काहीवेळेस अस्वस्थ राहायची सवय इतकी लागते की शांततेचा सुद्धा त्रास होऊ लागतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
माणसाच्या आयुष्यात काही ना काही प्रोब्लेम असतात. प्रत्येकाला चढ-उतार हे पाहावे लागतात. सरळ सोप, अगदी मस्त अस कुणाच आयुष्य असत नाही. काही जण प्रॉब्लेम ला सामोरे जाऊन, सोडवून पुढे जातात तर काही जण त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने जग चालत असतं. असं कोणी नाही की ज्याने कधी काही अनुभवलच नाही. पण म्हणून त्यात अडकून बसण, स्वतःला त्रास करून घेणं, अस्वस्थ होण योग्य नाही. त्याला शक्य तेथे ताकतीने सोडवण्यात शहाणपण असतं. तर पुढे जाता येत.
परंतु काही लोक असे असतात याची काही ना काही कारणामुळे अस्वस्थ राहतात. त्यात कोणतीही कारणं असू शकतात. अगदी मोठ्यात मोठी तर आपल्या रोजच्या जीवनात घडणारी. मग ते पाणी उशिरा येणं असूदे, लाईट बिल वेळेवर न भरण असुदे किंवा मग भविष्याबद्दल, होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल. या अस्वस्थतेची इतकी सवय होऊन जाते की जरी त्यांच्या आयुष्यात शांतता अाली तरी त्यांना त्रासच होतो.
स्वतःबद्दल, इतरांबद्दल, तसेच पुढील गोष्टींबद्दल काळजी करणे,त्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे, धडपड करणे चांगले आहे. कारण जर अस केलं नाही तर आपण निष्काळजी होतो. त्यातून आपल्याला पुढे अडचणी येतात पण ज्या काळजीतून आपण काही चांगलं करत असू ती करणे योग्य आहे.
अशी काळजी, अस्वस्थता काय कामाची जी आपली शांतताच हिरावून घेईल. व्यक्तिमत्व घटकांमधील एक घटक म्हणजेच neuroticism हा गुण ज्यांच्यामध्ये जास्त असतो ती अतीकाळजी करणारी, अतिसंवेदनशील असतात. कोणतीही गोष्ट त्यांना अस्वस्थ व्हायला पुरेशी ठरते. आणि सारखा अस्वस्थ झाल्याने मानसिकताही तशीच बनते.
जे नाही त्याच्याकडे लक्ष देणे, एखादी छोटीशी चूक झाली तरी तेच पकडून ठेवण्याची होऊन गेलेल्या गोष्टी ज्या बदलणं जवळपास अशक्य आहे त्या आठवुन त्रास करून घेणे या सर्व गोष्टी मनाला अस्वस्थ करून टाकतात. यातून आताच्या काळ अताची परिस्थिती चांगली असली तरी चांगली वाटत नाही कारण मन दुसऱ्या विचारांमध्ये गुंतलेले असतात. त्यात रिकाम राहिला तर ते विचार सारखे येत राहतात म्हणूनच ही अस्वस्थता योग्य त्या वेळी कमी केली पाहिजे.
त्यासाठी स्वतःला चांगल्या क्रिएटिव कामात स्वतःला गुंतवणे जसे की एखादा छंद तसेच जास्तीत जास्त वर्तमान काळात राहण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी mindfulness असेल, श्वासाचे व्यायाम असतील फायदेशीर ठरतात. म्हणून जे नाही, जे होऊन गेलं आणि जे होणार आहे त्यावर अति लक्ष देऊन अस्वस्थ होण्यापेक्षा आत्ताचा क्षण मी कसा चांगल्या पद्धतीने जगू शकतो याकडे लक्ष द्या अस्वस्थता हळू हळू कमी होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
