Skip to content

ही आशा कायम धरून ठेवा, तुम्ही नैराश्यातून बाहेर पडू शकता!!

ही आशा कायम धरून ठेवा, तुम्ही नैराश्यातून बाहेर पडू शकता!!


मयुरी महेंद्र महाजन


सर्वात आधी आपण नैराश्यात आहोत, हे आपण स्वीकारायला हवे ,नंतर आपल्या या समस्येला कोणते घटक कारणीभूत आहेत, आणि हे सर्व असताना आपण आपल्या कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलेले आहे, व कोणत्या गोष्टी आपल्याकडून टाळल्या गेलेल्या आहे, याचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे,

आलेल्या प्रत्येक समस्येचा एक कालावधी असतो, त्यानंतर ती समस्या अस्तित्वात नसते, प्रत्येक समस्येला उत्तर असतेचं, फरक फक्त इतकाच असतो की ते उत्तर जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंतचं, कारण उद्भवलेली कुठलीही समस्या ही जाण्यासाठीचं आलेली असते, परंतु तोपर्यंत त्या समस्येशी झुंज देण्यासाठीचा आपला जो कस लागतो, त्या कालावधीत स्वतःला आपण आपली आशा (एक उम्मीद) कायम असू द्यायला हवी,

नैराश्य म्हटलं तर प्रत्येकाच्या जीवनात आपण निराशाजनक परिस्थितीतून कधी ना कधी गेलेलो असतोच, परंतु म्हणून काही ती समस्या तशीच राहिलीलेली नाही, सुटलीचं आणि नैराश्याने आपण ग्रस्त असलो, म्हणून काही ती फक्त आपलीच समस्या आहे ,अशातला भाग नाही, कारण फक्त नैराश्येची पातळी कमी अधिक असू शकते, इतकाच फरक आहे, परंतु नैराश्य कोणत्याही पातळीवर असू द्या, त्यातून आपण बाहेर पडू शकता ही आशा मात्र कायम धरुन ठेवा,

कारण जेव्हा आपण स्वतःला यातून बाहेर पडू शकतो ,हे सांगत असतो तेव्हा आपल्या त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठीचे मार्गही मिळत जातात, आणि मिळणाऱ्या मार्गाने आपण एक एक पाऊल पुढे जाऊ लागतो, आणि मग ती वाट सुद्धा कधीतरी संपतेचं जेथे आपली समस्या सुटून मागे पडलेली असते, म्हणून आपण आपली आशा कायम असू द्यावी,

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी आशा मनात धरून ठेवतो, तेव्हा ती गोष्ट भले होईल न होईलं, परंतु मनातील तीच आशा मात्र कायम आपल्याला ती गोष्ट होण्यासाठीचा एक प्लस पॉइंट असू शकतो, ज्या मार्गाने आपण एक दिवस नक्की आपली समस्या मागे सोडून पुन्हा नव्याने जगू शकतो,

नैराश्य याला डिप्रेशन म्हटलं जातं , नैराश्यात जगणारी व्यक्ती ही आपल्याच दुनियेत आपल्याचं जगात वावरताना दिसते, नैराश्य येण्याला खरंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारणे असलेली बघायला मिळतात ,परंतु जनरली विचार केला, तर त्याला काही घटक कारणीभूत ठरतात एक म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे, जर कोणी अत्यंत प्रिय व्यक्ती सोडून गेली असेल, तर सतत त्याच गोष्टीचा विचार येणे, स्वतःला एकलकोंडे करून ठेवणे, तसेच आयुष्यात एखादी दुःखदायक घटना घडली असेलं, तर त्या गोष्टीला आपणचं जबाबदार होतो, आणि त्याला आपण नाकारू शकत नाही ,ही स्वतःबद्दलची कमीपणाची भावना माणसाला आतल्याआत पोखरून टाकते ,

या पद्धतीने यामागे बरीच कारणं पण आहेत ,आणि खूप सार्‍या घटना पण आहेत ,परंतु या सर्वांमध्ये मला एक सांगायचे आहे, ते म्हणजे नैराश्य हे कुठल्याही कारणाने आलेले असो, परंतु त्यामुळे आपल्याला जगतांना अडचणी निर्माण व्हायला नको, कारण जेव्हा आपल्या दिवसाच्या रूटीनमध्ये जीवन जगायला अडचण होत असेलं, तर आपण कुठल्याच गोष्टीला परिपूर्ण रीतीने अनुभवू शकत नाही ,कशाचाही पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी जर आपण ही आशा कायम धरून ठेवली, तर आपण नैराश्येतून बाहेर पडू शकतो, हे हि तितकच खर आहे,

फक्त एक करायचं आतापर्यंत आपण आपल्या स्वतःला किती त्रास करून घेतलेला आहे ,आता यापुढे नाही, कारण जे व्हायचे होते, ते घडून गेलेले आहे, त्यात तुम्ही किंवा मी कोणीही काहीही करू शकत नाही, स्वतःला एक प्रश्न विचारावा, जितका त्रास आपण स्वतःला करून घेतलेला आहे, व करून घेतोय, खरंच आपण याचा त्रास करून घेणे बरोबर आहे का ????आपण माणूस आहोत, एखादी घटना प्रसंग दुःखाची असेल ,तर दुःख होणारचं, ज्यांना होत नाही ते अपवाद, पण म्हणून आपण त्या पॉइंटला कुरवाळत बसण्यात अर्थ नाही, एका ठराविक वेळेनंतर move on व्हायला आपण शिकायला हवे, तरच आपण उत्तमपणे जगू शकतो….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!