एकटेपणा दूर करण्यासाठी काही प्रॅक्टीकल पद्धती वाचा.
हर्षदा पिंपळे
आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी एकटेपणा हा जाणवतोच.कधी गर्दीतही एकटेपणा वाटतो.सगळं असूनही एकटेपणा वाटतो.पण एकटेपणाचं नेमकं कारण काही समजत नाही. एकटं वाटत राहतं.उदास उदास वाटत राहतं.या एकटेपणातून बाहेर यावं असं सगळ्यांना वाटत असतं.परंतु कितीजण यासाठी प्रयत्न करतात? काहीजणं प्रयत्न न करता तसेच एकटेपणाला घेरून बसतात.तर काही जणांना यातून बाहेर येण्याचे मार्ग काही दिसत नसतात. तर यासाठीच आपण काय करायचं ते पाहूयात.
तर पुढील गोष्टी या एकटेपणातून बाहेर येण्यासाठी नक्कीच मदत करतील.
*एकटेपणाचं कारण शोधा-
सर्वात आधी एकटेपणाचं कारण शोधा.हा एकटेपणा नेमका कशामुळे आलाय हे समजून घ्या.म्हणजे एकटेपणावर मात करणं इझी जाईल.
*स्वतःला वेळ देणे –
धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे स्वतःसाठी अजिबात वेळ नसतो. अनेकदा यामुळे थकवा जाणवतो. मन अशांत, अस्वस्थ होतं.तर यासाठीच स्वतःला वेळ देणं आवश्यक असतं.त्यामुळे स्वतःला, स्वतःच्या गोष्टींसाठी वेळ द्या.
*फिरायला जाणे –
घरातून बाहेर पडा.किंवा जिथे असाल त्या ठिकाणापासून थोडं लांब जा.सोलो ट्रिपला जा.तिथे असलेल्या नकारात्मक वातावरणापासून बाहेरच्या नवीन वातावरणात फिरायला जा.
*मित्रमैत्रिणींशी संवाद साधणे-
ज्या मित्रमैत्रिणींशी बोलावसं वाटतय त्या मित्रमैत्रिणींशी बोला.मोकळं व्हा.व्यक्त व्हा.
*इतरांची मदत घेणे-
काही मनात शंका/कुशंका असतील तर ते सोडवण्यासाठी इतरांची मदत नक्की घ्या. इतरांची मदत घेण्यास कोणताही संकोच मनात बाळगू नका.
*गार्डनिंग
गार्डनिंग हा एकटेपणा दूर करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.गार्डनिंगची आवड असेल तर एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही गार्डनिंगचा पर्याय choose करू शकता.मनाला रिफ्रेश करणारं हे गार्डनिंग नक्की करून पहा.
*सोशल मीडीयापासून दूर रहा-
हल्ली एकटेपणाला नवं कारण मिळालय.आणि ते म्हणजे सोशल मीडिया. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की शेवटी त्याचा मानसिकतेवर परिणाम होतो.हल्ली फोटोझ् पोस्ट करणं,त्याला किती लाईक्स,विव्झ्,आणि किती शेअर आलेत यामध्ये खूप वेळ खर्च होतो.आणि कमी लाईक्स, कमी शेअरींगमुळे हल्लीची पिढी मनावर विपरीत परिणाम करून घेतेय.यामुळे एकटेपणाला नवीन कारणच मिळतय.म्हणून सोशल मीडीयापासून शक्य होईल तितकं लांब रहा.शक्यतो चांगल्या गोष्टींसाठीच या सोशल मीडियाचा मर्यादित असा वापर करा.
*मुव्ही –
एखादा चित्रपट पहायला काही हरकत नाही. एखादा विनोदी चित्रपट अशावेळेस पाहिला तर एकटेपणावर मात करणं शक्य आहे.
*व्यायाम /मेडिटेशन-
“व्यायामाला काही महत्त्व नाही.” असं बोलणारी व्यक्ती सापडणं जरा अशक्यच!व्यायाम / मेडिटेशन या दोन्ही गोष्टी एकटेपणाला नक्कीच दूर करू शकतात.त्यामुळे नियमित व्यायाम,योगावर लक्ष केंद्रित करा.
*निवांतपणा अनुभवा-
ज्या क्षणी तुम्हाला निवांतपणा मिळत असेल त्यावेळी तो अनुभवा.त्या निवांतपणाचा पूर्णपणे आनंद घ्या.त्यावेळी फक्त निवांत रहा.रिलॅक्स रहा.
*प्राण्यांसोबत वेळ घालवा-
कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी माणसाच्या एकटेपणात खूप सहाय्यक ठरतात. त्यांच्यामुळे आपल्यामध्ये नवी एनर्जी क्रिएट होत असते.एक आनंदाची भावना निर्माण होत असते. त्यामुळे प्राणी आवडत असतील तर निश्चितच तुम्ही प्राण्यांसोबत वेळ घालवू शकता.
*नियमित झोप
नियमित आणि पुरेशी शांत झोप ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.नियमित झोप नसेल किंवा अपूर्ण झोप असेल तर एकटेपणावर याचा अधिकच परिणाम होत जातो.त्यामुळे नियमित झोप हे कम्पलसरी घ्या.
*आवडीच्या गोष्टी करणे-
एकटेपणात तुम्ही आवडीची पुस्तकं वाचू शकता.आवडीचं गाणं गाऊ शकता,नाचू शकता,आवडीचं एखादा पदार्थ बनवून खाऊ शकता.
*सकस आहार-
सकस आहार हा तितकाच आवश्यक आहे. जितकं पोषक आहार असेल तितकाच त्याचा शरिरावर आणि मनावर होणारा परिणाम हा चांगला असेल.
*ब्रेक घ्या-
व्यस्त जीवनातून काही काळ ब्रेक घ्या.शरीराला, मनाला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे एक छोटासा ब्रेक घेणं नक्कीच फायदेशीर ठरेल.
*तज्ञांची मदत-
आणि हा एकटेपणा दीर्घकाळ जाणवत असेल तर आणि गरज पडल्यास तज्ञांची मदत घ्यायला विसरू नका.
पहा,एकटेपणा आला तर जास्त विचार करू नका.आनंदी रहा,सकारात्मक वातावरणात रहायचा प्रयत्न करा.चांगलं बोला.चांगलं ऐका.आजूबाजूला काही वेगळं दिसतय का याचा अंदाज घ्या.एकटेपणावर मात करण्यासाठी हळुहळू जमेल तसा प्रयत्न करत रहा.एकटेपणावर आपण मात करू शकतो असा विश्वास ठेवा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
