Skip to content

दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं.

दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं.


सोनाली जे.


बरेचवेळा आपण आपले समजून सगळ्यांना जीव लावत असतो. पण बाहेरचे लोक तसे आपल्याला त्यांच्या करिता कितीही केले तरी ते आपल्याला परके मानतात. आणि आपले लोक जे असतात. जे आपण रक्ताचे म्हणतो, नात्याचे म्हणतो , अगदी जवळचे त्यांच्या करिता आपण अनेकदा करूनही त्यांच्या लेखी आपली किंमत शून्यच असते.

अनेकदा वाटते की ही आपलीच लोकं आहेत का ? यांना काही भावना नाहीत का ? एव्हढे कसे दगडासारखे काळीज आहे यांचे असे प्रश्न पडतात. आणि आपण त्यामुळे अजून जास्त दुखी होतो. आपल्या भावना , मन , त्रास , आपुलकी आणि त्यांच्या करिता आपण ज्या गोष्टी केल्या असतात त्याची त्यांना जाणीव ही नसते.

दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं.

एकदा एक वयस्क म्हातारी , अगदी साध्या सुती विटक्या साडीत असलेली, एका डोळ्याने आंधळी असलेली ही बाई सकाळी अकरा च्या दरम्यान दारावरची बेल वाजवते. बाबा कोण आहे हो , असे म्हणत मेधा ही येते. पण तेव्हढ्यात बाबा त्या बाईला दारातून च बाहेर घालवतो आणि दार बंद करताना कोणी नाही ग, असे म्हणतो. तेव्हा मेधा त्याची मुलगी म्हणते ही की बाबा ती बाई म्हातारी होती, आणि तुम्हालाच विचारत होती ना ?? मला तर असेच वाटले ती तुमचे नाव घेत होती. असे करू नको म्हणत होती. काय झाले कोण होती ती.
अग कोणी नाही ग , चुकून आली होती.

मधले वर्ष कसे जाते समजत ही नाही. अचानक शेखर चे शाळेचे गेट टुगेदर ठरते. त्याकरिता सगळी मित्र मंडळी , शाळेतले शिक्षक भेटणार या आनंदात सगळे असतात. शेखर ही सगळ्या मित्रांच्या समवेत गावाला जातो.सगळे मित्र भेटतात , जुन्या शाळेतल्या , गावातल्या आठवणी याने सगळे आनंदून जातात. सगळे आप आपल्या घरी जावून यावे म्हणून निघतात.

शेखर ला ही वाटते आपण ही आपल्या घरी जावे. म्हणून तो घरी जातो. बघतो तर काय कुलूप. शेखरला बघून शेजारी लगेच च येतात. शेखर त्यांना विचारतो आई घरी नाही का ? शेजारी म्हणतात थांब हुं आणि एक पत्र आणि घराची किल्ली देतात. आणि म्हणतात तुझ्या आईला खात्री होती की तू कधी ना कधी तरी इथे येणारच. तुझी आई तुझी खूप वाट बघत होती पण गेल्या महिन्यात तिचे देहावसान झाले. आम्हीच तिचे सगळे क्रिया कर्म केले. तिने ही चिठ्ठी तुझ्याकरिता ठेवली आहे. असे म्हणून शेजारी निघून जातात.

शेखरला आईची शेवटची भेट झाली नाही म्हणून खूप वाईट वाटते. तो कुलूप उघडुन घरी येतो त्याला घरातल्या त्या सगळ्या जुन्या आठवणी येतात. बाबा लवकर गेले त्यामुळे आईनेच त्याला मोठे केले , शिक्षण आईनेच घरकाम , बाहेर शिवण कामे करून मोठे केले. पण तो आईचा कायम राग राग करायचा. त्याच्या शाळेतली मुले त्याला नेहमी चिडवायचे ..कारण त्याच्या आईला एक डोळा नव्हता. शेखर ला आई सोबत कुठे जायची लाज वाटायची . त्यामुळे तो तिच्या सोबत कुठे जायचं टाळत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई ला नोकरी मिळाली तसे तो एकटाच निघून गेला. तिकडे लग्न केले. एक मुलगी झाली. पण त्याला आईची आठवण ही आली नाही.

