Skip to content

गोष्टींवर ठाम तेव्हाच रहा, जेव्हा स्वतःसोबत इतरांनाही त्याचा दूरगामी फायदा होईल.

गोष्टींवर ठाम तेव्हाच रहा, जेव्हा स्वतःसोबत इतरांनाही त्याचा दूरगामी फायदा होईल.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आयुष्य जगत असताना आपल्याला क्षणोक्षणी काही ना काही निर्णय घ्यावे लागतात. काही गोष्टींवर विचार करावा लागतो, त्यावर ठाम राहावं लागतं. कधी हे निर्णय व्यक्तिगत तर कधी बाकीच्यांचा विचार करून घेतलेले असतात. पण हे गोष्टींवर ठाम राहणं, त्या दृष्टीने काही कृती करणं, पाऊल उचलणं हे कधी योग्य ठरत? त्याची योग्यता किंवा त्याचा फायदा झाला की नाही हे समजत कसं? ते त्याचा फायदा तात्पुरता नसून दूरगामी असावा लागतो.

म्हणजेच काय, तर आपण आता जी काही गोष्ट करत आहोत किंवा निर्णय घेत आहोत त्याचा फायदा आता तर असेलच पण भविष्यातही होईल. आता समजा त्याचा थोडाफार त्रास जरी झाला तरी त्याचे नंतरचे फायदे खूप जास्त असतील. असे दूरगामी विचार करून घेतलेले निर्णय जास्त चांगले असतात.

काही उदाहरणातून हे लक्षात येईल. लहान मुलं बाहेर गेल्यावर आई कडे किती हट्ट करतात. त्यांना सर्व गोष्टी नवीन असतात, त्याच आकर्षण असत. त्यावेळी फक्त आपला आनंद ही एक गरज त्यांच्यासमोर असते. मग पावसाळा असला तरी एखाद छोट मुल आइस्क्रीम मागेल, बाहेर मोठ्या मॉल मध्ये गेल्यावर काहीतरी महागडं खेळणं मागेल. ते तस करणार आहेत, कारण त्यांचं वय तस असत.

पण आई तिच्या म्हणण्यावर ठाम असते. तिला माहित असत तिच्या बाळासाठी आणि आताच्या परिस्थितीनुसार काय योग्य आहे. मुल रडत असल तरी ती त्याची समजून घालून दुसरं काहीतरी त्याला देऊन तो प्रसंग ती हाताळते. यात तिने दूरगामी विचारच केलेला असतो. यात बाळाची काळजीच केलेली असते.

बरेच जण नोकरीच्या निमित्ताने नवीन संसार सुरू झाला न झाला तोच नवीन शहरात येतात. अगदी स्वतःच्या बायकोला घेऊन येतात. त्यांनी चांगला हेतू मनात ठेवून ही गोष्ट केलेली असते. संसारासाठी काहीतरी केले पाहिजे अस जरी असल तरी नवीन शहरामध्ये पहिल्यापासून सुरुवात करताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात, तसच आपल्या सोबत कोणीतरी आपली व्यक्ती असेल तर अजूनच जबाबदारी वाढते, त्यात अनेकदा अस होत की मुलीला शहराची फारशी ओळख नसते. त्यामुळे आता जरी हा निर्णय योग्य वाटत असला तरी पुढे अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. इथे आपली प्रगती व्ह्यायाला पाहिजे हा एक विचार असतो पण त्यात आपल्या सोबत जी व्यक्ती असणार आहे ती कशी ही परिस्थितीला सामोरी जाईल हा पण विचार करावा लागतो, त्या माणसाला यातून काय फायदा होईल हे ही पाहावं लागत.

जो गोष्ट नवीन ठिकाणी येण्याची तीच गोष्ट आता आपल्याकडे जे आहे ते देऊन टाकून वेळ मारून नेण्याची. कितीतरी कुटुंबामध्ये हा प्रसंग येऊन गेलेला असतो, गेलेला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. समोर करण्यासाठी काही दिसत नसेल, आपल्याला काही करता येत नसेल तर बरीच जण वर्षानुवर्षे जपलेली शेती, जमीन विकायच्या प्रयत्नात असतात. घरातल्या मोठ्या माणसांनी कितीही सांगितलं तरी आपल्या मतावर ठाम राहील जात. का? तर आता माझी गरज भागत आहे. आता मला पैसे मिळत आहेत. पण माझ्या अश्या करण्याने पुढे जाऊन माझ्या कुटुंबावर काय वेळ येऊ शकते याचा यात विचार नसतो.

शेत, जमीन, आपलं राहत घर या गोष्टी आपल्या आयुष्याचा खरतर आधार असतात. त्यांना सांभाळून ठेवण्याची गरज असते. त्यावर आपल्या घरातली अनेक लोकांचं पुढचं आयुष्य असत. पण असा दूरगामी विचार करणारे खूप कमी असतात. ते आताच्या फायद्यासाठी या सर्व गोष्टी कधीही विकत नाहीत. काहीतरी मार्ग काढतात. पण ज्यांनी अस केलेलं असत त्यांनी यात आपल्या कुटुंबीयांचा फारसा विचार केलेला नसतो. आपल्या बायको, मुलांचा, आई बाबांचा त्यात विचार नसतो. फक्त स्वतःचा विचार असतो जो फार काळ टिकतही नाही.

ही अशी काही उदाहरणं आपल्याला घडताना दिसतात, आपल्या सोबतही कधीतरी घडतात. शिक्षण असेल, काम असेल, लग्नासारखा विषय जिथे आपण अख्खं कुटुंब समाविष्ट असत तिथे आपल्याला एकट्याचा विचार करून त्यानुसार गोष्टींवर ठाम राहणं उपयोगाचं नसत तिथे इतर लोकांचाही विचार करावा लागतो. गरजेचं नाही आता जी गोष्ट चांगली वाटत असेल ती पुढे जाऊन फायद्याची ठरेल आणि आता जी गोष्ट त्रास देत आहे ती पुढे जाऊन नुकसान देईल.

रात्र रात्र भर जागून अभ्यास केल्यावर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा पास करण्यात मुलांना यश मिळत आणि हे यश त्यांना एकट्यांना फायद्याचं ठरतं नाही तर ते समाजाच्या दृष्टीने पण फायद्याचं आहे. कारण एक चांगली व्यक्ती एक चांगला समाज घडवत असते. त्यामुळे विचार करताना त्यात आताच्या आणि पुढच्या फायद्याचं समतोल असला तर तो खऱ्या अर्थाने उपयुक्त विचार असेल, निर्णय असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!