Skip to content

हेल्दी विचार आणि हेल्दी भावनांसाठी तुम्ही या गोष्टी करताय ना??

हेल्दी विचार आणि हेल्दी भावनांसाठी तुम्ही या गोष्टी करताय ना??


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


हेल्दी विचार आणि हेल्दी भावना. नाव ऐकून वेगळं वाटलं ना! म्हणजे आपण हेल्दी फूड ऐकतो, हेल्दी लाईफस्टाईल ऐकतो; विचार आणि भावनामध्येही आपण फार फार तर सकारात्मक, नकारामत्क हे अस वाचत असतो. ऐकत असतो. माणसाने कसं तर सकारात्मक राहील पाहिजे. नकारात्मक विचार केले नाही पाहिजेत. तश्या भावना व्यक्त केल्या नाही पाहिजेत. जसं की राग, द्वेष, मत्सर यासारख्या भावना मनात आणू नये. हे आपण सगळीकडे ऐकतो. याबद्दल बऱ्यापैकी आपल्याला माहीत पण असत. पण आरोग्यदायी विचार, भावना या बद्दल मात्र आपल्याला माहिती नाही. तर ते नेमक काय आणि ते तसे असावेत यासाठी आपण काही करत आहोत का हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं पहावी लागतील.

अजय आणि अनिल एकाच रूममध्ये राहत होते. एकाच कॉलेज मध्ये एडमिशन घेतलं होतं. दोघांचेही स्वभाव पूर्णपणे वेगळे होते. पण म्हणतात ना हर एक फ्रेंड कमिना होता है. त्याचप्रमाणे विचार जुळत नसले, मतं वेगळी असली तरी मैत्री मात्र होती. विचार का जुळत नव्हते? त्याच कारण अजयचा स्वभाव मनमौजी आणि उधळा होता. चेहऱ्यावर एक प्रकारची बेफिकिरी असायची. पैसे हातात कधी टिकत असे नसायचे. चांगले गुण नव्हते का? तर होते.

हसमुख स्वभाव होता, सर्वांना आपलं करून घ्यायचा सर्व मान्य. पण त्याच तत्व काय? तर हे आहे ते आता आहे. आताचा आनंद घ्या. पुढच कोणी पाहिलंय? कसलं टेन्शन नाही की त्रास नाही. याउलट अनिल होता. शिस्तप्रिय, जरासा धीरगंभीर आणि विचारी स्वभावाचा. कोणतीही गोष्ट विचार करून करावी. आता काय वाटत यातून पुढे यातून काय निष्पन्न होणारे हे पाहावं. त्यामुळे आपसूकच त्याच्यामध्ये काही गोष्टी बाबत चिंता करणे, बेचैन होणे. यासर्व गोष्टी व्हायच्या. परीक्षेचं त्याला टेन्शन यायचं. पैसे नेहमी जपून वापरायचा. या त्याच्या स्वभावामुळे त्याला अजय आजोबा म्हणायचा.

पण शेवटी हा आजोबाच त्याच्या कामाला यायचा. तो कसा? तर साहेब मनमौजी स्वभावाचे. त्यामुळे जिथे तिथे उधारी. जिथे गरजेचे तिथे कधीच त्याच्या हातात पैसे नसत. अभ्यास कोण आधीपासून करत? त्यामुळे अर्धे विषय राहिलेले. आता ते सोडवायला परत कोण मदत करणार तर अनिल. याउलट अनिल कडे मात्र गरजेला पैसे असायचे, परीक्षेत चांगले मार्क्स असायचे. हा फरक कसा? आनंदी स्वभाव नडतो आणि गंभीर, चिंतातुर स्वभाव मात्र कामी येतोय अस का?

दुसर उदाहरण, जाई आणि निशा. दोघी जावा. जाई मोठी जाऊ. आणि निशा तिच्याहून लहान. दोघांची सासू जरा खाष्ट होती. तिला जरा इकडच तिकडे झालेलं चालत नसे. तस झालं तर सर्व राग या दोघींवर निघे. राग जरी दोघींवर निघाला तरी त्या दोघींच्या प्रतिक्रिया वेगळ्या असायच्या. जाईला कोणी काही बोललेल आवडत नसे. तिचा पारा लगेच चढायचा. त्यामुळे सासू काही बोलली तर ती ही काहीतरी प्रत्युत्तर द्यायची. ज्याचा परिणाम नंतर परत तिला अपराधीपणा यायचा की आपण आपल्या सासूला अस का बोललो. निशा मात्र अशी नव्हती. तिला सासुच बोलण पटायचं अस नाही.