तो आईने लिहिलेले पत्र वाचू लागला . त्यात त्याच्या आईने लिहिले होते. प्रिय शेखर, खात्री होती की तू एक दिवस नक्की येणार पण तोपर्यंत मी या जगात नसणार हे सुधा माहिती होते.

शेखर गेल्या वर्षी मी तुझ्याकडे आले. तेव्हा तू मला आई म्हणायला सुधा लाजलास , माझी नात समोर होती तुला विचारत होती कोण आहे . तर तू सांगितले चुकून आली आहे ती बाई. खूप वाईट वाटले शेखर हे ऐकून , तू आईचे नाते ही स्वीकारले नाहीस.

तुला वाटले आई तुझ्याकडे पैसे मागायला आली. पण मी तुमच्या सोबत काही काळ आनंदाने घालवायला आले होते. माझी सून , नात , तू या सगळ्यांच्या मध्ये राहायचे होते मला. आपली माणसे शेवटी पाहिजे होती. तो आनंद पाहिजे होता. नातीचे कोड कौतुक करायचे होते.

इतके वर्ष मी एकटीच राहत आले. आता एकटीला खरे तर राहायचं कंटाळा आला. आणि आता पूर्वी सारखे होत ही नाही. बाहेरून आपणच आणायचे , आजरपणात ही उठवत नसताना औषध ही आपण घेवून यायचे ..जगण्या करिता पोटा पाण्याची सोय ही आपणच करायची. आता होत नव्हते रे हे सगळे एकटीला. म्हणून मी तुझ्याकडे शेवटचे काही दिवस आनंदाने , आपल्या माणसा मध्ये राहावे म्हणून आले होतें . तू मला चुकलेली वाटसरू म्हणून हाकलून दिलेस.
तेव्हा मी परत एकदा विचार केला की, दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं.

आज मी या पत्रात सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. तुझे वडील तुझ्या लहान वयात च गेले. त्यानंतर तुझी पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. माहेरी कोणी ठेवून घेतले नाही. सासरच्यांनी ही आसरा दिला नाही.

एकदा खेळताना तू पडलास आणि तुझ्या डोळ्यात सळई घुसली आणि तुझा डोळा निकामी झाला. तुझ्या पुढे तुझे संपूर्ण आयुष्य होते म्हणून मग मी माझा डोळा काढून तुला दिला . तू खूप लहान होतास त्यामुळे तुला हे आठवत ही नव्हते. जसे मोठा होवू लागला . शाळेत जावू लागलास तसे तुझे मित्र तुला माझ्या वरून चिडवत होते. म्हणून तुला माझी लाज वाटायची.

तरी मी कुठे माझ्या कर्तव्यात तुला कमी केले नाही. चांगले शिक्षण दिले. नोकरी लागल्यावर तू कधी परत आला ही नाहीस . की कधी माझी आठवण ही काढली नाहीस.

तेव्हाही मी हाच विचार करून जगत होते की तुझे शिक्षण पूर्ण झाले , नोकरी मिळाली , शहरात गेलास आता तुला माझी गरज ही नाही.
दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं. म्हणून एवढी वर्ष एकटीच जगले. पण शेवट काही दिवस तुमच्यात राहावे म्हणून आले पण तू तेव्हाही मला नाकारले.

तुझ्या करिता मी आयुष्यभर एका डोळ्याने आंधळी राहिले. पण तुझ्या सारख्या दगडाचं काळीज असलेल्या मुलाला किंचित ही आईची दया आली नाही. तेव्हा शेखर ला वाईट वाटते पण वेळ गेलेली असते.

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात .अनेक व्यक्ती आपल्या जवळच्या म्हणणारे आपण, मित्र , नातेवाईक , आईवडील , प्रेयसी प्रियकर , अगदी नवरा बायको, आपल्याच व्यक्ती त्यांच्यापासून आपण दूर होतो. अंतर ठेवून वागतो. कधी गैरसमज करून घेतो. तर कधी समोरच्याला समजून घेत नाही. फडफड बोलून रिकामे होतो. त्याच्या , तिच्या भावना कधी लक्षात घेत नाही.

