Skip to content

Free आयुष्य जगण्यासाठी बंधनापेक्षा समज असणे गरजेचे आहे.

Free आयुष्य जगण्यासाठी बंधनापेक्षा समज असणे गरजेचे आहे.


हर्षदा पिंपळे


I want to live a free life;
I want to fly in the sky; I want to break all the bonds and want to create a new chapter of life.

अर्थात,मला मोकळं आयुष्य जगायचय, मलाआकाशात उडायचय,मला सगळी बंधनं तोडून आयुष्याचा एक नवा अध्याय रचायचाय.

मोकळं आयुष्य जगायला कुणाला आवडत नाही मित्रांनो…? प्रत्येकालाच मोकळं आयुष्य जगायला आवडतं.मोकळ्या आभाळाकडे बघताना कित्येकजण तर मोकळ्या आयुष्याची व्याख्या सहजपणे करताना दिसतात.त्या मोकळ्या आभाळासारखं,आभाळातील मोकळेपणाने उडणाऱ्या पक्षासारखच आपलही आयुष्य मोकळं असावं असं प्रत्येकालाच वाटतं.पण कित्येकांच आयुष्य या मोकळ्या आभाळासारखं, स्वच्छंदी पक्षासारखं मोकळं असतं ?

प्रत्येकजण धडपडतो तो मोकळं, मनमुराद आयुष्य जगण्यासाठी.पण प्रत्येकालाच ते सहजशक्य होत नाही.कुणावर बंधनं असतात तर कुणावर नाही.आणि ही बंधनं खरं तर कुणालाच हवीहवीशी वाटत नाही. बंधनं असली की अनेकदा कित्येकजण मोकळं जगण्याची इच्छाच सोडून देतात.बंधनांमुळे जगणं कधी कधी नकोसं होतं.कधी अडकल्यासारखं वाटतं.मनाची घुसमट होते.आणि मित्रांनो कधी कधी इतरांबरोबर ही बंधनं आपणच आपल्यावर लादून घेत असतो.आणि मग याच बंधनांमुळे आपण उदास, दुःखी होत असतो.आणि यामुळे आपण मोकळं,बिंधास्त जगण्याच्या आशाच सोडून देतो.आपण आपल्याच बंधनांमुळे बंदिस्त आयुष्य जगतो.

मित्रांनो, फ्री आयुष्य जगायचं असेल तर बंधनं असून कसं चालेल ? या बंधनांबरोबर मोकळं आयुष्य कसं बरं जगता येईल ? नाही, आपल्याला तरी बंधनांमुळे मोकळं आयुष्य जगता येत नाही. आणि जगत असलो मोकळं आयुष्य तरीही एखाद्या क्षणाला ती सगळी बंधनं आठवतातच.खरं तर आयुष्य मोकळं जगायला बंधनं नाही तर समज गरजेची आहे. बंधनं असली काय आणि नसली काय कधी कधी मोकळ्या आयुष्याचा अर्थच आपल्याला कळत नाही.आपल्याला कायम वाटतं बंधनं आहेत म्हणून हवं तसं आयुष्य जगता येत नाही. पण असं नाही मित्रांनो, आयुष्य हवं तसं निश्चितच मोकळं जगता येऊ शकतो.केवळ ती समज आपल्याकडे असणं गरजेचं आहे.कारण काही अशाही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपलं आयुष्य अडकून ठेवत असतो.तर त्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात.

आपण प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी धडपडत असतो,प्रत्येक गोष्ट कंट्रोल करत राहतो,एखाद्या गोष्टीसाठी तासनतास वाट पाहतो,मनातील असंख्य गोष्टी दीर्घकाळ तशाच कुढत ठेवतो.नको असलेल्या गोष्टींना सहसा नकारही देत नाही आणि स्पष्ट होकारही देत नाही.आणि या सगळ्या अशा गोष्टींमध्ये कळत नकळतपणे आपण आपल्याच आयुष्यावर परिणाम करून घेत असतो.या गोष्टींमध्ये कधीही मोकळं जगण्याचा फील येत नाही.आपण जगायचं म्हणून केवळ वरवर जगत राहतो.या जगण्याला काय अर्थ?

आयुष्य म्हंटल तर छोटं आहे आणि म्हंटल तर मोठं आहे.कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं म्हणून आयुष्य जगायला शिकणं आवश्यक आहे.मुळातच आपल्याला फ्री लाईफ हवं असेल तर प्रत्येक गोष्टीची समज असायला हवी.हवं तसं खाणं-पिणं,हवं तेव्हा येणं-जाणं किंवा मनमानी करणं म्हणजे मोकळं आयुष्य नसतं हेही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे.हल्ली मोकळ्या आयुष्याची कन्सेप्टच लोकं बदलत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यात बंधनं ही येतातच.

आपल्याला आपल्या वागण्याची, बोलण्याची समज असायला हवी. बेसिक एटीकेट्स आपल्याला असायलाच हवेत.मुळातच मोकळं आयुष्य म्हणजे नेमकं काय? याची समज आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवी. कारण ज्यावेळेस आपल्यामध्ये समज निर्माण होते तेव्हा आपण अधिक वेगळेपणाने आयुष्य जगायला लागतो.अनेकदा समज नसल्यामुळे आयुष्याचं बरच नुकसान होतं.पण तेच आयुष्य थोडी समज असल्यावर सहज आणि सुंदर होत जातं.काय चुकीचं आणि काय बरोबर हेही आपल्याला कळायला हवं.नुसतच फ्री जगायचय म्हणून चालत नाही. कारण कधी कधी फ्री जगण्याच्या नादात आपण आपल्याच आयुष्याचं हसं करून घेतो.मग वाटतं ही बंधनच बरी आयुष्यभर !

पहा,आयुष्य मोकळेपणाने जगायचं असेल तर स्वतःमध्येच थोडी समज निर्माण करा.स्वतःला कित्येक गोष्टींची जाणीव करून द्या.स्वतःभोवती आखलेल्या निरर्थक चौकटी जमलं तर मोडून टाका.मोकळ्या आयुष्यासाठी स्वच्छंदी चौकटी निर्माण करा.बंधनं तोपर्यंत बंधनं असतात जोपर्यंत आपण त्यांना घाबरून जगतो.बंधनांना आपण शांतपणेही झुगारूच शकतो.फक्त थोडा विचार करून मेहनत घ्यायला हवी. आपणच आपले रस्ते मोकळे करायला हवे.तरच आयुष्य मोकळेपणाने जगता येईल.

आयुष्य सुंदर आहे…. जाणीवपूर्वक ते जगण्याचा प्रयत्न करा.काटे वेचण्याऐवजी फुलं वेचायचा प्रयत्न करा.आयुष्य नक्कीच सुगंधी होईल !


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!