Skip to content

Happiness कडे फोकस करू तेव्हा त्रास देणाऱ्या गोष्टी अदृश्य होत जातील.

Happiness कडे फोकस करू तेव्हा त्रास देणाऱ्या गोष्टी अदृश्य होत जातील.


हर्षदा पिंपळे


आयुष्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे “आनंद”. आजच्या धकाधकीच्या जीवनात हाच आनंद हरवत तर चालला नाही नं…? याची जरा खात्री करून पहा. काय आहे सध्याच आयुष्य म्हणजे धावपळीच, स्पर्धेच आयुष्य आहे. आणि धावपळीच्या जीवनात मानवाचा त्रास, समस्या दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. त्रास वाढून जगण्यातील आनंद हरवताना दिसत आहे.

आनंदी सर्वांना राहवसं वाटतय परंतु आनंदी राहण्यावर सर्वांचाच फोकस आहे असं वाटत नाही.आणि त्यामुळेच कदाचित आयुष्यातील सगळा त्रास असा सर्रासपणे नजरेस पडताना दिसतो. केवळ भौतिक गोष्टी म्हणजे “आनंद” असा कित्येकांचा गैरसमजही आहे.आणि त्यामुळेच आत्मिक आनंदाकडेही कित्येक लोकांच दुर्लक्षच होतं.होणारा त्रासही प्रकर्षाने जाणवत राहतो.त्रासामुळे माणूस कधीच आनंदी राहत नाही.

मग तो त्रास कोणताही असो,शारीरिक असो वा मानसिक.माणूस त्या त्रासामुळे नेहमीच अस्वस्थ नी गोंधळलेला राहतो.अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये माणूस सुखी-समाधानी आणि आनंदी राहू शकत नाही. कारण तो आनंद विसरून अडचणींच्या मागे धावत सुटतो.होणारा त्रास,असणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या?त्रास कमी होईल का?हे असच का होतय वगैरे गोष्टींमध्ये विचार करण्यात अर्धा वेळ सहज घालवतो.

आणि त्या वेळामध्ये इतर गोष्टींमधला आनंद हा क्षणात निसटून जातो.नंतर हाच आनंद हातून निसटून गेल्याची हुरहूर सुद्धा वेगळी असते.म्हणून इतका सगळा त्रास करून घेण्यापेक्षा हॅपिनेसला जवळ करूयात. त्रासदायक वाटणारी सगळी दृश्य कशी हळुहळू अदृश्य व्हायला लागतील.

आपला फोकस हा हॅपिनेसवर असायला हवा. त्याने जगायला एक वेगळी ऊर्जा मिळणार असते.कारण, हॅपिनेस ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या त्रासाचा, दुखाचा विसर पडतो. आपण त्यावेळी अगदी रिलॅक्स झालेलो असतो.नको त्या वेदनांच ओझं त्यावेळी अक्षरशः कधी हलकं होतं काहीच कळत नाही.आणि म्हणूनच आयुष्यात हॅपिनेस असणं आवश्यक आहे. सगळं असून आयुष्यात जर हॅपिनेस नसेन तर त्या जगण्याला काय अर्थ आहे?त्या जगण्याला जगणं तरी कसं म्हणायचं?

मित्रांनो, आनंद हा का आवश्यक आहे तर मुळातच आनंद ही एक मानसिक आणि भावनिक स्थिती आहे.आणि तीच नसेल तर आयुष्यातील प्रत्येक त्रासाच दृश्य सतत दिसत राहील. मनाला छळणारी,अस्वस्थ करणारी दृश्य अदृश्य करायची असतील तर नक्कीच आनंदावर फोकस करायला शिका.नैसर्गिकरित्या एखाद्या गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न करा.आणि प्रॉब्लेम्सऐवजी हॅपिनेसकडे आकर्षित होण्यासाठी प्रयत्न करा.कारण प्रोब्लेम्स कडे आकर्षित झालो तर प्रोब्लेम्स आपल्याकडे आकर्षीत व्हायला वेळ लागत नाही. अशाने प्रोब्लेम्स वाढत जातात. याउलट हॅपिनेसकडे आकर्षण असेन तर हॅपिनेस सहज आपल्याकडे आकर्षित होते.(अर्थात law of attraction…)so… Focus on your happiness.

मित्रांनो आनंदामुळे केवळ आयुष्य सुखी होतं असं नाही तर आपलं आयुष्यही वाढतं.निरोगी आणि सुंदर नी शांत आयुष्य हवं असेल तर आनंदावर फोकस करणं आवश्यकच आहे.

हॅपिनेसवर फोकस करणं आपल्या हातात असतं.आपण स्वतःहून आपल्या आनंदासाठी प्रयत्न घ्यायला हवे.आनंदी समाधानी आयुष्यासाठी केवळ भौतिक गोष्टींचा आनंद घेणं आवश्यक नाहीये तर आंतरिक आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि तो मिळवण्यासाठी स्वतःच धडपड करणं गरजेचे आहे.

काही चांगल्या कृती आपण आवर्जून करायला हव्यात जेणेकरून जगण्यात आनंद निर्माण होण्यास मदत होईल.जसं की—

*चांगला पोषक आहार घेणे.
*सात ते आठ तासांची आवश्यक नियमित झोप.
*प्रत्येक दिवसाची सुरुवात एका गोड हास्याने करा.दुःख, तक्रारी,आणि चिडचिडेपणाने तुमच्या दिवसाची सुरुवात अजिबात करू नका.
*मित्र-मैत्रिणींसोबत/कुटूंबासोबत छान वेळ घालवणे.
*बाहेर फिरायला जाणे,चालायला जाणे.
*आवडत्या व्यक्तीला भेटणे.
*छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे.
*positive राहण्यावर भर देणे.
*चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होणे.

अशा काही गोष्टीही प्रत्येकाने स्वतःच्या आनंदासाठी जरुर केल्या पाहिजे.त्यातून आपण आनंदी होणार असतो.या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी माणसाचं आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी खूप मोठी मदत करत असतात.

आता हॅपिनेस कशात असते…??

कुणाची मांजरीच्या पिल्लात,प्राण्यांमध्ये, निसर्गामध्ये, चॉकलेटमध्ये, मनासारखं काहीतरी घडणे ,एखाद्या कलाकुसरीमध्ये….अगदी कशातही हॅपिनेस दडलेली ही असते.फक्त ती योग्य वेळी फील करता आली पाहिजे. ती निसटून जाता कामा नये.एकदा का ती निसटली की सगळी नकोनकोशी दृश्य पुन्हा पुन्हा दिसायला लागतात.

पहा नकोनकोशा दृश्यांपासून जर दिलासा हवा असेल तर happiness वर फोकस करायला आजच सुरुवात करा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “Happiness कडे फोकस करू तेव्हा त्रास देणाऱ्या गोष्टी अदृश्य होत जातील.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!