Skip to content

घडलेल्या काही घटना चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा हिरावून घेऊन जातात.

घडलेल्या काही घटना चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा हिरावून घेऊन जातात.


मयुरी महाजन


प्रत्येकाच्या जीवनाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो, त्याचप्रमाणे प्रत्येकाने अनुभवलेले जीवनही वेगळे असते, जी घटना एकाच्या बाबतीत घडली ,तीच घटना दुसऱ्याच्या बाबतीतही घडेल, असे नाही ,परंतु घडलेली घटना त्याच्याशी सुसंगत असणाऱ्या गोष्टी त्याची तीव्रता ,या गोष्टींना फार महत्त्व आहे,

अदिती ही खेडकर स्वभावाची मुलगी ,अगदी कोणासोबतही मन मोकळा संवाद, प्रत्येकाला मदत करणे हे तिच्या आवडीचे काम, अदिती लहान असली तरी समजदार होती, कायम एक स्मित हास्य चेहऱ्यावर दिसायचं, अगदी सर्वांसोबत गमती जमती करत तिचा वेळ कधी जाई, तेही कळत नसे, दिसायला सुंदर व नाजूक कडीची, देखणी व लाजाळू होती,

अदितीही सामान्य कुटुंबात जन्माला आली असली, तरी अचानक तीला अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागते, ज्याची खरच तिच्या ध्यानीमनी कुठलीही कल्पना नसते, परिवारातल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी आदिती वरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असते, व सोबत धमकीही दिली जाते,



सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी अदिती अचानक शांत व एकटी राहू लागली, एकांतात रडू लागली, तिच्या चेहऱ्यावरचे हसूच हरपलं, व तिच्या नुसत्या घरात असल्याने घरात आनंद असायचा, तेच घर आज शांत शांत वाटू लागलं, कुणालाही आपल्या मनातील दुःख सांगता येणे ,आदितीसाठी सोपं नव्हतं, ते आपल्या आयुष्याचा हा अनुभव कधीही विसरू शकत नाही,

परंतु आपल्याबरोबर झालेला किस्सा, तिला आजही दुखून जातो ,आयुष्यात काही घटना व प्रसंगचं असे असतात, की पूर्ण आयुष्यच बदलून जाते, आज अदिती मोठी झालेली आहे, तिला तिचा स्वतःचा संसार आहे ,तरी आयुष्यात घडलेल्या काही घटना आठवल्या तरी चेहऱ्यावरचा आनंद कमी होतो, हास्य क्षणात नाहीसं होतं, व ती परत आपल्या त्याच दुःखाच्या पँईंटला येऊन थांबते,

काही घटना आयुष्यात विसरण्यासारख्या नसतातच, परंतु त्या घटना आपल्याला काय शिकून गेल्यात, व कोणता धडा देऊन गेल्यात, ते खूप महत्त्वाचे आहे ,काही घटना माणसाच्या काळजाला भिडलेल्या असतात, आणि परिस्थितीच्या रेघोट्या कधीकधी अशा असतात की कुणाला सांगताही येत नाही, आणि सहनही होत नाही, त्यामुळे कधी कधी वर्तमानात व्यक्ती आनंदात असली तरी आठवलेली घटना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेत असते ,

हे वाचताना आपल्याला भावनांचे स्पष्टीकरण भलेही समजो अगर ना समजो, परंतु प्रत्यक्ष जीवनात जेव्हा आपल्याला त्या भावनांशी मेड साधण्याचा प्रसंग येतो, तेव्हा आपल्याला कळतं आपण आपल्या भूतकाळाला किंवा घडून गेलेल्या काही घटनांना विसरण्याचा कितीही प्रयत्न जरी केला ,तरी जे काळजाला दुखून गेलेलं असतं, ते नाही विसरू शकत ,आणि हेही खर आहे, ज्या गोष्टीला जितके आपण विसरण्याचा प्रयत्न करणार तीच गोष्ट नेमकी जास्त आठवत राहते,

आपल्या विचारांवर आपलं आयुष्य चालतं, त्यामुळे आपण लक्षात घ्यायला हवं ,की आपण जेव्हाही ती एखादी घटना आठवतो, त्याच्यासोबत आपण आपले विचार त्या घटने सोबत भूतकाळात घेऊन जातो ,व फक्त भूतकाळच नाही तर आपण ती घटना आठवून स्वतःला पुन्हा एकदा त्या दुःखासोबत स्वतःला अनुभवतो ,ते दुःख आपण पुन्हा जगतो ,अनुभवतो ,फक्त आपल्या विचारशक्तीमुळे …



जे व्हायचं होतं ,ते होऊन गेलेलं असतं ,परंतु ती घटना आठवल्यावर चेहऱ्यावरचा आनंद जर कमी होत असेल, तर आपण भूतकाळाला जिवंत करून पुन्हा जगतो, असाच त्याचा अर्थ होतो जरी आपल्या बाबतीत असं काही होत असेल, तर आपण लगेच त्या गोष्टीतून बाहेर यायला हवं, सतत त्याचा विचार करून स्वतःसाठी समस्या वाढून घ्यायच्या नाहीत,

चेहऱ्यावरचा आनंद जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे ,त्यामुळे त्याचे सामर्थ्य जाणून घेणे व त्या आयुष्यभर ते जपणं खूप महत्त्वाचं आहे…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!