Skip to content

हे ८ प्रकारचे पदार्थ आपली चिंता आणि डिप्रेशन वाढण्यास मदत करतात.

हे ८ प्रकारचे पदार्थ आपली चिंता आणि डिप्रेशन वाढण्यास मदत करतात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की जर आपलं आरोग्य चांगल ठेवायच असेल तर ते सर्व बाजूंनी असावं लागतं. फक्त शरीर चांगल आहे किंवा फक्त पैशाने श्रीमंत आहे म्हणजे एक सुखी आयुष्य आपण जगू शकतो, आपल्याला हवं ते मिळवू शकतो अस होत नाही. पैशाने वस्तू येतात स्वास्थ्य नाही. त्यामुळे चांगल स्वास्थ्य, चांगल आरोग्य हवं असेल तर सर्व बाजूंनी त्याचा विचार करावा लागतो.

म्हणजेच आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि आपलं सामाजिक जग या सर्व गोष्टींचा समतोल असण आणि त्यातून आपल्याला एक समाधानाची जाणिव येणं म्हणजे आपलं आरोग्य चांगल आहे अस म्हणता येईल. यातल्या प्रत्येक घटकाची आपल्याला काळजी घ्यावी लागते.

शारीरिक आरोग्य नीट हवं असेल तर आपलं खाण, झोप, व्यायाम या सर्व गोष्टी नित्य नियमाने कराव्या लागतात. मानसिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी चांगले विचार करण, मेडिटेशन, स्वतःला मनाने खंबीर आणि सक्षम करण गरजेचं असत. तसच आपलं सामाजिक विश्व विस्तारित करण्यासाठी चांगली नाती करणे, समाजात चार चौघामध्ये नीट वावर, आपलं माणूस म्हणून एक चांगल व्यक्तिमत्त्व असण गरजेचं आहे.

तसच आपण समाजाचा एक भाग आहोत, त्याच्या प्रती आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव ठेवून त्याच्यासाठी काही करण या सर्व गोष्टी आपल्याला आतून अजून मजबूत करतात. माणूस म्हणून आपला विकास करून देतात. दिसताना जरी या गोष्टी वेगळ्या दिसत असल्या तरी या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. या तिन्ही गोष्टींचा एकमेकांवर प्रभाव पडतो. जेव्हा आपल शरीर नीट नसत तेव्हा आपली मानसिकता पण बिघडते, जेव्हा दृष्टिकोन चुकतो जेव्हा शरीर, नात्यांची हेळसांड होतेच होते.

त्यामुळे समतोल राखताना तिघांचा विचार करून करावा लागतो. त्यामुळे आपण काय खातो? आपली झोप कशी आहे? एखाद्या घटनेचा आपण कसा विचार कसा करतो? आपली नाती या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला ज्या मानसिक समस्या उद्भवतात त्यामागे आपल्या विचारांची मोठी भूमिका आहे अस मानलं जात. त्यांचा प्रभाव तुलेनेने जास्त मानला जातो.

पण तुलनेने, कारण इतर घटनांचा देखील प्रभाव पडतो. जसं आधी पाहिलं आपण खाण. आपला आहार कसा आहे. जे पोषक घटक आपल्या शरीराला मिळणं आवश्यक आहेत तस आपलं खाण आहे का याचा आपण हल्ली कितीपत विचार करतो? आताच युग खूप फास्ट आहे. कोणाला इतका वेळच नाही की तो जरा वेळ काढून नीट ताज्या पदार्थांपासून जेवण बनवेल.

मोठया, मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये तर हे चित्र वाढत आहे. नवरा बायको दोन्ही जण कामाला जातात. बरीच जण जेवणाला बाई ठेवतात पण तरी सर्वांनाच ते शक्य होत अस नाही. अश्या वेळी काय आणलं जात तर प्रोसेस फूड. म्हणजे अस अन्न जे अगदी काही मिनिटामध्ये शिजत, तयार होत. ज्यामध्ये बऱ्याच अर्टिफिशियल गोष्टींचा वापर केला जातो.

