Skip to content

नवीन ठिकाणी प्रवास करावा असं वाटणं हे आनंदी मानसिकतेचे लक्षण आहे…

नवीन ठिकाणी प्रवास करावा असं वाटणं हे आनंदी मानसिकतेचे लक्षण आहे…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


नवीन ठिकाणी प्रवास करायला, नवीन जागांना भेटी द्यायला कोणाला आवडत नाही. अगदी आपण स्वतःचा जरी विचार केला तरी लक्षात येईल की जेव्हा शाळेत असताना सहलीची नोटीस येत असे तेव्हा आपण किती आनंदी व्हायचो. सहलीला जायला मिळावं म्हणून घरी वेगवेगळ्या पद्धतीने आई-वडिलांना राजी करायचो.

सगळ्यात गमतीची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एरवी कधी लवकर न उठणारे आपण त्या दिवशी मात्र लवकर उठून तयारी करून बसायचो. सहलीला जायचं असायचं म्हणून. कारण प्रवास, सहल गोष्ट अशी आहे कि ती माणसाला रोमांचित उत्साही करून सोडते.

सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात असं होतं की बऱ्याच जणांना कामाव्यतिरिक्त, काम सोडून कुठे जाता येत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये ही काही लोक मात्र आपली ही नवीन ठिकाणी भेट देण्याची, प्रवास करण्याची आवड प्रयत्नपूर्वक जपताना दिसतात.
तुम्हालाही जर नवीन ठिकाणी भेटी देण्याची प्रवास करण्याची आवड असेल तर नक्कीच हे एका आनंदी मानसिकतेचे लक्षण आहे. कारण हे लोक कधीच एका कोषात अडकून राहत नाहीत. त्यांना भ्रमंतीची आवड असते. अशा लोकांना जग जास्तीत जास्त explore करायचं असतं.

प्रवास किती मोठा असू दे, त्यात किती अडथळे येऊ देत त्यांच्या चेहर्‍यावर मात्र उत्साह असतो कारण या प्रवासामधून, नवीन ठिकाणामधून मिळालेले अनुभव, या प्रवासमध्ये मिळालेली लोक, त्या ठिकाणची समजलेली संस्कृती हे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करत असतात.
त्यामुळे त्यांना परत नवीन प्रवास करण्याची ऊर्जा, प्रेरणा मिळत असते. या लोकांमध्ये openess to experience म्हणजे नवीन अनुभवांचा मुक्तपणे स्वीकार करण्याचा, त्यांना सामोरे जाण्याचा गुण जास्त असतो.

जितक आपल्याला एखाद्या पुस्तकामध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन वाचून समजत नाही तितकं किंबहुना त्याहून जास्त आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन समजत असत आणि या प्रवासात येणारा अनुभव आपल्याला खूप काही शिकवत असतात. या भेटींमधून त्या ठिकाणचा इतिहास, तिचे राहणीमान तिथे संस्कृती या सर्व गोष्टी समजतात आणि हे सर्व पाहण्यासाठी, जगण्यासाठी प्रवास करण हे आयुष्य छान, नवीन पद्धतीने जगण्याच लक्षण आहे.

रोजच्या आयुष्यात काम जबाबदाऱ्या कर्तव्य असतं. पण त्यापुढे जाऊन नवनवीन अनुभव घेणं नवनवीन ठिकाणी प्रवास करण,त्यातून शिकणं, स्वतःसाठी वेळ काढणं हे आपलं आयुष्य स्वच्छंदी करतात. पाखर जशी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात तसाच आपला प्रवास असतो. ज्या घरी जाताना आपण एकटे असलो तरी येताना मात्र नसतो. कारण येताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या बऱ्याच गोष्टी सोबत घेऊन येतो. म्हणून म्हटलं आहे,

मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर,
लोग जुडते गए और कारवां बनता गया…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “नवीन ठिकाणी प्रवास करावा असं वाटणं हे आनंदी मानसिकतेचे लक्षण आहे…”

  1. Wonderful Article,All points are written and explained in well manner and point wise…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!