भविष्यकाळाची अतिचिंता आपल्याला भित्रा बनवते.
मयुरी महाजन
“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना”
या गाण्याच्या ओळी आपल्याला खूप काही सांगून जाणार्या आहेत ,उद्या काय होणार ,हे तुमच्या माझ्यासारखी मानसे किंवा जो ज्योतिष हात बघून भविष्य सांगतो, त्यालाचं आपल्या भविष्याची चिंता असते ,भविष्य सांगून उदरनिर्वाह चालवणे हे ज्योतिषाचे काम आहे,
परंतु प्रत्यक्षात भविष्याच्या रेषा आपल्या कर्म आणि आपल्या कर्माच्या साधनेतूनचं जात असतात ,भूतकाळ हा रम्य किंवा खूप वेदनादायक आठवणींनी भरलेला असतो, येणारा भविष्य ठरवलेल्या कल्पनेप्रमाणे असेलच असे मात्र नाही, त्यामुळे भविष्याची चिंता वाटणे स्वाभाविक असते,
परंतु भविष्याविषयी चिंता मात्र आपल्याला भित्रा बनवते, आपल्या प्रत्येकाजवळ आज खूप मोठी आणि अमूल्य गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या जवळ आपला “आज” ‘वर्तमान’ आहे, ज्याचा आपण आनंद घेऊ शकतो, किंवा येणार्या भविष्यकाळाच्या चिंतेत घालवू शकतो, आता ते आपणचं ठरवलेले बरे.
आयुष्य हे क्षणभंगुर आहे, क्षणाचाही आज भरवसा राहिलेला नाही, कसली चिंता आणि कसं नियोजन सर्वकाही जागच्या जागीचं. भूतकाळ आपण बदलू शकत नाही, भविष्य आपण पाहू शकत नाही, वर्तमानाला आपण नाकारू शकत नाही, त्यामुळे असणारे क्षण फक्त आपले आहेत,
आणि त्या क्षणांसोबत आपली मैत्री व्हायला हवी, जगण्याचं वेगळेपण आपल्या आजच्या दिवसातचं असतं, येणारा प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात आहे, एक नवीन लढाई आहे, एक नवा संघर्ष आहे, आणि एक नवीन धडा आहे, आपल्या प्रत्येकासाठीच याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण भविष्याचे नियोजन करायला नको, का तर नियोजन असावे,
आपल्या वर्तमानाला आपण कशा पद्धतीने जगतो हे खूप महत्त्वाचे आहे, कारण उगवणारा सूर्य जरी सर्वांकडे सारखा ऊगवत असला तरी उगवणारा प्रत्येक दिवस मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो, खरं म्हणजे आपल्या जगण्याची पद्धत आपल्याला एकमेकांपेक्षा वेगळे असण्याची जाणीव करून देते, प्रत्येकासाठी आपला आज महत्त्वपूर्ण आहे, तसाच आपला येणाऱ्या भविष्यकाळाचेही महत्त्व आहेचं,
परंतु त्याच भविष्याविषयीच्या संकल्पना मात्र व्यक्ती परत्वे बदलत जाणाऱ्या आहेत ,चिंता ही व्यक्तीच्या अस्वस्थतेचे कारण आहे, व भविष्याच्या बाबतीत केली जाणारी अतिचिंता आजच्या दिवसाचा आनंद उपभोगू देत नाही, त्यामुळे अस्वस्थता वाढत जाऊन असणाऱ्या गोष्टींपेक्षा नसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष जाते,
नाही म्हटलं तरी, अगदी गरीबा पासून ते मध्यम वर्गीय पासून टाटा बिर्ला अंबानी पर्यंत प्रत्येकाला आपल्या भविष्यकाळाची चिंता आहे, भविष्यकाळाची चिंता करणे म्हणजे आपण जेव्हा हे विश्व सोडून जाणारं, तेव्हा नेमके आपण काय सोडून जाणार आहोत, यासाठी त्या भविष्यकाळाचा बारकाईने विचार होताना दिसतो,
एक महात्म्य म्हणतात ,की जीवजंतू सर्व प्राणिमात्र या सर्वांचे आणि माणसाचे तशी जर आपण तुलना केली, तर प्रत्येक प्राणिमात्राला आपले जे काही जीवन चक्र आहे, ते कुठल्याही अडचणीविना पार पाडतात, म्हणजे काय तर प्रत्येक जण आपापल्या उदरनिर्वाहासाठी अगदी आपल्या जन्मलेला पिलांच्या पोटापाण्याचे सुद्धा अगदी चोखपणे आपली भूमिका पार पाडताना दिसतात,
परंतु माणूसचं एक मात्र प्राणी आहे, की तो जगतो कशासाठी आहे हे त्याला कळत नाही, आणि फक्त पोटापाण्या पुरतेच नाही तर त्याही पुढे जाऊन माणसाचा हव्यास माणसाला आपल्या भविष्यकाळाचा विचार करायला भाग पाडतो, तसेच पैशाच्या आधारावरती आपला येणारा भविष्यकाळ बघणारी माणसे त्यासोबत एकमेकांशी असणाऱ्या अनामिक स्पर्धा माणसाकडे असणाऱ्या गोष्टींचा आनंद हिरावून घेते, आणि भविष्यकाळाची अतिचिंता करत करत व्यक्ती भित्रा बनत जातो,
कोरोनाचा काळ आपल्या सर्वांनाच बरंच काही शिकवून गेला, आधीपासूनच कितीतरी स्वप्न रंगवली गेली होती, ती स्वप्नं नाहीशी होतांना बघितली, असे नाही कि ती स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, परंतु त्या स्वप्नांसाठी जी पराकाष्टा आणि मेहनत घेण्याची तयारी होती, ती मात्र आपल्या कडून कमी होताना दिसली, आपली तरुणाई हताश झाली, गोंधळली, आणि बघितलेल्या गुलाबी स्वप्नांचा चुराडा होताना बघितला, जगण्याच्या वाटा अशाच कितीतरी खाचखळग्यांनी भरलेल्या आहेत, यातून काही चांगले सिद्ध करण्याची जिद्द मात्र हरवताना दिसली,
अतिचिंता नको,पण योग्य नियोजन व त्यासोबत त्याला असलेल्या आपल्या वास्तव्याचा पुरावा आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद देत असतो, त्यामुळे भविष्याचे नियोजन या पद्धतीने करायला हवे जेणेकरून त्यासाठी कुठलीही अडचण निर्माण झाली तरी त्यामुळे आयुष्य थांबता कामा नये, आयुष्य कुठूनही सुरू करता येतं, असं ठरवलं ना मग प्रत्येक कामात आणि प्रत्येक क्षणात आनंद आहे…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Lekh Avadala
Unbelievable 👌👌