हे अस पॅक बंद जेवण आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आणि याचीच पडताळणी जेव्हा साऊथ आणि नॉर्थ अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी आणि मेडिकल स्कूल संशोधकांनी करायला घेतली तेव्हा त्यांनी एक नवीन गोष्ट दिसून आली ती म्हणजे “Ultra Procesed Food”(UPF) हे असे सोयीचे पदार्थ असतात ज्यामध्ये आपल्या खाण्यातील जे नैसर्गिक घटक असतात त्यांचं प्रमाण अतिशय कमी असत, पोषक द्रव्य कमी प्रमाणात असतात आणि याउलट ग्राहक कसा आकर्षित होईल याकडे लक्ष देऊन त्या दृष्टीने काही घटक घालण्यात आलेले असतात जे addictive असतात.

जसं की, त्या पदार्थाची चव, त्याचा कलर इत्यादी. हे पॅकेट बंद खाण लवकर शिजत तसच याची किंमततही कमी असते. पण आपण ज्या उद्देशाने खाण खातो, खाण्यातून आपल्या शरीराला जे काय पोषण मिळणं आवश्यक असत ते यातून मिळत नाही. उलट यातले काही पदार्थ आपली चिंता आणि नैराश्य वाढवतात. रिसर्च मधून असे ८पदार्थ मिळालेले आहेत जे खाल्यावर लोकांना चिंता आणि नैराश्याचा अनुभव आला. ते पदार्थ कोणते ते पाहू:

1. चिप्स: चिप्स आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. पण हे पण एक पॅक बंद खाण आहे जे आपल्या शरीरावर चुकीचे परिणाम करत.

2. शर्करायुक्त पेये: हल्ली सॉफ्ट ड्रिंक्स खूप मोठ्या प्रमाणावर प्यायली जातात. पण यामध्ये नैसर्गिक घटकांचे प्रमाण खूप कमी असल्याने आपल्यावर याचे दुष्परिणाम जास्त होतात. साखरेचं प्रमाण वाढत तसच मेंदू वर देखील परिणाम होतो.

३. मांस: पॅकेट बंद मांस पण घेतल जात. आधीच ते खूप दिवस टिकवेलेल असत. त्यासाठी artificial preservatives घातलेले असतात.

४. कुकीज: लहान मुलांपासून सर्वांना कुकीज आवडतात. आणि यात घातलेल्या पदार्थामुळे खाण्याच प्रमाणपण वाढत.

५. ब्रेकफास्ट सीरिल्स: सकाळी कामावर जायच्या घाईत हल्ली सर्रास याचा वापर केला जातो. पण ताज्या पदार्थांमध्ये जे पोषण मिळत ते यात नसत.

६. केक: केक हा पण सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो. पण ही सुध्दा एक गोष्ट बऱ्याच रेडीमेड साहित्यापासून बनवली जाते.

७. ब्रेड: मैदा शरीराला हानिकारक असतो आणि ब्रेड हा बऱ्याच प्रमाणत मैद्यापासून बनवला जातो. ज्यातून आपण अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत.

८. स्नॅक्स: सर्वांच्या आवडीची गोष्ट आणि स्वस्तात मिळणारी. पण जी गोष्ट कमी किमतीत मिळते त्याची मंत कुठेतरी आपल्याला किंमत चुकवावी लागते.

हे ते पदार्थ आहेत जे लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य वाढवत आहेत. म्हणून आपण आरोग्याप्रती सजग होणे गरजेचे आहे. जितकं नैसर्गिक आणि चांगल पोषण देणार अन्न आपण खाऊ तितकच आपलं आरोग्य चांगल राहील. शेवटी आपण इतकं काम करतो ते चांगल आयुष्य जगण्यासाठी. ते कधी मिळणार तर आरोग्य चांगल असल तर. म्हणून आधी आरोग्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी जरा आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष दिलं तर काही नुकसान होऊ शकत नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!