Skip to content

Expect करण्यापेक्षा जे आहे ते Accept करून पुढे चालत रहा…

Expect करण्यापेक्षा जे आहे ते Accept करून पुढे चालत रहा…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


Expecting and accepting are two sides of life , where expecting ends in tears , accepting makes you cheers…!! हे कुणी लिहलय माहीत नाही…पण खरोखरच सुंदर लिहलय. स्वीकारण आणि अपेक्षा करणं या दोन्ही आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत.पण आपण expect आणि accept या दोन्हीपैकी Expect करण पसंद करतो.कदाचित हा आपला स्वभावही असू शकतो.

स्वतःकडूनच नाही तर आपण इतरांकडूनही कितीतरी गोष्टींची अपेक्षा करतो.पण accept करणं मात्र आपल्याला काही लवकर जमत नाही.ते कित्येकांच्या स्वभावातच नसतं.आणि accept करणं जमत नाही म्हणून आयुष्य एका गोष्टीभोवतीच गुंडाळून राहतं.वेळ आणि ऊर्जा दोन्ही एका गोष्टीसाठीच खर्च होतात.Expect करून बहुतांश वेळा निराशाच येते पण तरीही आपण जास्तीत जास्त expect च करतो. “Expect less , accept more ” हे कुणाला जमतच नाही. आपलं कसं असतं तर… याच्या एकदम विरूद्ध…!

“Expect more , accept less” अशी आपली भूमिका असते.आणि यामुळेच आयुष्यातील प्रॉब्लेम्स हे दिवसागणिक वाढत रहातात.कारण आपण आपल्या दुर्बिणीतून पहाण्याचा प्रयत्न करतो.नेहमीच आपल्याला हवं तेच व्हावं अशी आपली अपेक्षा असते.”जे होईल ते होईल , मी तेच स्विकारेल…” असा ‘acceptance’ आपल्यात खूप कमी दिसून येतो.कधी आपल्या अपेक्षा अगदी छोट्या छोट्या असतात तर कधी त्याच अपेक्षा खूप मोठ्या असतात.क्षणाक्षणाला वाढणाऱ्या असतात.त्या कधी पूर्ण होतात तर कधी पूर्ण होत नाहीत. अनेकदा तर या अपेक्षा स्वतःकडून कमी आणि दुसऱ्यांकडूनच जास्त असतात.

आणि त्या सहसा पूर्ण होत नाहीत. आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर उगाचच आपली चिडचिड होते , आपण निराश होतो.मी त्याच्याकडून उगाच अपेक्षा ठेवली , कुणाकडून अपेक्षा ठेवावी मलाच कळलं नाही… , एक साधी अपेक्षा केली होती तीही पूर्ण करता आली नाही… वगैरे वगैरे आपण अपेक्षाभंग झाल्यावर बोलत असतो.आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर ते आपल्याला सहनच होत नाही.

अपेक्षा पूर्ण झाल्या तर आनंद होतो. पण , एखादी अपेक्षा पूर्ण झाल्यावर आपल्याला वाटत की हा आपली अपेक्षा पूर्ण करेन यात काही शंका नाही असं म्हणून अपेक्षांवर अपेक्षा या वाढतच जातात.त्या पूर्ण होतीलच या भयानक विश्वासावर आपण इतरांवर आपल्या अपेक्षा अनेकदा लादतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत expect करायची इतकी सवय झालेली असते की काही accept करण म्हणजे एखादं दिव्य पार करायला लावलय की काय असच वाटतं.मी हे accept करूच कसं…? मी हे accept च करू शकत नाही. हे का accept करू…मी तर हे expect च केलं नव्हतं….

हे असं सगळं आपलं या acceptance च्या बाबतीत घडत असतं. प्रत्येक वेळी expect करत बसाल तर सगळच अवघड आहे. जसं expect करणं जमत तसं आपल्याला accept करणंही जमायला हवं.अनपेक्षितपणे जे घडतं तेच accept करायला शिकलं पाहिजे. आणि पुढे गेलं पाहिजे. पण आपण मात्र मला हे expect नव्हतं , ते expect होतं असा विचार करत बसतो.जे घडलय ते स्विकारण्यात आपण पुढाकार घेतच नाही. यामध्ये कितीतरी वेळ असाच निघून जातो.