आपल्याच मित्र मैत्रिणी सोबत आपण ओळख करून देतो पण आपल्याला विसरुन त्यांच्या सोबत मैत्री वाढविली जाते. त्यात गैर असे काही नाही पण मुळात आपली मैत्री एवढी परकी करून नवे मित्र मैत्रिणी जोडले जातात. आपण वेळ प्रसंगी केलेली मदत , आर्थिक असेल , मानसिक , भावनिक असेल , शारीरिक असेल .वेळ दिला असेल . .ती कुठच्या कुठे विसरून जातात. त्या व्यक्ती आपल्याला दूर ठेवू लागतात. त्यांना केलेली मदत विसरून जातात.

कॉलेज मधले आपलेच मित्र नोट्स पाहिजे असतील तर अगदी हक्काने रात्री अपरात्री घरी येवून घेवून जात. बरेचवेळा त्यांच्यामुळे दुसरे दिवशी आपल्याला दुसऱ्या रफ वहीत लिखाण करावे लागले असते. आपण आपलेपणाने जीव लावला असतो. पण हे सगळे पुढे जावू तसे ते मित्र नंतर विसरून नवीन मित्र , नोकरी मिळाली की परत नवीन मित्र यात रमून जातात. आपला विसर पडतो. कधी कधी जाणूनबुजून ही दुर्लक्ष केले जाते.

आपला प्रियकर आपला हक्क समजून वागणारी प्रेयसी, वेळ प्रसंगी अतिशय काळजी घेणारी , जेवला का विचारणारी तर कधी स्वतः डबा करून आणून देणारी , भरवणारी प्रेयसी , नवीन कोणी मिळाले की तिला विसरून दुसरी सोबत आनंदाने राहणारा तो प्रियकर बघितला की आपण एवढ्या आपुलकीने केले याची जाणीव ही नाही त्याला याचे वाईट तर वाटते .पण हतबल असतो आपण कारण तेव्हा ती व्यक्तीचं आपल्याला प्रायोरिटी मानत नसते. तिच्या गणती आपण कोणीच नसतो ..

मग तेव्हा वाटते की आपले च लोक स्वार्थी आहेत. कामापुरते आपण .गरज सरो वैद्य मरो अशा प्रवृत्तीचे. आणि मग तेव्हा वाटते की ,
दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं.

प्रत्येकाने विचार जरूर करा, प्रत्येक माणसाला मन , भावना आहेत. आपल्या सोयी , आवडी , सवडी , गरजे नुसार त्यांचा वस्तू सारखा वापर करून टाकून देवू नका. दगडाला ही कधी तरी पाझर फुटतो. पण म्हणून दगडासारखे वागू नका. आयुष्य सुंदर आहे. आणि नशिबाने आपली काळजी करणारी , आपली हक्काची माणसे मिळतात त्यांना तोडू नका तर त्यांना जपून ठेवा.

कधी तरी गैरसमज होतात. चूक कोणाची ..कोण बरोबर यातून दुरावा ही येत असतो. पण आयुष्याच्या उतारक्षणी जाणवू लागते की थोडे एक पावूल आपण पुढे गेलो असतो किंवा एक पावूल मागे गेलो असतो तर आजही ते नाते तसेच दृढ , घट्ट असते.

दगडासारखे काळीज न ठेवता माणसासारखे विचारवंत , भावनाशिल रहा. आज तुमच्या वागण्यामुळे कोणी तरी एकटे राहते. तर उद्या इतर कोणाच्या वागण्यामुळे तुम्हाला एकटे राहावे लागेल याचा जरूर विचार करा.

अर्थात समोरच्याला गरजच नसेल तर सतत पडती बाजू घेवून स्वत :ला कमीपणा ही देवू नका. त्याला गरज असेल तर नक्की एक पावूल पुढे जा. त्याला ही एक पावूल पुढे येवू देत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!