जाते. परंतु अवास्तव अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून हि कल्पना पुढे केली जाते.

३) खोटं लपविण्यासाठी.

एखादं खोटं लपविण्यासाठी सर्रास गोड बोलण्याचा मार्ग अवलंबला जातो. आणि हि गोष्ट अगदी दोघांकडूनही घडून येते. अशा रीतीने खोटं लपविण्यासाठी जर हि गोष्ट वापरली जात असेल तर दोघांच्याही आयुष्यात पुढे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

४) शारीरिक सुखासाठी.

शारीरिक सुख मिळविण्याआधी त्याची सुरुवातच गोडव्याने होते. परंतु दोघांमधले संबंध विस्कटलेले असताना केवळ शारीरिक सुख मिळावे म्हणून तात्पुरते गोड बोलून समोरच्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जातो, जे कि खूपच चुकीचे आहे.

५) सामाजिक ठिकाणी वावरताना.

दोघांचे घरातले संबंध उध्वस्त झालेले असताना केवळ इतरांना कळू नये म्हणून अशा पद्धतीची वागणूक एकमेकांना दिली जाते. तसेच घरी कोणी पाहुणे जरी आले तरी अशी वागणूक ठेऊन-ठेऊन दोघांनाही पार कंटाळा आलेला असतो.

६) पैशाचे व्यवहार लपविण्यासाठी.

अनेकदा पैशाचे व्यवहार कळू नये म्हणून बायकोच्या आवडत्या गोष्टींना तात्काळ प्राधान्य दिले जाते. जेणेकरून बायको पैशाचे व्यवहार संबंधित मनात असलेले प्रश्न विचारणार नाही. खरंतर अशावेळी पारदर्शकपणे वागणूक ठेवल्यास अशी कसरत करण्याची वेळच येणार नाही.

७) व्यसन कळू नये म्हणून.

कित्येक जोडपी आजही नकळत याबाबत प्रचंड गुप्तता बाळगून असतात. ती गुप्तता ठेवण्यासाठीच गोड बोलून विषय टाळण्याची चलाखी ते बाळगून असतात. याबाबत पुरुषांना विचारले, कि तुम्ही पत्नीला सांगून व्यसन करता का? याबात बहुतेक पुरुषांनी या प्रश्नालाच क्षुल्लक मानले.

परंतु नंतर हाच प्रश्न उलट फिरवून विचारला, कि तुमच्या बायकोने तुम्हाला न सांगता व्यसन केले तर ? या प्रश्नाबाबत मात्र त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. हा एक मुद्दा लक्षात ठेऊन जशा आणखीन काही बाबी आहेत, ज्याबद्दल पुरुष उत्तर देऊ शकत नाहीत.

अगदी त्याचप्रमाणे बहुसंख्य प्रश्न असेही आहेत ज्याबद्दल स्त्रिया सुद्धा उत्तरे देऊ शकत नाहीत. म्हणून गोड बोलून अयोग्य हेतू साध्य करून घेण्यापेक्षा आपल्याला अशा परिस्थिती गोड बोलण्याची वेळ का आली असावी. याबद्दल संबंधित जोडप्यांनी नक्की विचार करण्याची वेळ आहे.

गोड बोलण्यापेक्षा समोरच्याचीही परिस्थिती लक्षात घेऊन खरं बोलणे केव्हाही उत्तमच असेल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!