एकटेपणा कोणी सोडून गेलं म्हणूनच येत नाही तर मनातलं सांगायला कोणी जवळच नसल्यामुळे ही येतो.
हर्षदा पिंपळे
एकटेपणा…… आता एकटेपणा म्हणजे काय ?तर एकटेपणा म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर ही अशी अवस्था आहे की त्या अवस्थेत आपल्याला कुणाशीही कनेक्ट व्हावसं वाटत नाही. किंवा कधी कधी सगळं काही असूनही सगळं नसल्यासारखं भासत राहतं.एकट एकट वाटत राहतं.बेसिकली एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपल्यासोबत किती तरी काळ टाईम स्पेन्ट करते.परंतु तीच व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवतो.
आपली हक्काची व्यक्ती सोडून गेली म्हणून आपण अक्षरशः एकटे पडलो आहोत अशी भावना मनात कुठेतरी घर करून बसते.मान्य आहे की आपल्या आयुष्यातील एखादी खास व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर एकटेपणा हा निश्चितच जाणवतो. त्या व्यक्तीशी असलेली आपली ‘Attachment’ , आपल्या सुंदर सुंदर आठवणीही आपल्याला आठवत राहतात.आपण त्या व्यक्तीमध्ये इतके गुंतलेले असतो की ती व्यक्ती गेल्यानंतर हा एकटेपणापण मनाला छळत राहतो.
पण प्रत्येकवेळी हा एकटेपणा एखादी व्यक्ती सोडून गेल्यानंतरच जाणवत नाही. तर हा एकटेपणा तेव्हाही जाणवतो जेव्हा आपल्या मनातील भावना सांगायला कुणीच जवळच नसतं.कित्येकदा आपल्या सभोवताली माणसांची गर्दीच गर्दी असते.पण तरीही त्या गर्दीतही आपल्याला एकटेपणा जाणवतो.एखाद्या माणसाकडे सगळ्या सुख-सोयी असतात.
मोठमोठ्या लोकांशी ओळखी असतात.मोठ मोठ्या लोकांसोबत उठणं-बसणं असतं.पण या सगळ्यांमध्ये कुणाशीही बोलावसं वाटत नाही.अशा माणसालाही तेव्हा एकटेपणा हा जाणवतोच.कधी कधी कित्येक मित्र सोबत असतात, घरातील सगळ्या व्यक्ती आपल्या सोबत असतात परंतु तरीही मनाला एकटेपणा जाणवत राहतो.मन अस्वस्थ भासत राहतं.
मनात इतकं काही साचलेलं असतं.पण बोलायला जवळच असं कुणीच नसतं.अशी व्यक्तीच दिसत नाही जिच्यासोबत मनातील सगळ्या कोंडलेल्या भावना कोणताही संकोच न बाळगता मोकळ्या करु शकतो.किंवा मग “मला खरच कोण समजून घेईल..? मला घेईन का कुणी समजून..?माझ्या मनातील साचलेलं ऐकून घ्यायला त्यांना वेळ असेन का..? पण ते मला का ऐकून घेतील…?” वगैरे वगैरे अशा शंका, असे प्रश्न मनात घोळत राहतात.
पण मग किती दिवस हा एकटेपणाचा टॅग घेऊन फिरत रहायच..? किती दिवस हा एकटेपणा सहन करायचा…?
दीर्घकाळ हा एकटेपणा बरा नव्हे. मनातील भावना कुणासमोर तरी शेअर करायलाच हव्या. त्याशिवाय हा छळणारा एकटेपणा कमी होणार नाही. दिवसागणिक तो वाढतच जाईल.त्यामुळे शक्यतो मनातील भावना शेअर करायला शिका.मनावरच ओझं हलकं होण्यास मदत होईल.मनातील भावनांचा निचरा होईल.शेअर केलच नाही तर समोरचा आपल्याला समजून घेतोय की नाही हे कळणारच नाही.त्यामुळे हळुहळू शेअरींग शिकायला हवं.कुणीतरी आपल्याला समजून घेऊ शकतं हा सकारात्मक विचार करून पुढे ठेवून बिंधास्त मोकळेपणाने बोलायला हवं.तरच एकटेपणा कमी जाणवेल.
जर आपण बोललोच नाही, मोकळे झालोच नाही तर मनाची घुसमट होऊन होणारा त्रास अधिकाधिक वाढत राहील.इतकच नाही तर हाच एकटेपणा शरीरासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी चांगला नाही.या एकटेपणामुळे कधी ब्लडप्रेशरवर परिणाम होतो.चिडचिडेपणा वाढतो. थोडक्यात सांगायचे झालं तर मनाच आणि शरिराच संतुलन अक्षरशः बिघडायला लागतं.आत्मविश्वास हरवायला लागतो. कमकुवतपणा वाढत जातो. तर आता तुम्हीच ठरवा, हा एकटेपणा वाढवायचा की कमी करायचा….?
आणि जर का हा एकटेपणा कमी करायचा असेल तर नक्कीच काही गोष्टी करायला सुरुवात केली पाहिजे.
*निसर्गाच्या सानिध्यात रमणे.
*मित्र-मैत्रिणींशी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करणे.
*आवडीच्या गोष्टी करण्यास प्राधान्य देणे.
*मेडिटेशन करणे.
*ओपन माइंडेड राहण्याचा प्रयत्न करणे.
*संवाद साधणे.
यांसारख्या काही गोष्टी नक्कीच करायला हव्यात.
आणि एखादी व्यक्ती अशी एकटेपणात दिसून आली तर त्या व्यक्तीची नक्की विचारपूस करा.कदाचित त्या व्यक्तीला कोणी सोडून गेलं नसेल पण त्या व्यक्तीच्या मनात बरच काही साचलं असेल. त्या व्यक्तीला मनातील भावना शेअर करण्यासाठी जवळची व्यक्तीच नसेल.म्हणून एकटेपणात दिसणाऱ्या व्यक्तीला हक्काने विचारा.त्यांच्याशी संवाद साधा. एकटेपणातून यायला त्यांना थोडी हेल्प करा.सर्वात महत्वाच म्हणजे आपणही एकटेपणात नाही नं…?याचीही एकदा खात्री करून पहा.आणि फार काळ एकटेपणाला जवळ करू नका. वेळीच व्यक्त व्हायला शिका.हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तींसोबत छान वेळ घालवा. त्यांच्यासोबत हसा,रडा,एकत्र रहा.आयुष्यातील सुख-दुःखं शेअर करा.आयुष्य हसतखेळत जगा.एकटेपणा आपोआपच तुम्हाला सोडून जाईल.
आनंदी रहा,मिळून मिसळून रहायचा प्रयत्न करा आणि एकटेपणाला गुड बाय करा.
आणि हो,एकटेपणा कधी कधी जाणवत तर रहाणारच.म्हणून फार विचार करू नका.
Life is beautiful !
Go and enjoy your beautiful journey of life…!
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खुप, चांगला,लेख आहे,,
अतिउत्तम, आपले सर्वंच लेख , मार्गदर्शन करणारे असतात