पण त्यांना प्रत्युत्तर न देता ती नीट शब्दात स्वतःचा मुद्दा सांगायची आणि त्यांची चूक पण दाखवून द्यायची. त्यामुळे तिला काही बोलताच येत नसे. जाई मात्र उलट बोलत असल्याने शब्दाला शब्द वाढायचे. ती निशाला विचारायची, तू इतकी शांत कशी? तुला राग येत नाही. त्यावर निशा म्हणायची, मुळातच ती गोष्ट मला इतकी येण्यासारखी वाटत नाही आणि जिथे येतो तिथे मी तो दाखवते. आता इथे राग दोघींना येत होता. पण तरी जाई च्या रागाने तिला पण आणि सासूला पण त्रास होई. याउलट निशा चा राग आहे की नाही हे देखील समजत नसे. अस का?

इथेच हेल्दी विचार आणि हेल्दी भावनांच गुपित दडलेले आहे. पहिल्या उदाहरणात अनिल जरी चिंतित होत असला तरी त्यातून तो अभ्यास करण्यास प्रवृत्त होत होता. त्यातून तो परीक्षेकडे गांभीर्याने पाहत होता. पैसे आता खर्च केले तर मजा करता येईल पण नंतर जेव्हा गरजेला पैसे लागतील तेव्हा आपल्याकडे ते असणारेत का? हा प्रश्न पडत होता आणि म्हणून पैसे जपून वापरला जात होता. ज्याचा पुढे जाऊन त्याला फायदा होत होता.

आता कोणीही असच म्हणेल की टेन्शन घ्यायचं नसत. चिंता करायची नसते. पण तरीही हे चिंतेचे विचार त्याला फायदा करून देतात. का? कारण ही चिंता त्यातले हे विचार आरोग्यदायी आहेत. आणि जेव्हा चिंता ही आरोग्यदायी असते तेव्हा त्याला काळजी अस म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची काळजी करतो तेव्हा ती गोष्ट नीट कशी करता येईल याकडे आपला भर असतो. ते करण्यासाठी लागणारी क्षमता आपल्यामध्ये असते. परीक्षेची काळजी वाटते म्हणून अभ्यास केला, पैश्याची काळजी वाटते म्हणून ते जपून वापरले. या विचारांमध्ये दूरदृष्टी आहे, तर्किकता आहे. त्यातून माणूस कार्यक्षम होत आहे.

दुसऱ्या उदाहरणातून पण हे लक्षात येईल. राग दोघांना देखील येत आहे. पण एक राग तिच्याकडून चुकीचं वागणं घडवून आणत आहे. आणि दुसरा तिला ठामपणे बोलायला शिकवत आहे. कश्यामुळे? कारण आपण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे समजत आहे म्हणून. तसच आपण इतकं तीव्र व्यक्त व्हावं अशी काही गोष्ट घडली आहे का? हा प्रश्न स्वतः ला विचारता येत आहे म्हणून योग्य शब्दात आपला मुद्दा मांडता येत आहे. कोणत्या गोष्टीला किती राग व्यक्त केला पाहिजे याची पातळी ठरवता येत आहे. म्हणून तो जरी राग असला तरी आरोग्यदायी आहे. ती भावना, ती जाणीव आरोग्यदायी आहे.

त्यामुळे जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की, हेल्दी विचार आणि हेल्दी भावनांसाठी तुम्ही या गोष्टी करताय ना? तेव्हा त्या अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या विचारांना, भावनांना ताब्यात ठेवता आहात ना? एका बाजूला चांगल टोक आहे दुसऱ्या बाजूला वाईट आहे. दोन्हीकडे न झुकता तुम्ही मध्ये राहू शकता ना? हे अस संतुलन राखता येत नसत तेव्हा एकतर माणूस पूर्ण बेफिकीर तरी होतो किंवा मग उदासीन. तरी होतो. अस न करता तुम्ही स्वतःचा माणूस म्हणून स्वीकार करत आहात ना? आपल्या विचारांची उपयुक्तता, तर्किकता तपासत आहात ना? हे सर्व करत असाल तर म्हणता येईल की तुम्ही आरोग्यदायी विचार व्हावेत यासाठी काहीतरी करताय.

चूक झालेली एखादी व्यक्ती अपराधी भाव घेऊन आयुष्यभर जगते तर दुसरी व्यक्ती केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होऊन त्यातून काहीतरी शिकून पुढे चांगल काहीतरी करते, तिसऱ्या व्यक्तीला काही फरकच पडत नाही. आता खूपच फरक पडणे आणि अजिबातच न पडणे दोन्ही गोष्टी माणसाला खालीच पाडतात. मधला मार्ग मात्र आरोग्यदायी ठरतो. का? तर इथे स्वतः ला माफ केलेलं आहे. एक संधी दिलेली आहे काहीतरी शिकेलेल आहे. अस ज्यातून पुढचं जीवन चांगल होईल.

म्हणूनच हेल्दी विचार, भावना यायला हव्या असतील, तर स्वतःचा, इतरांचा, परिस्थितीचा स्वीकार करायला शिका, चुकामधून नवीन शिकायचं प्रयत्न करा, आणि आपल्या विचारांची, भावनांची तपासणी करायला शिका.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!