Skip to content

मनातला उदासीपणा कमी करण्यासाठी जवळची माणसं अत्यंत गरजेची आहेत.

मनातला उदासीपणा कमी करण्यासाठी जवळची माणसं अत्यंत गरजेची आहेत.


मयुरी महेंद्र महाजन


आजच्या घडीला जर सर्वात महत्त्वपूर्ण काही असेलं, तर ते म्हणजे आपल्या मनातील दुःख निसंकोचपणे ज्या व्यक्तींकडे सांगावसं वाटतं अशी माणसं कमावणं, आणि मिळवून टिकवून ठेवणं, कारण की मला बऱ्याच जणांकडून असे ऐकायला मिळते की आजकाल आजार खूप वाढले आहेत, पहिल्यासारखे आता शेतीतसुद्धा पिकवलं जात नाही, सर्वच हायब्रीड आणि जंग फूडचा जमाना झालेला आहे, परंतु हे संशोधन शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने बरोबर असले तरी मानसिक आरोग्याचे ठिकाणी झालेले बदलही पडताळून पाहण्यासारखे आहेत…

ज्यावेळेस मन भरून आलेलं असतं ,एखादी गोष्ट मनात सलते, रूचते, टुचते, त्यावेळेस ते मोकळे होणे अत्यंत गरजेचे आहे, आणि मनात साचलेलं सर्वचं जे जे आपण इतरांना काय वाटेलं, म्हणून बोललेलो नसतो, ते सर्वच कुठेतरी व्यक्त होणे महत्त्वाचे आहे, कारण कितीही म्हटलं तरी आपण माणसं आहोत, आपला जन्मचं भावभावनांच्या मिश्रणाचा एक साचा आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या भावना व्यक्त व्हायला एखादं ठिकाण आयुष्यात नक्की असावं, त्यामुळे आपला एक फायदा असतो, मनात सलत असलेल्या गोष्टींचे दडपण, भीती नाहीशी होते, आणि मनात ऊद्भवणार्‍या उदासीपणाला जागीचं आळा बसतो, यासाठी जवळची माणसं अत्यंत गरजेची आहे,

आपण कितीही नाही म्हटलं तरी आयुष्यात एखादा प्रसंग एखादी घटना अशी असतेचं, त्यामुळे आपल्याला ऊदासीपणा जाणवतो, सर्वच बरे वाइट प्रसंगांमध्ये आलेली उदासीनता कमी करण्यासाठी आपल्याला आपली जवळची माणसं खूप गरजेची आहेत, कारण की जी भांडतात, रुसतात, वेळप्रसंगी साथ देतात, आधार देतात ,तीच आपली माणस असतात, जीवनाच्या बरे वाईट प्रसंगात साथ देतात, हात देतात, मात करतात, तीच असतात आपली माणसं, जी प्रत्येक परिस्थितीत भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी असतात, ती असतात आपली माणसं,

जेव्हा आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती ,काही ठिकाणी आजही आहे, त्या वेळेस मोठमोठी संकटे सुद्धा सहज पार व्हायची, कारण एकमेकांना सुखदुःखात साथ देणारी आणि भावनिक आधार देणारी माणसे होती ,आजही आहेत ,परंतू घरं तर खूप मोठी झाली ,पण घरातील माणसांची संख्या तितकीच कमी बघायला मिळते, जर खर्‍या अर्थाने आपण आयुष्यात काही कमावले असेलं, तर ते हेच की ज्या व्यक्तींकडे आपल्या मनातील सारे दुःख निसंकोच पणे सांगता येईलं अशी किती माणसं आपण खरंच कमावली ते तपासायला हवं ,

तसं तर मनाला उदास व्हायला काही कारण लागत नाही, ते तर छोट्या छोट्या गोष्टींनी ही उदास होऊ शकते, परंतु आपल्या आजूबाजूला जर आपली हक्काची माणसं असतीलं, ज्यांच्या कडे आपल्याला आपला आनंद आणि दुःख वाटायला आपल्याला विचार करावा लागत नाही, तर मनातील उदासीपणा सहज निघून जातो, त्यासाठी जवळची माणसे अत्यंत गरजेचे आहे,

आपल्या आयुष्यात आपल्या जवळच्या माणसाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, ते यासाठी की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या आयुष्यात कधी तरी भावनिक आधाराची इमोशनल सपोर्टची आणि आपल्या माणसांच्या आधाराची आवश्यकता भासतेचं, कोणी कितीही स्वतःला स्ट्रॉंग म्हणवत असेल, तरी आपल्या जवळच्या माणसांवाचून आपले आयुष्य समृद्ध होऊ होऊ शकत नाही, लहानपणी आई वडिलांचा हात धरून चालणारी मुलं जेव्हा खरे आयुष्यात आई बाप होतात, तेव्हा त्यांना आई बापाची माया लेकराच्या ठाई हवीचं असते, आईवडिलांसाठी आपली मुलं नेहमीच लहान असतात.

आपल्याकडे जर आपली जवळची माणसं असतीलं तर त्यांना जपा, काळजी घ्या, मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोला, त्यांना भेटा, या जगात अशी बरीच लोक आहेत, जी पोरकी झालेली आहेत ,त्यांना आपल्या माणसांची उणीव भासते, आपल्याकडे असणारा आपल्या माणसांचा ठेवा हीच आपली खरी ठेव आहे, त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजा की आपल्या आयुष्यात अजून आपल्या माणसांचा राबता आहे… जो आपल्याला आयुष्यातील कितीतरी गोष्टींपासून लढण्याचं बळ देतो…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!