ज्या-ज्या लोकांनी तुम्हांला निराश केले, त्यातून बाहेर कसे पडावे ??
मयुरी महेंद्र महाजन
आयुष्यात अविरत चालणाऱ्या या प्रवासात कितीतरी माणसे भेटतात, येथे प्रत्येकाचे वागणे वेगळे, प्रत्येकाचे बोलणे वेगळे, स्वभाव वेगळे, आता प्रत्येक जण पाठीवरती हात ठेवून आशाचं देईलं, असे होत नाही, काही जण स्वतःचं निराशेच्या गर्तेत अडकलेले असतात, आणि त्यातून ते कुणाला आशेचा किरण निर्माण करू शकतीलं, इतकी त्यांच्यात हिम्मत नसते, काही लोकांचा सुरचं निराशावादी असतो, त्याला पण तरी काय करणारं,
अशा माणसांचा नकळत आपल्यावर प्रभाव पडतो ,आता तसे बघितले तर ते आपल्या स्वभावरती ठरते ,कारण काही प्रभावाने जगणारे असतात ,काही अभावाने जगणारे असतात, तर काही स्वभावाने जगणारे असतात ,कळत नकळत बरीच माणसे आपल्याला निराश करून जातात ,त्यात आपण अडकू नये, आणि त्यामुळे आपली जीवन गाथा कुठे थांबू नये ,त्यासाठी आपण बाहेर पडणे गरजेचे आहे, तेथून बाहेर कसे पडावे ,याविषयी काही टिप्स ज्या आपल्याला त्यातून बाहेर पडण्यास मदत करतीलं.
बघा जेव्हा आपण काही सुरुवात करायला घेतो ,तेव्हा तुला हे जमणार नाही, होणारं नाही ,अशा निराशावादी सूराने बरेच लोक आपल्याला निराश करतात ,परंतु जी लोकं आपल्याला निराश करतात, त्यांचा त्या पाठीमागे काय उद्देश आहे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे ,कारण आपल्याला निराश कारण्यात जर समोरच्या व्यक्तीचा उद्देश आपले खच्चीकरण करणे असेल ,तर आपल्यासाठी ती एक शिकवण ठरू शकते, निराशेच्या गर्तेत आपण त्या पाठीमागची भूमिका शोधणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यातून बाहेर पडायला आपल्याला नक्कीच मदत होईल,
velentine day week सुरू आहे, म्हणून आठवलं ,11 तारखेचा ‘प्रॉमिस डे’ खरंतर मी या ठिकाणी माईंच अर्थात सिंधुताई सपकाळ यांचे नाव आवर्जून घेईलं, की ज्या ज्या लोकांमुळे आपल्या आयुष्यात अडचणी आल्या, दुःख आले, पदरी निराशा आली ,त्यांना माफ करायला शिका, अगदी मनापासून, तसं तर ते करतेवेळी जड वाटेलं,
पण एकदा केलं तर मोकळं वाटेल, आणि दुसरी गोष्ट त्यातून आपण काय शिकलो, हे आपल्याला आयुष्यभर विसरता येणे शक्य नाही, व त्याचबरोबर निराशा दिलेल्या व्यक्ती विषयी मनात कुठलीही द्वेषाची किनार वागवू नका, कारण अशी व्यक्ती समोर जरी आली तरी काहीजणांना अस्वस्थ असल्यासारखे वाटते,
यापेक्षा खूप सोपी पद्धत आपण आपला दृष्टिकोन आणि आपली नजर कायम आपल्या ध्येयावर,आणि त्यासाठी जीवाचे रान करण्याची असेलं, तर दुसऱ्यांच्या चष्म्यातून बघण्याची गरज भासणार नाही ,आपण जग आपल्या चष्म्यातून बघायला शिकलो, तर अन्य कुणाचे उसने अवसान आणण्याची गरज भासणार नाही,
स्वतःला सुद्धा एक प्रॉमिस करायला हवं ,मी निराश व्हायचं की आनंदी व्हायचं हे दुसऱ्यांच्या हाती याचा रिमोट कंट्रोल कशाला?? कारण आपण स्वतः एनर्जीने भरलेले असू आपल्या संपूर्ण शक्तीचा आणि योग्य त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपण वापर कसा करू शकतो, याचे परिपूर्ण ज्ञान जर आपल्याला असेलं, तर आपण बाहेरून भेटणाऱ्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही.
आता तसं पाहिलं तर माणूस भावनांनी ओतप्रोत भरलेला आहे, कोणी प्रेमाचे दोन शब्द आपल्याविषयी म्हटले तर आपल्यात चौपाट उत्साह संचारतो ,तसेच निराशेचा सूर माणसाचे खच्चीकरण करण्यात कारणीभूत असतो, आणि लोकांचा लोड घ्यायचा नाही , लोकांची विविध रूपे असतात ,जे सकाळी गोड बोलतात त्यांच्या मनात कोणी काही भरवले ,तर लगेच रात्री तोंड पाडून बसतात, ईथे लोक पायी सुद्धा चालू देत नाही ,आणि घोड्यावरती ही बसू देत नाही, असं म्हणतात ,म्हणून लोकांचं मनावर घ्यायचं नाही,
बघा असे बर्याचदा होते,कुणी आपल्याविषरी सांगितलेला प्लस पाँईंट लक्षात राहत नाही ,परंतु नेगेटिव पाँईंट लक्ष्यात राहतो, म्हणणार्याने आपल्याला एकचदा म्हटलेलं असते, आपण मात्र परत परत स्वतःला तसे म्हणतो, आणि ते आठवून, त्या व्यक्तीला असंच का वाटलं असेल माझ्याविषयी माझ्यात नेगेटिव असे आहे, म्हणून आपण निराश होतो, आणि म्हणणारा व्यक्ती एकदाच म्हटले असेल आपण कितीतरी वेळा म्हणून घेतो,कुणामुळेही आपल्या जीवनात निराशा येत नाही ,त्यातून आपण आशेचा किरण शोधावा, हाचं त्याचा हेतू असतो ,
आपल्या आयुष्याला फुलवायची जबाबदारी ही आपलीचं असते, आपणच त्याला खतपाणी घालून बहरवू शकतो, त्यासाठी कुणालाही दोषी ठरवण्यात वेळ घालवू नये ,आणि मला असं नेहमी वाटतं, करणारी व्यक्ती कधीही कारणे सांगत नाही,आणि कारणे सांगणारी व्यक्ती कधीच काही करत नाही ,
निराशा देणारे खूप भेटतील, येईलंही निराशा पण ती कुठपर्यंत चघळत राहायची याची जबाबदारी मात्र आपली आहे, आपण आपल्या पद्धतीने जगूया, स्वतःला इतकं मजबूत ठेवायचं ही कुणाच्या लाख प्रयत्नाने सुद्धा त्या गोष्टीची नीव संपायलाचं नको….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

आपला लेख प्रेरणा देनारे व त्यातुन खूप काही समजून घेण्याची, शिकवन देते, खूप सुंदर लेख आहे.
Chan ahe
प्रेरक
प्रेरणादायी
खूप छान लेख आहे…
ठीक ,
पण काही गोष्टीतून बाहेर पडण अवघड अस्त
खूप प्रेरक..मानसिक धीर देणारा .आश्वासक..आशावादी
खुप च छान
Nice
अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शन करणारा नवी दृष्टी देणारा
Bhari🖕
एकदम मस्त