Skip to content

मजबूत बोटांनीही हात सुटून जातात, कारण नाती ताकतीने नाही तर मनाने जिंकली जातात.

मजबूत बोटांनीही हात सुटून जातात, कारण नाती ताकतीने नाही तर मनाने जिंकली जातात.


हर्षदा पिंपळे


“अगं हे धरलेले हात असे सहजासहजी सुटणार नाहीत गं ? माझी बोटं इतकी तकलादू वाटतात का तुला ? धरलेले हात सहजासहजी सुटणार नाहीत एवढी ताकद आहे माझ्या बोटांमध्ये.तु जास्त विचार नको करू.”

राधा रेवाला म्हणाली.

“बरं,नाही करत जास्त विचार. पण अगं,नाती काय हात किती मजबूत आहेत यावर जपली जातात का ? नाती काय अशी ताकदीने जिंकली जातात का ?पैशाने जिंकली जातात का ?”

अगं,हात कितीही मजबूत असूदेत,नाती जिंकली जातात ती मनाने.जपली जातात ती मनाने.मजबूत बोटं आणि घट्ट हात काय सहज सुटून जातात गं.मला वाटतं,कुठलही नातं हे मनाच्या ताकतीवर जपलं जातं.विश्वासावर जपलं जातं.प्रेमाने जिंकलं जातं.मजबूत बोटांनी हात कधी सुटून जातो कळतही नाही. तु वेगळा विचार करतेय खरं तर.राधे,Change your attitude…यार.”

रेवा म्हणाली.

रेवाचं हे बोलणं ऐकून राधाला काय करावं ते समजत नव्हतं.

त्यामुळे राधाने फक्त मान डोलावली.

“अगं,फक्त मान काय डोलावतेस ? मी काहीतरी सांगितलं गं तुला.आणि जे खरं आहे तेच सांगितलं. मला वाटलं काहीतरी प्रतिक्रिया देशील यावर.पण तु तर फक्त मान डोलावलीस.असो.पण विचार कर मी बोलतेय त्याचा.असही तुझं वागणं तसचं असतं.नको तिथे नको ती ताकद लावत असतेस. म्हणूनच तर तुझ्यापासून सगळी माणसं सहजपणे दूर होतात. सहजपणे तुटतात.नेहमी पैशाची ताकद दाखवत असतेस, असं नाही चालत गं.कधीतरी मनाने जिंकायला शिक लोकांना.कधीतरी ती माणसं उपयोगी पडतील.”

रेवा म्हणाली.

राधाला रेवाच्या अशा बोलण्याचं जरा वाईट वाटलं.पण ते तिला पटलंसुद्धा.

” मी विचार करेन,तुझ्या बोलण्याचा.” असं म्हणून राधाने रेवाचा निरोप घेतला.

तर,आपल्या आयुष्यात अशाच व्यक्ती असतात. त्यापैकी काही नात्यांना जिंकण्यासाठी बुद्धीचा वापर करतात, पैशाचा वापर करतात, थोडक्यात सांगायचे झालं तर भौतिक ताकद लावण्याचा प्रयत्न करतात.अशाप्रकारची ताकद लावून नाती जिंकून घेण्याकडे त्यांचा कल असतो.तर काही माणसं अशी असतात जी प्रत्येक नात्याला विश्वासाने, प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करतात.अर्थात प्रत्येकाचे मार्ग हे वेगवेगळे असतात.आयुष्यात रोज कितीतरी लोकांना आपण भेटत असतो.त्यातील बरेचसे लोक हे अनोळखी असतात. जवळच्या माणसांना जिंकायलाच आपल्याला खूप वेळ लागतो.तर अनोळखी माणसांना जिंकणं म्हणजे फारच कठीण काम.

मजबूत बोटांनीही हात सुटून जातात, कारण नाती ताकतीने नाही तर मनाने जिंकली जातात.हे अगदी खरं आहे.कारण,धरलेले कितीतरी हात सहज तुटताना आपण पाहतो.हाताची बोटं कितीही मजबूत असूद्यात,त्यामध्ये प्रेम,जिव्हाळा, मायेचा झराच वाहत नसेल तर असे हात कुठलही नातं सहजासहजी जिंकू शकत नाही.नातं जिंकण्यासाठी कुठल्याही प्रकारचा देखावा करणं खरं तर चुकीचं आहे. तो पैशाचा असूदे,रूबाचा असूदे.त्या देखाव्याचा नाती जिंकण्यासाठी काही उपयोग होत नाही. किंवा अशाप्रकारे जिंकलेली नाती कधी यशस्वी होत नाही. अशी नाती फार काळ टिकून राहत नाही.आणि कुठलही नातं जबरदस्तीच्या जोरावर टिकूनही राहत नाही.

नाती जिंकण्यासाठी एकमेकांच्या मनात विश्वास निर्माण करणं आवश्यक असतं.एकमेकांप्रती आदर,प्रेम असणं आवश्यक असतं.एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता असणं आवश्यक असतं.तरच नाती जिंकता येतात.टिकवता येतात.नात्यांसाठी मनाची ताकद महत्वाची असते.

कित्येकांना हे लक्षातच येत नाही.नेहमीच घट्ट पकडलेल्या हातांवर कित्येकजण सहजपणे विश्वास ठेवतात. पण हाताची मजबूत बोटं केव्हाही सुटू शकतात हे मात्र ते सहज विसरतात.आणि नंतर मात्र या सगळ्याचा त्रास होत राहतो.

तर म्हणूनच,केवळ भौतिक ताकदीवर विश्वास ठेवून नाती जिंकण्याचा प्रयत्न केव्हाही फोल ठरू शकतो. हे लक्षात घ्या.कधी कधी मजबूत बोटांनीही हात सुटू शकतात हे लक्षात घ्या.

नाती मनाने जिंकायला शिका,प्रेमाने जपायला शिका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!