Skip to content

Healthy मानसिकता ठेवण्यासाठी स्वतः एकट्याने काय काय करता येईल ?

Healthy मानसिकता ठेवण्यासाठी स्वतः एकट्याने काय काय करता येईल ?


हर्षदा पिंपळे


‘हेल्दी मानसिकता’

काही लक्षात येतय का ?

‘हेल्दी मानसिकता’ अर्थात जी सध्याच्या जीवनात हरवत चालली आहे.आपण नाही म्हंटलं तरीही या हेल्दी मानसिकतेला बऱ्याच प्रमाणात गमावलेलं आहे.
आयुष्यात इतर गोष्टींप्रमाणेच आपली मानसिकताही तितकीच महत्वाची असते.

खरं तर आपली मानसिकता जितकी हेल्दी असते तितकच आपलं जीवन हेल्दी असतं.पण हल्ली आपण पाहतोय की, फार कमी लोकं आहेत ज्यांची मानसिकता ही हेल्दी आहे.आपण त्यात कुठे आहोत हे ज्याचं त्याला चांगलच माहित असेल.

पण मित्रांनो,आयुष्यात मानसिकता हेल्दी असणं आवश्यक आहे.आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे.आणि आपल्यामुळे इतरांची मानसिकता बिघडणार नाही याची काळजी घेणही तितकच आवश्यक आहे.

आणि इतकच नाही तर आपल्या मानसिकतेची जबाबदारी आपण घ्यायला शिकायला हवं.आपली मानसिकता हेल्दी ठेवण्यासाठी आपणच छोटे मोठे प्रयत्न करायला हवे.

तर,आपण स्वतः आपल्या हेल्दी मानसिकतेसाठी नक्की काय काय करू शकतो ते जाणून घेऊयात.

◆हलका आणि सकस आहार :
फास्ट फूड खाण्यापेक्षा हलक्या
आणि सकस आहारावर लक्ष केंद्रित करणे.
शक्य होईल तितकं पौष्टिक खाण्याला प्राधान्य देणे.
अतितिखट किंवा अतिगोड पदार्थ खाणे टाळावे.

◆मेडिटेशन :
नियमित मेडिटेशन करणे.
यामुळे ताणतणाव कमी होऊन एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

◆व्यायाम :
नियमित व्यायामामुळे आपल्या सेल्फ इस्टिमवर खूप चांगला परिणाम होत असतो.नियमित व्यायाम करणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते.

◆व्यक्त होणे :
आपण मनात बऱ्याच गोष्टी साठवून ठेवतो.त्यांना मनात दीर्घकाळ साठवून ठेवणे योग्य नाही. त्यामुळे वेळीच मनातील भावनांचा निचरा करणे.स्वतःसमोर/मित्रांसमोर व्यक्त होणे.

◆धूम्रपान टाळणे :
धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावे. ते आपल्या दोन्ही स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे.त्यामुळे दारू पिणे, सिगरेट ओढणे या अशा प्रकारच्या गोष्टींना वेळीच आवर घालणे.

◆आनंदी / सकारात्मक गाणी ऐकणे –
म्युझिक थेरपी ही आपल्या माईंडवर खूप छान काम करते.त्यामुळेच हेल्दी मानसिकतेसाठी आनंदी, सकारात्मक किंवा आवडीची गाणी ऐकणे.

◆छंदांमध्ये मन रमवणे-
आवडीच्या छंदांमध्ये मन रमवणे.गाणं गाणे,ऐकणे.चित्र काढणे,वाचन करणे वगैरे वगैरे.

◆भटकंती –
मस्त मोकळ्या हवेत भटकंती करायला जाणे.एखादं शांत पाण्याचं ठिकाण असो,गडकिल्ले असो अगदी आवडेल अशा ठिकाणी भटकंती करणे.
एक आगळा वेगळा अनुभव घेणे.

◆पुरेशी शांत झोप घेणे –
झोपेच्या अभावामुळे अनेक गोष्टी बिघडतात. त्यामुळे झोप ही घ्यायला हवी.शांत झोप ही आपली गरज आहे. त्यामुळे आवश्यक तितकी शांत झोप घेणे.

◆अतिचिंता थांबवणे –
एखाद्या गोष्टीची अतिचिंता करणं थांबवणे.
उगाचच एखाद्या गोष्टीचा तासनतास विचार न करणे.

◆छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे –
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. माणसाला आनंद महत्त्वाचा असतो,त्यामुळे तो छोट्या छोट्या गोष्टीत शोधायला हवा.

◆तणावयुक्त वातावरणापासून किंवा नकारात्मक वातावरणापासून स्वतःला शक्यतो लांब ठेवणे.

◆नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक बोलण्याला प्राधान्य देणे.

◆अवतीभवती दिसणाऱ्या गोष्टींपैकी चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे.

◆आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये योग्य ते बदल करणे.

◆स्वतःला समजून घेणे.

◆सोशल मीडियावर कमीत कमी वेळ घालवणे.

◆कमीत कमी अपेक्षा करणे.

अशा प्रकारच्या अनेक गोष्टी केल्यामुळे मानसिकता
नक्कीच हेल्दी होऊ शकते. बिघडलेली मानसिकता सुरळीत करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी करणं आवश्यक आहे.

शरीर निरोगी असावं,मन स्वच्छ असावं,घर स्वच्छ असावं असं आपण अनेकदा बोलतो.पण मग आपल्या मानसिकतेचं काय ? आपली मानसिकताही हेल्दी असायला हवी नं ? स्वच्छ आणि मोकळी असायला हवी नं?

आपल्या मानसिकतेवर आपलं आयुष्य घडत असतं.एखादं शरीर हेल्दी असेल तर ते उत्साहाने न थकता काम करतं.अगदी तसचं आपली मानसिकता जर हेल्दी असेल तर आपण आपलं आयुष्य हेल्दी जगू शकतो. आनंदाने जगू शकतो.

सो…स्वतःच्या मानसिकतेची व्यवस्थित काळजी घ्या.तिला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!