Skip to content

फक्त पॉझिटिव्ह विचार केल्याने अवतीभवती खरचं पॉझिटिव्ह घडतं का ?

फक्त पॉझिटिव्ह विचार केल्याने अवतीभवती खरचं पॉझिटिव्ह घडतं का ?


हर्षदा पिंपळे


सखी आणि तिची आजी एकत्र राहत होत्या.

सखीचे आईबाबा एका कार अपघातात मरण पावले होते.त्यामुळे सखीला कधी आईबाबांच प्रेम मिळालेलं नव्हतं.चार दिवसांनंतर तिच्या आईवडीलांना जाऊन दहा वर्ष होणार होती.जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतसा सखीला त्रास होत होता.तिच्या मनाची घालमेल वाढत होती.तिला खूप अस्वस्थ वाटत होतं.आजीने तिची ही अवस्था बंद दाराआडून पाहिली होती. म्हणूनच आजीने सखीच्या मैत्रिणीला घरी बोलावलं होतं.सखीची मैत्रीण आजीने बोलावल्या प्रमाणे घरी आली.ती सखीच्या खोलीत गेली.आणि सखीला एकटं रडताना पाहून तिला कळेचना काय झालं ? कारण सखी इतकी रडत होती की,

तिच्या रडण्याने मैत्रिणीलाच रडू कोसळलं.सखीची मैत्रीण

म्हणजे रजनी. रजनीसुद्धा सखीला पाहून रडत होती.

शेवटी रजनीने स्वतःला आवरतं घेतलं.आणि सखीला विचारलं.

“सखी,काय झालं ? का अशी रडतेस ? कॉलेजमध्ये काही बिनसलय का ? इतकी उदास का आहेस ? बरेच दिवस झाले,तू सतत निगेटिव्ह विचार करताना दिसतेस.नीट खात नाही, व्यवस्थित झोप घेत नाही. का,का अशी वागतेस ?”

तेव्हा सखी बोलायला लागली.थोडं रडायचं थांबली.तिने रजनीला मनातील घालमेल सांगितली.

“काय करू,आईबाबांना जाऊन दहा वर्ष होतील परवा.गेल्या दहा वर्षात त्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस नाही. रोज त्यांची आठवण येते.दहा वर्ष कशीबशी काढली. पण आता सहन नाही होत गं.नको वाटतं हे सगळं.आजीकडे पाहून शांत राहायला लागतं म्हणून शांत आहे. नाहीतर जगायची अजिबात इच्छा नाही. सतत निगेटिव्ह वाटत असतं गं.काय करू कळत नाही.”

सखी बऱ्याच दिवसांनी इतकं काहीतरी बोलत होती.

तर यावर रजनीने तिला बाहेर जाण्याचा सल्ला दिला.

” सखी हे बघ,असा विचार करू नकोस.निगेटिव्ह विचार करत राहिली तर कसं होणार ? त्यापेक्षा जरा पॉझिटिव्ह राहून बघ.तुझं तुलाच छान वाटेल.जरा पॉझिटिव्ह बोलायला शिक.”

“का ?पॉझिटिव्ह बोलल्याने सगळं पॉझिटिव्ह होणार आहे का? येणार आहेत का माझे आईबाबा ? ” सखी म्हणाली.

“अगं असं नाही, पॉझिटिव्ह बोलल्याने पॉझिटिव्ह घडेलच असं नाही. पण तुला आतून एक नवी ऊर्जा नक्की मिळेन. ज्यामुळे तु नकारात्मक विचार करणार नाही. बघ,एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे?” रजनी म्हणाली.

या रजनीच्या समजावण्याने सखीमध्ये बराच फरक पडला होता.सखी सकारात्मक विचार करायला लागली होती. तिलाही छान वाटत होतं. आईबाबांची आठवण यायची पण ति खचायची नाही. आता जरा ती स्ट्रॉंग झाली होती.

आजी आणि ती छान आनंदात राहत होती.

तर,आयुष्य जगत असताना कितीतरी खाचखळगे

आपल्या समोर सहजपणे उभे असतात.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखाबरोबर दुःखाचाही डोंगर कोसळतोच.वेगवेगळ्या अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.कधी आर्थिक डोलारा सांभाळताना कित्येकांची तारेवरची कसरत ही चालू असते.थोडक्यात,

प्रत्येकाला त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.सगळ्या बाजूने सुखी माणूस भेटणं इतकं सोपं नाही.पण मग अशा गोष्टी आयुष्यात घडत असतात तेव्हा मात्र माणसाचं मन काही थाऱ्यावर नसतं.सतत त्याच्या मनात नकारात्मक विचारांच सत्र सुरू असतं.त्याच्या चेहऱ्यावर असणारं हसू कुठेतरी हरवलेलं असतं.तर सातत्याने नकारात्मक बोललं तर कसं होणार ? नकारात्मक विचार करून, बोलून आपण आपल्यालाच त्रास करून घेत असतो.त्यापेक्षा थोडं सकारात्मक बोललं तर ?

सकारात्मक बोलल्याने अवतीभवती सकारात्मक घडतच असं नाही.परंतु अवतीभवतीचं वातावरण सकारात्मक नक्कीच राहतं.आणि तेच सकारात्मक वातावरण आपल्याला वेगळी ऊर्जा देत असतं.त्यामुळे आपला दृष्टिकोन, आपलं बोलणं आपण शक्यतो पॉझिटिव्ह ठेवायला हवं.

एखादा वाईट किंवा निगेटीव्ह शब्द ऐकायला कुणालाच आवडत नाही. आणि एखादं निगेटीव्ह ऐकल्यानंतर आपल्याला चांगलं वाटत नाही.आपल्यालाही निगेटिव्ह वाटायला लागतं.एकदा का निगेटिव्ह वाटायला लागलं की,काही सुचत नाही. म्हणूनच, सकारात्मक विचार केल्याने नेहमीच अवतीभवती सकारात्मक घडत नसलं तरी सकारात्मक वातावरण नक्कीच निर्माण होतं.

म्हणून, नेहमी सकारात्मक बोला,सकारात्मक विचार करा.

आजुबाजूचं वातावरण जितकं पोषक असेल तितकं आयुष्य जगायला ऊर्जा मिळेल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “फक्त पॉझिटिव्ह विचार केल्याने अवतीभवती खरचं पॉझिटिव्ह घडतं का ?”

  1. श्री प्रदिप शंकर ठसाळे

    Nice information thanku thanku thanku

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!