Skip to content

दुःख जर डोक्यात माजलं असेल तर त्याला वेळेतच काबू करायला जमलं पाहिजे.

दुःख जर डोक्यात माजलं असेल तर त्याला वेळेतच काबू करायला जमलं पाहिजे.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


समृध्दी आणि पूजा एकाच वर्गात शिकत होत्या. त्यांचं हे पदव्युत्तर वर्ष चालू होत व यावर्षी त्यांनी set परीक्षा द्यायचा विचार केला होता. त्यानुसार नोट्स काढणं, अभ्यास करणं हे चालू होत. परीक्षेच्या आधीपर्यंत त्यांनी चांगला अभ्यास केला.

परीक्षेचा दिवस आला. दोघांचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला होता. त्याप्रमाणे त्या पेपर देण्यासाठी गेल्या. पेपर सोडवून आल्यानंतर त्यांनी त्यावर चर्चा केली. काही प्रश्न त्यांना अवघड गेले होते. तसच असे बरेच मुद्दे होते ज्याचा त्यांनी अभ्यास केला नव्हता. तरीही त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आता त्या निकालाची वाट पाहू लागल्या. काही दिवसांनी निकाल आला. अगदी काही मार्कांनी दोघांचाही स्कोर कमी झाला होता व त्या परीक्षा पास होऊ शकल्या नाहीत.

दोघींनाही दुःख झालं होतं. कारण मेहनत तर त्यांनी घेतलीच होती. पण आता होऊन गेलेले बदलू शकत नव्हतं. समृद्धी रडू लागली. “आपण इतकं मन लावून अभ्यास केलात तरीही पास होऊ शकलो नाही.” असं ती म्हणत होती. यावर पूजा तिला समजावू लागली. “समृद्धी जरी आपण अभ्यास केला तरी बर्‍याच गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नव्हती.

पेपरच स्ट्रक्चर आपल्याला नवीन होतं. दुःख मलाही होत आहे. पण अग ही परीक्षाच अशी आहे की यात पहिल्याच प्रयत्नात तसं पास होता येत नाही. अजून प्रयत्न करावे लागतात. उलट यातून आपल्याला समजलं तरी की आपल्या काय चुका झाल्या. आपण त्या सुधारून पुन्हा एक प्रयत्न करू. आपल्याकडे संधी आहे.”

परंतु समृद्धी ऐकून घेत नव्हती. पु”न्हा प्रयत्न करून असं झालं तर! आता पाहिलस ना काय झालं ते!” पूजाने तिला खूप समजावलं पण तिने ऐकले नाही. पुन्हा जेव्हा परीक्षेची नोटीस आली तेव्हा पूजाने फॉर्म भरला व परत नव्याने अभ्यास करून, आपल्या जुन्या पद्धती बदलून तिने परीक्षा दिली व ती पास देखील झाली. समृद्धी मात्र पहिल्या अपयशाच्या दुःखात इतकी राहिली की तिला परत यात संधी आहे, आपण प्रयत्न केले पाहिजेत हेच लक्षात आलं नाही.

आपल्या आयुष्यात सुख असतं तसे दुःखही असते. यश-अपयश आयुष्याचा भाग आहे. पण या कोणत्या गोष्टी आयुष्यात कायम स्वरूपी टिकून राहत नाहीत. सारख्या बदलत राहतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे दुःख झाले तरी त्याला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. आयुष्य प्रत्येकाला रोज नवीन संधी देत असत. फक्त आपल्याला ते स्वतःला देता आली पाहिजे.

एकाच गोष्टीच्या दुःखात जर आपण सतत अडकून बसलो तर आपण येणाऱ्या चांगल्या गोष्टींच्या वाटा बंद करून टाकतो. कारण या दुःखातून जे नकारात्मक विचार निर्माण होतात ते आपले पुढची विचारशक्ती, काहीतरी करण्याची कुवत कमी करतात आणि म्हणून यातून बाहेर पडल पाहिजे.

Because, Pain is temporary
It may last a minute, or an hour
Or a day, or a year but eventually it will subside and something else will takes its place
If I quit, however it lasts forever

असं कधीच होत नाही की आपण कशातून बाहेर पडलो नाही. आधी ज्या गोष्टींची अडचण होती, दुःख होतं त्यातून आपण कसा मार्ग काढला ते आठवा. स्वतःच्या क्षमता ओळखा. परत एकदा नव्याने प्रयत्न करा. अशा प्रकारे स्वतःच्या दुःखावर काबू मिळवून एक नवीन सुरुवात करा. यश मिळेलच का? दुःख कमी होईलच का? याचे उत्तर कोणाकडे नाही.

पण ते मिळवण्यासाठी ते दुःख कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो की नाही? तर हो! नक्कीच करू शकतो. मोठ्या व्यक्तींची उदाहरणे पाहिली तर लक्षात येईल की त्यांना लगेच यश मिळालं नव्हतं. त्यांनाही दुःखाचा सामना करावा लागला. पण तरी त्यांनी हार न मानता त्यातून मार्ग काढला व यश मिळवलं. एडिसन म्हणतो,

“I have not failed, I’ve just found 10,000 ways that won’t work …

दुःखात अडकून राहू नका. त्यातून शिकून, मार्ग काढून पुढे जा. यशाच्या दिशेने केलेली पहिली वाटचाल असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “दुःख जर डोक्यात माजलं असेल तर त्याला वेळेतच काबू करायला जमलं पाहिजे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!