तासनतास त्या पूर्ण न झालेल्या अपेक्षेवर किंवा हवं तस झालं नाही त्यावर विचार करण्यात घालवतो.त्यापेक्षा हाच वेळ आहे ती परिस्थिती स्विकारून पुढे काय करायच यामध्ये घालवलेला केव्हाही better आहे. कधी अशा गोष्टीही असतात की आपण एखाद्यासाठी काहीतरी करतो मग कुठेतरी असं वाटत असतं की यार मी एवढ केलय काहीतरी नक्की मिळेल.जशी अनेकदा आपण आपल्या जवळच्या माणसांकडून कधी कधी काही गोड गोंडस अपेक्षा करतो.

पण अपेक्षित असं काही घडत नाही आणि आपण त्यामुळे हिरमुसतो.त्याचा स्वतःला त्रास करून घेतो. त्या त्रासामध्येही आपण काहीतरी नकळतपणे expect करत असतो.तसा विचार करत असतो.पण expect करून गोष्टी अशा सहज मिळत नाहीत. त्यापेक्षा गोष्टी accept करायला हव्यात. गोष्टी accept केल्याने नव्या गोष्टीना सांभाळणं सहज सोप जातं.accept करून आपण पुढे जाऊ शकतो , ही ताकद आपल्यामध्ये आहे हा आत्मविश्वास आपल्यात वाढीस लागतो.

एक उदाहरण म्हणून सांगायच झालं तर…प्रेमाच्या बदल्यात प्रेम expect करण…. , कुणाचं चांगलं केलं तर त्याबदल्यात काहीतरी चांगल expect करणं , एखाद्याकडे ती ती गोष्ट करण्याची क्षमता असते म्हणून सतत काहीतरी expect करणं , अशी अनेक उदाहरण आहेत. पण , असं सारख सारख अपेक्षा करणं कितपत योग्य आहे…? अपेक्षांना मर्यादाही असाव्यात , त्या अमर्याद नसाव्यात…!

आयुष्यात acceptance इतका महत्त्वाचा आहे पण हे समजायला मात्र खूप वेळ जातो.कारण accept कर म्हंटल की सगळं expect केलेल आठवत राहतं. माझं चुकलं , मी एक्स्पेक्ट करत राहिले , असं-तसं बापरे किती वेळ घालवतो यावर…? वेळ घालवणार पण घडलय ते accept नाही करणार अशी आपली वृत्ती असते ,स्वभाव असतो. Expect केल्याने फार काही होणार नाही पण त्रास मात्र नक्की होईल.

म्हणून आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट , परिस्थिती , बदल हे accept करायला शिका.कारण समोर उभं आयुष्य असतं वाट पाहणारं…सतत expect करत राहिलात तर आयुष्याचा प्रवास अर्धवट राहील. तेच जर accept करायच ठरवल तर आयुष्यातील नवनवीन ठिकाणांना तुम्हाला भेट देता येईल. आयुष्याचा प्रवास निश्चित पूर्ण होण्यास मदत होईल. कारण एखादी गोष्ट स्विकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून सतत expect करत रहायच , त्यातून त्रास करून घ्यायचा , तिथेच थांबायच की आहे ते स्विकारून पुढे जायच हे आपलं आपण ठरवायचं.

पण मला वाटतं expect करण्याऐवजी accept करण्यातच खरं शहाणपण आहे. कारण कितीही काहीही झालं तरी नेहमीच गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत. मग यानंतर त्रास करून घेण्यापेक्षा पुढे पुढे चालत रहावं उरलेल आयुष्य…! अगदी situation कोणतीही असुद्या… फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा—

“Don’t expect anything” ,
“Accept the situation and move on” ,
“Expect less , accept more”

यातील कोणतही एक केलं तरी आयुष्यातील कितीतरी प्रश्न सहज सुटतील.expect करणं हा स्वभाव आहे त्यामुळे तो बदलायला कदाचित वेळ लागू शकतो पण ठरवल तर नक्की बदलेल. Expect करणं आपण थांबवू नाही शकत पण कमी तर करूच शकतो.म्हणून या तीनपैकी एक नक्की करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!