Skip to content

गरजा बदलल्या की माणसानेही बदलायचं असतं, आणि यात वाईट वगैरे काहीच नाही.

गरजा बदलल्या की माणसानेही बदलायचं असतं, आणि यात वाईट वगैरे काहीच नाही.


मयुरी महाजन


अन्न ,वस्त्र ,निवारा, या मूलभूत गरजांच्याही पुढे कितीतरी गरजा नव्याने जुळलेल्या आहेत ,ज्याला की आजच्या घडीला डावलून चालणार नाही, ज्यामध्ये मुख्यत्वे करून दोन गारजा आवश्यक आहेत, त्या म्हणजे शिक्षण आणि आरोग्य ,काळानुरूप काळाच्या ओघात काही गोष्टी महत्त्वपूर्ण झालेल्या आहेत ,जसे की आपण बऱ्याचदा बोलताना असं म्हणतो की, ती काळाची गरज आहे….

माणूस काळाच्या गरजे नुसार बदलला तर त्यात वाईट काहीच नाही, शिक्षण हे आज काळाची गरज बनलेली आहे, कारण शिक्षणाने माणसाच्या चौफेर बुद्धीच्या कक्षा वृध्दिंगत केलेल्या आहेत, त्या ज्ञानाच्या जोरावरतीच माणसाने विकासाच्या वाटा तुडवलेल्या आहेत, व निरंतर चालू आहे, फक्त आपल्या ज्ञानाचा चुकीचा वापर व अहंकाराच्या भावनेतून काही विपरीत कृत्य करू नये, यासाठी व्यक्तीच्या विकासाला संस्काराची गरज आहे,

आज प्रत्येक घरातील संस्काराचे विद्यापीठ म्हणजे आजी आजोबा लुप्त होणारी चित्रे, आज रोजी आम्हाला संस्कार ,आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला व आम्हालाही त्या संस्कारांच्या छायेत राहता यावं ,यासाठी संस्कार काळाची गरज आहे,

आपल्याकडे भरपूर पैसा आला, की सहज म्हटलं जातं, पैसा माणसाला बदलवतो, हा ठीक आहे ना ,आर्थिक परिस्थिती चांगली असल्यावर जर कालपर्यंत जी व्यक्ती दोन शर्ट वापरून गरज भागत होती ,चांगली परिस्थिती आहे, त्याच्या गरजा बदलणार, त्याने अजून स्वतःसाठी काही छान छान गोष्टी करून जर स्वतःच्या जीवनाला त्याच्या पद्धतीने आकार दिलेला असेल, तर त्यात वाईट वगैरे वाटण्यासारखं काही नाही, कालपर्यंत मर्यादित गरजांमध्ये वागणारी व्यक्ती आज रोजी आपल्या अमर्यादित गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम असेल, स्वतःच्या पद्धतीने जीवन जगू इच्छित असेल, तर त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही ,

गरजा बदलल्या की माणसानेही बदलायचं असतं ,आणि त्यात वाईट वगैरे काहीच नाही, जेव्हा गरजेसोबत माणूस बदलतो, तेव्हा आपसूकच त्याच्याविषयी माघारी बोलत जातं, की पहिल्यासारखा नाही राहिलास तू, खूप बदललास, का? काय माहिती, परंतु माणसं आपल्याला असं भासवतात, की आपण बदलून खूप मोठी चूक केली ,

आपण लक्षात घ्यायला हवं, की बदलणं हा निसर्गाचा नियम आहे, आजची परिस्थिती उद्या नसणार, बदलं असणारं हे निसर्ग आपल्याला शिकवतो, कारण परिस्थिती आणि मनस्थिती दोघांमध्ये बदल होत जातो,

हे सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, की कुठलीही गोष्ट ही सहजा सहजी बदलत नाही, मग तो माणूस का असेना, तू खूप बदललासं असं म्हणून सोपं असतं, परंतु लक्षात घ्या…. कुठलीही व्यक्ती सहजासहजी बदलत नाही, त्याच्या आयुष्यात त्याच्या जीवनात पदोपदी काही प्रसंगच असे घडत जातात ,काही घटना, काही प्रसंग, व काही आलेले अनुभव त्या माणसाला बदलवत जातात ,

कालपर्यंत ज्या गोष्टी गरजेच्या वाटत नव्हत्या, आज त्या गोष्टींची नितांत गरज असू शकते, व गरज बदलत आहे, तर त्यानुसार माणसाने बदललं तर त्यात वावग काहीच नाही, फक्त गरजेसोबत स्वतःला बदलवताना त्या गरजेसोबत आपलं बदलणं यात काही तथ्य आहे का??? की उगाचच कुठल्यातरी चुकीच्या गरजेला आपण कवटाळून स्वतःचे नुकसान तर करून घेत नाही ना, हे आवर्जून बघावे….

माणसाने बदलावं परंतु स्वतःमधील ती सादगी जे आपल्या जगण्याला समृद्ध करणारी गोष्ट आहे, ती कायम आपली आपणच जोपासावी, माणूस बदलतो, म्हणजे नेमकं काय??? हा प्रश्न बऱ्याचदा पडतो, वेळ आणि काळ अनुसार माणसाने आपली विचार प्रक्रिया प्रगल्भ करायला हवी, नुसतं शो ऑफ करण्यापुरतं व कुणाला दाखवण्याकरता स्वतःच्या महागड्या वस्तू, गाडी बंगला व स्टाईल दाखवून आपण बदललेलो जगाला ओरडून, दाखवून सांगायची आवश्यकता नाही,

आपला स्वभाव त्यातल्या चुका व त्यातील सादगी आणि विचारांची प्रगल्भता, माणसाने बदलावी, आणि ऐरवी कुणी कसं राहावं व राहायला हवं ,कसं वागावं, कसं वागायला हवं, हे आपण कधी ठरवू नये, त्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, आणि आपल्या या स्वतंत्रपणे जगण्यालाच आपण खूप मोठा बदल म्हणू शकतो….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!